सर्व पुस्तकांच्या किमती ५० टक्के वाढणार!
वऱ्हाडवृत्त डिजिटल
कच्च्या मालाचे वाढलेले दर, त्यामुळे कागदाच्या वाढलेल्या किमती, सरकारने लावलेला जीएसटी, सोबतच महागाईने वाढलेल्या किमतीमुळे पुस्तकांच्या किमतीत मोठी वाढ होणार असल्याचे चित्र आहे. यावर्षी शालेय पुस्तकांच्या व वह्यांच्या किमतीत वाढ झाल्याचे समोर आले होते. आता सरकारने ग्रंथनिर्मितीच्या प्रत्येक विभागाला १८ टक्के जीएसटी लावल्याने सर्वच प्रकारच्या पुस्तकांच्या किमतीत ५०% पर्यंत वाढ होणार असल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे तयार पुस्तक ग्राहकाला देताना करमुक्त द्यावे लागते. त्यामुळे वाढीव खर्चाचा ताण अपरिहार्यपणे पुस्तकांच्या किमती वाढण्यावर होणार आहे. ही वाढ सुमारे ५०% असू शकते आणि येत्या सप्टेंबरपासून ती प्रत्यक्षात येणार आहे.
राज्यभरात १००० हून अधिक प्रकाशक आहेत. प्रकाशक संघाच्या सभासदांची संख्याच ४६५ आहे. प्रत्येक प्रकाशक वर्षाला सरासरी १० ते १२ पुस्तके छापतात. मात्र, एकीकडे ऑनलाइनमुळे मंदावलेली मागणी आणि दुसरीकडे कागदाच्या किमतीतील वाढ, जीएसटी यामुळे वाढलेला निर्मिती खर्च या कात्रीत प्रकाशन संस्था सापडल्या आहेत.
१.२५ रुपयाचे पान २.५० रुपयांना पुस्तकांच्या एका पानाचा खर्च १.२५ ते १.५० रुपया येत होता. तो सध्या २ ते २.२५ रुपये प्रतिपान असा वाढला आहे. यामागे कागदाच्या किमतीत झालेली वाढ आणि पेट्रोलच्या दरात झालेली वाढ ही कारणे असल्याचे प्रकाशकांनी २०१८ च्या तुलनेत पुस्तक निर्मितीच्या या सर्व खर्चामध्ये ४०% वाढ झाली आहे. शाई, केमिकल सोल्युशन्स तसेच बायंडिंगचे दर कमी जास्त असले तरी त्यात वाढ झाली. प्लेटमेकींगचे दर ६०० रुपयांपर्यंत पोहचले आहेत. चार वर्षापूर्वी हेच दर २५० रुपये तर दोन वर्षापूर्वी प्लेटमेकिंगसाठी ३५० रुपये खर्च होता.