वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क : वानखेडे स्टेडियममधील एका स्टँडला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमुख आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) चे माजी अध्यक्ष शरद पवार यांचे नाव देण्यात आले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून शरद पवार यांना हा सन्मान देण्यात आला. एमसीएच्या एक्स हँडलवर या नावाच्या घोषणेसंदर्भात एक पोस्ट करण्यात आली.
ललित मोदी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, आयपीएलसाठी पवारांचे आभार माना. शरद पवार यांच्या माझ्यावरील आंधळ्या विश्वासामुळे आणि शंभर टक्के पाठिंबा दिल्यामुळेच आयपीएल झाले. आपण सर्वजण ज्या जागतिक आयकॉनवर प्रेम करतो त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत. त्यांनी माझे स्वप्न साकार केले आणि आज आयपीएलशिवाय जग जगू शकत नाही. म्हणून पवार यांचे व्हिजन कधीही विसरू नका. मी त्यांना सलाम करतो, असे ललित मोदी यांनी म्हटले आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून पवार यांनी २००८ मध्ये ललित मोदींना या लीगची सुरुवात करण्यासाठी पाठिंबा दिला होता.
