अकोला : सालाबादप्रमाणे ह्यावर्षीसुद्धा अकोल्यातील 42 वर्षे जुना असलेल्या जेष्ठ नागरिक संघाने, मलकापूर भागातील उत्कर्ष शिशुगृहामध्ये त्यांना दूध पावडर, डायपर तसेच सूर्योदय बालगृहांमध्ये सुद्धा प्रत्येकी 16 हजार रुपये किमतीच्या आवश्यक किराणा सामानाचे वितरण करून ह्या दोन्ही संस्थांना एकूण 34 हजार रुपयाचा आपला मदतीचा हात देऊन आपली परंपरा कायम ठेवली आहे. ह्यासाठी संघाच्या काही सदस्यांनी वैयक्तिकरित्या ऐच्छिक वर्गणी जमा केली होती. ह्यावेळी उत्कर्ष शिशुगृहाचे पदाधिकारी श्री हेमंत चौधरी व श्री काळकर आणि सूर्योदय संस्थेचे श्री प्रशांत देशमुख यांनी आपापल्या संस्थेबद्दल आणि त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल ज्येष्ठ सदस्यांना सविस्तर माहिती दिली. ह्याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सर्वश्री चंद्रकांत कुलकर्णी, कोषाध्यक्ष कन्हैया चन्नकेशला, सहसचिव श्री प्रमोद देशमुख जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष नारायण अंधारे चौथमल सारडा मोहनशास्त्री जलतारे सुनील खोत शाम हरताळकर सुरेश गाडगे शकुन परांजपे चंद्रप्रभा चौधरी निशा कुलकर्णी उपस्थित होते.

