जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल, पुरुषांमध्ये अधिक जागरूकता
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क.
महिलांनो, तुम्ही घरी स्वयंपाक करत असाल, लादी पुसणे, कचरा काढत असाल, मुलांना सांभाळत असाल आणि हे सगळे केल्यावर ऑफिसलाही जात असाल तर तुम्ही स्वतःला अक्टिव्ह वूमन म्हणून घेऊ शकता. पण प्रत्यक्षात तसे असेलच असे नाही. अनेक स्त्रिया व्यायाम न करण्याची सबब आम्ही घरातली कामे करतो अशी देतात. ही कामे उरकतानाच इतके थकायला होते की, वेगळा व्यायाम करण्याची गरजच राहत नाही. मात्र असा विचार करणेच आजारांना निमंत्रण देणारे आहे. घरची कामे म्हणजेच व्यायाम अशी स्त्रियांची समजूत असते. राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणानुसार, शारीरिक हालचाल म्हणजे ज्यात संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर वेगवान चालणे, वॉटर एरोबिक्स, सायकल चालवणे. टेनिस खेळणे हे सगळे शारीरिक हालचालींमध्ये मोडते. घरातली कामे म्हणजे शारीरिकदृष्ट्या हालचाल असलेला व्यायाम नव्हे. प्रौढ व्यक्तीने आठवड्यातून किमान दीडशे मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे. एरोबिक्स व्यायामुळे हृदयाचे ठोके वाढतात. श्वास वरखाली होतो, शरीरात उष्णता निर्माण होते. शॉपिंग, स्वयंपाक करणे, घरातली छोटी-मोठी कामे करणे म्हणजे शारीरिकदृष्ट्या सक्रिय होत नाही. या सगळ्या गोष्टींमुळे फायदा होत नाही असे नाही. या कामांमुळे शारीरिक हालचालींचे स्वरूप बदलते. भारतातील 43 टक्के महिला शारीरिकदृष्ट्या कमी हालचाल असणाऱ्या आहेत. देशातल्या पुरुषांमध्ये हे प्रमाण 23.5 टक्के आहे. शारीरिकदृष्ट्या सगळ्यात निष्क्रय होण्याची नामुष्की कुवेतवर ओढवली.
विकसनशील देशांतील लोक सक्रिय
अनेक देशातल्या माणसांची आरोग्य पाहणी करण्यात आली. चारपैकी एक प्रौढ व्यक्ती हवी तेवढे सक्रिय नसल्याचे हा अहवाल सांगतो. काही देशांमध्ये तीनपैकी एक व्यक्ती सक्रिय नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया कमी अक्टिव्ह अर्थात सक्रिय असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. विकसित सधन देशांच्या तुलनेत विकसनशील आणि आर्थिकदृष्ट्या पिछाडीवर असलेल्या देशातली माणसे अधिक सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. शारीरिक हालचाल कमी असणाऱ्या माणसांना हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता अधिक असते. डायबेटिस होण्याचे प्रमाणही जास्त असते. काहींना शारीरिक हालचालींच्या अभावी कॅन्सरही होण्याची शक्यता असते. शारीरिक हालचाली. व्यायामाचा अभाव असेल
हालचालींमध्ये पिछाडीवर का?
– भारतीय महिलांना स्वतःसाठी वेळ काढणे खूप कठीण असते.
– अशावेळी थोडे चतुराईने काम करायला हवे.
– एखादी बाई भाजी खरेदी करायला जात असेल तर तिने चालत जावे.
– वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्याचे काम करत असेल तर बाजूला एक स्टूल ठेवावे. ज्यावर चढावे-उतरावे, जेणेकरून थोडा व्यायाम होईल. – शहरांमध्ये बहुतांशी कामे यंत्रांच्या माध्यमातूनच होतात. यंत्रांवरचे अवलंबित्व कमी करायला हवे.