वाहनांचे फोटो काढण्यासाठी मोबाईलचा वापर महागात पडणार
वऱ्हाडवृत्त डिजिटल
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांनी मोबाईलमध्ये टिपल्यानंतर त्यांच्या घरीच दंडाचे चालान पाठवले जाते. मात्र, आता नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करताना, त्या गाड्यांचे खाजगी मोबाईलमधून फोटो काढणे वाहतूक पोलिसांना महागात पडणार आहे. याबाबत वाहतूक विभागाकडून नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी या संदर्भात आदेश काढला आहे.
यापुढे वाहनचालकांवर कारवाई करताना वाहतुक पोलिसांना ई-चालान मशीनचाच वापर करावा लागणार आहे. जे वाहतूक पोलिस कारवाईच्या वेळी खाजगी मोबाईलचा वापर करतील, त्यांच्यावर कारवाई करावी, असा आदेश कुलवंत सारंगल यांनी दिला. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना ईचालानच्या माध्यमातून दंड ठोठावण्यात येतो.
वाहतूक पोलिस नियम मोडणाऱ्यांच्या गाड्यांचे क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये टिपतात आणि त्यांच्या घरीच दंडाचे चालान पाठवले जाते. मात्र, आता नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करताना, त्या गाड्यांचे खाजगी मोबाईलमधून फोटो काढणे वाहतूक पोलिसांना महागात पडणार आहे. वाहतुकीचे नियम मोडले की, त्याचे चालान आता थेट घरी येऊ लागले आहे. अनेकदा वाहतूक पोलिस सिग्नल संपला किंवा वळण संपले की दबा धरून थांबलेले असतात. अनेकदा आपल्याला नियमांची माहिती नसते आणि ते तो नियम दाखवून पावती फाडतात. तुमचे चालान चुकीने काढले गेले असेल तर, तुम्हाला अनेक स्तरांवर ते रद्द करता येते. (वृत्तसंस्था)