महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्य कोषाध्यक्ष पदी श्री. प्रकाश चतरकर यांची निवड
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाची सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ३ मार्च २०२४ रोजी कीर्ती मंगल कार्यालय श्री. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष श्री. राजेशजी सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली तथा राज्य कार्यकारिणी पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व जिल्हा पदाधिकारी तसेच तालूका पदाधिकारी यांचे उपस्थितीत संपन्न झाली त्यामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अकोला जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष श्री. प्रकाश चतरकर यांची राज्य कोषाध्यक्ष पदी तसेच श्री. विकास पोथरे जालना यांची राज्य संघटनमंत्री पदी, श्री. शैलेश चौकशे यांची अमरावती जिल्हाध्यक्ष पदी, तर धनंजय सुर्यवंशी यांची नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली राज्याध्यक्षांचे हस्ते नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला

सर्वसाधारण सभेचे प्रास्ताविक संपर्कप्रमुख श्री राजेंद्र नांद्रे यांनी केले. विषय पत्रिकेप्रमाणे सभेचे कामकाज कार्यवाह संजय पगार यांनी पार पाडले यावेळी विषय पत्रिकेतील विषयांवर चर्चा करतांना राज्याध्यक्ष श्री. राजेश सुर्वे यांनी सन २०१८ पासून सन २०२१ पर्यंत आर्थिक लेखाजोखा, लेखा परीक्षण अहवाल सभागृहात सादर केला. त्यावर साधकबाधक चर्चा करून त्याला एकमुखाने आवाजी मतदानाने मंजूरात देण्यात आली तसेच अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले
यावेळी राज्याचे नवनिर्वाचित कोषाध्यक्ष प्रकाश चतरकर यांनी सत्काराला उत्तर देतांना त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही दिली तसेच आपल्या निवडीसाठी संघटनेचे संस्थापक आमदार मा. संजयजी केळकर, मार्गदर्शक मा.डॉ. रणजीतजी पाटील, राज्याध्यक्ष मा. राजैशजी सुर्वे, कार्यवाह मा. संजयजी पगार तथा उपस्थित सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले
यावेळी राज्य कार्यकारी अध्यक्ष श्री बाबुराव गाडेकर , राज्य सल्लागार श्री सुधाकर मस्के, श्री सुनील केणे, कार्याध्यक्ष श्री बाबुराव पवार, श्री भरत मडके, श्री राजेंद्र जायभाय, विजय पाटील वाकोडे, श्री मंगेश जैवाल, श्री.दिलीप पाटील, श्री आबा बच्छाव, चंद्रपूर श्री .अमोल देठे, अकोला श्री.सचिन काठोळे, अमरावती श्री .शैलेश चौकसे, नगर श्री .संतोष खामकर, नाशिक श्री .रमेश गोहील, धुळे श्री . गिरीश बागुल,( प्रभारी ), नंदुरबार श्री .धनंजय सूर्यवंशी, पालघर श्री .सुहास राऊत, ठाणे श्री .कृष्णकांत मलिक, रायगड श्री .विजय पवार, सातारा श्री .राजेश शिंगाडे, श्री छत्रपती संभाजीनगर श्री.श्रीराम बोचरे, परभणी श्री .आनंदा गारुड , हिंगोली श्री सचिन गायकवाड, लातूर श्री .चंद्रशेखर शिरोळे, बुलढाणा श्री .श्याम लांडे, जळगाव श्री .भिका सपकाळे, वाशिम , सिंधुदुर्ग श्री .गणेश नाईक, , वाशिम श्री .दिपक ठोबळे इत्यादी जिल्हाध्यक्षांसह जिल्हा कार्यवाह तथा जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी उपस्थित होते
खालील विभागीय पदाधिकारी उपस्थित होते.नाशिक विभागीय अध्यक्ष श्री.राजेंद्र जायभाये नगर, कोकण विभागीय अध्यक्ष श्री.बाळकृष्ण फर्डे, श्री.संदीप शिंदे, श्री.सुजित बनगर, मराठवाडा विभागीय पदाधिकारी श्री . भगवान जायभाये श्री.दिलीप गोरे, अमरावती विभागाचे श्री.गजानन देवके , संतोष वाघमारे, देवेंद्र वाकचवरे, संतोषराव इंगळे, राजेश मसने, संदिप मानकर, धर्मेद्रसिंह चव्हाण, चंद्रशेखर पेठे, मनोज वाडकर, अनिल भाकरे, प्रशांत कठाळकर, शिवशंकर अस्वार, निलेश शेगोकार, अमित सुरपाटणे, सत्येंद्रसिंह राजपूत यांचेसह राज्यभरातील बहुसंख्य सभासदांची उपस्थिती होती
सदर सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली महत्त्वपूर्ण विषयांवर अनेक पदाधिकारी यांनी आपले मत मांडले सर्वच विषयांवर साधकबाधक चर्चा करून निर्णय घेण्यात आले आजच्या सभेचे नियोजन व व्यवस्थापन राज्य कार्यकारी अध्यक्ष मा. बाबुरावजी गाडेकर यांचे मार्गदर्शनात छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष श्रीराम बोचरे तथा संपूर्ण कार्यकारणी पदाधिकारी यांनी अंत्यंत यशस्वीरीत्या पार पाडले त्याबद्दल राज्य कार्यकारिणीचे वतीने त्यांचे आभार मानण्यात आले राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली