सोमवार :
सोमवारी जन्मलेली व्यक्ती गोड बोलणारी व शांत स्वभावी असते. ही व्यक्ती मोठ्यांचे अनुकरण करणारी, उदार आणि व्यवहारज्ञानी असते.
मंगळवार:
मंगळवारी जन्मलेली व्यक्ती वाचाळ, खोटं बोलणारी, तापट आणि भांडायला सदैव तत्पर असते. ही व्यक्ती शेतीच्या कामात रस घेणारी असते.
बुधवार:
बुधवारी जन्मलेली व्यक्ती रूपवान असून शालजोडीतले मारणारी असते. ही व्यक्ती दुसर्यांचे गुण अवगुण पारखणारी, मस्करीत हुशार आणि व्यवसायात डोकं खुपसणारी असते.
गुरुवार :
गुरुवारी जन्मलेली व्यक्ती हुशार, अभ्यासू, मनमिळाऊ, आणि स्वतःच्या गुणांमुळे सगळ्यांकडून सन्मान मिळवणारी असते.
शुक्रवार :
शुक्रवारी जन्मलेली व्यक्ती कुरळ्या केसांची, आकर्षक राहणारी, मर्यादा राखणारी, आणि उच्च पदावर असते.
शनिवार:
शनिवारी जन्मलेली व्यक्ती हुशार, बुद्धिवंत, कर्तृत्ववान प्रेमळ असते. ही व्यक्ती सर्वांना आवडणारी असते.
रविवार :
रविवारी जन्मलेली व्यक्ती मनस्वी असते. आवडीने निवडलेल्या प्रत्येक क्षेत्रात ही व्यक्ती यशस्वी होते. ही व्यक्ती बहादूर, उत्साही आणि दानशुर असते.
