वऱ्हाडवृत्त् (डिजिटल)
जगभर काटकसर किंवा बचत दिन ३१ आक्टोंबर ला साजरा होतो. भारतात तो ३० आक्टोबरला साजरा होतो. या दिनाच्या निमित्ताने बचतीचा घेतलेला आढावा व या दिनाचे महत्व (Savings Day is celebrated on 31st October. It is celebrated on 30th October in India.)

जागतिक बचत बँकेत १९२४ साली मिलान इटली येथे पहिली कॉंगेस भरली होती. या कॉंग्रेसमध्ये शेवटच्या दिवशी म्हणजेच ३१ आक्टोंबर १९२४ ला जागतीक बचत किंवा काटकसर दिन जगभर साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला. त्याचा अंमल प्रत्यक्षांत १९२५ साली झाला. याचा स्विकार अमेरिकेतील व स्पेनमधील बँकानी घेतला. या मागे नागरीकांचे जीवनमान सुधारणे हाच होता. १९२१ सालीही अशा प्रकारचा प्रयत्न झाला होता. परंतु जर्मनी मध्ये १९२३ मध्ये आलेल्या आर्थिक मंदीमुळे तेथील नागरीकांनी याकडे त्यावेळी पाठ फिरविली. त्यानंतर हळू हळू सुधारण होत गेल्याने तेथील नागरीकही कालांतराने समाविष्ठ झाले. नागरीकांचे जीवन सुखकर व्हावे, उतार वयांत आर्थिक तरतूद असावी, भविष्यांतील आर्थिक तरतूद, मुलांच्या शिक्षण व मुलींच्या लग्नासाठी लागणारे खर्च, आजारी व वृधत्वातील तरतूद, यासाठी बचत करणे महत्वाचे आहे. आपण एकदम काहीही करू शकत नाही. अनेक कुटुम्बात थोडे थोडे सोने घेण्याची प्रथा आहे. याचा उपयोग मुलींच्या लग्नाच्या वेळी होऊ शकतो.

एकदम सोने घेणे शक्य होत नाही. थोडी थोडी बचत केल्यास त्याचा उपयोग मुला मुलींच्या शिक्षणासाठी सुध्दा होऊ शकतो. आज अनेक ठिकाणी खाजगी नोकरीत अशास्वतीचे जीवन असते. अशा वेळी काही अघटित घडल्यास व नोकरीला मुकावे लागल्यास अल्पबचतीचा उपयोग कामी येतो. काही वेळा गंभीर आजाराने ग्रासले जाते अशा वेळी या साठलेल्या पैशाचा उपयोग होतो. या द्रष्टीने अनेक बचत बँकेमध्ये अनेक प्रकारच्या बचतीच्या स्कीम आस्तित्वात असतात. भारतातील पोस्ट दरमहा खाते या द्रष्टीने कार्यतत्पर आहे. बचत खाते, (रिकरिंग डिपॉझिट), सुकन्या बचत योजना इत्यादि. भारतात सुध्दा हा बचत दिन मोठ्या प्रमाणांत साजरा केला जातो. विविध प्रकारची पोस्टर्स, व हँबिले यामधून प्रचार केला जातो. बँका जास्तीत जास्त बचत करावी या द्रष्टीने अनेक योजना जाहीर करतात जेणे करून नागरीक जास्तीत जास्त बचत करतील. या दिवशी अनेक सरकारी उपक्रमही सुध्दा आखले जातात व बचतील प्रोत्साहन दिले जाते. यामध्ये स्त्रियांच्या विविध संगठना, व्यावसायिक, शाळा, व खेळांच्या संघटना भाग घेतात. भारतात मात्र १९८४ नंतर हा दिवस ३० आक्टोंबर ला साजरा केला जातो. ३१ आक्टो १९८४ ला पंतप्रधान इंदिरा गांधींचे निधन झाल्यामुळे त्यानंतर अल्पबचत दिवस ३१ ऐवजी ३० ला साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला.
नॅशनल सेव्हिंग्ज इन्स्टिट्युट देशांत विविध प्रकारचे बचत कार्यक्रम आखत असते व नागरीकांना याचे मह्त्व पटवून देण्याचे महत्वाचे कार्य करत असते. अनेक शाळामधूनही मुलांना बचतीचे महत्व पटविले जाते. २०१४ नंतर मोदी सरकारने नागरीकांची बचत खाती उघडण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला. यामुळे देशांत ३३ कोटीहून अधिक नागरीकांनी बँकेत खाती उघडली. व नागरीकांनी या खात्यात एक लाखाहून अधिक रुपयाची गुंतवणूक केली. अल्पबचतीमुळे वैयक फायदा होतोच… पण राष्ट्राला सुध्दा त्याचा होऊ शकतो. लोकमान्य टिळकांच्या कारकिर्दीत पैसा फंड कारखाना लोकांच्या कडून पै पै गोळा करून निर्माण केला गेला. हे बचतीचे ज्वलंत उदाहरण आहे. आपणही नियमित बचत करूया व आपल्या भावी काळाच्या सुखासाठी प्रयत्न आपल्या बरोबर राष्ट्राचाही फायदा करूया बचत निश्चितच होणार आहे.