वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क

मूर्तिजापूर : सृजन साहित्य संघाचे सातवे साहित्य संमेलन स्व. गजेश तोंडरे साहित्य नगरीमध्ये आयोजित करण्यात आले होते. उद्घाटन समारंभामध्ये उद्घाटक म्हणून डॉ. चिंतामण कांबळे, संमेलनाध्यक्ष विनय मिरासे, स्वागताध्यक्ष रवी राठी त्याचप्रमाणे अतिथी म्हणून किरण अग्रवाल, सुरेश पाचकवडे, पुष्पराज गावंडे, अभयसिंह मोहिते, डॉ.आशीष खासबागे, श्याम कोल्हाळे, रंजना तोंडरे आदी मान्यवर उपस्थित होते.
दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनानंतर उपस्थित अतिथींचे स्वागत करण्यात आले. रवींद्र जवादे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सामाजिक व सांस्कृतिक कार्यात महत्त्वाची भूमिका असणाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला . रामकृष्ण
आसरे, विनोद महल्ले, ह.बा. खंडारे यांच्या पुस्तकासह सागर लोडम यांनी काढलेला संमेलन विशेषांक सा. व-हाडवृत्तचेही प्रकाशन याप्रसंगी करण्यात आले.
यावेळी झालेल्या भाषणांमधून माणूस व माणसाचे जगणे हाच साहित्याचा केंद्रबिंदू असायला पाहिजे, हा सूर व्यक्त करण्यात आला. __संमेलध्यक्ष विनय मिरासे यांनी साहित्यिकांनी समाजाच्या व्यथा, वेदना लेखनात प्रतिबिंबित व्हायला हव्यात, ही अपेक्षा साहित्यिकांकडून केली. याप्रसंगी तृतीयपंथी नेहा गुरू दिलजान यांची आशा मुडे, मीना जवादे यांनी घेतलेली मुलाखत खास रंगली. या सत्राचे संचालन प्रा.योगीता चिंचे व आभार नीलिमा आष्टीकर यांनी मानले. याप्रसंगी रामकृष्ण गावंडे व गुरुदेव सेवा मंडळाची ग्रंथदिंडी आकर्षण ठरली. गोपाल पवार यांचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यावरील चित्र प्रदर्शन उल्लेखनीय ठरले.
यानंतर प्रमोद पंत यांच्या अध्यक्षतेखाली रंगलेले कविसंमेलन व संदीप वाकोडे यांनी अध्यक्ष म्हणून भूषवलेला बहारदार गझल मुशायरा संपन्न झाला. या कार्यक्रमांचे संचालन पवन नालट व अमोल गोंडचवर यांनी केले.
शेती – मातीसंबंधी परिसंवाद चांगला रंगला. प्रा.बाळकृष्ण रोकडे, उषा भोपळे यांनी विचार मांडले. याप्रसंगी प्रा.अविनाश बेलाडकर यांनी, साहित्यामध्ये शेतीच्या व्यथेचे उपायात्मक प्रतिबिंब साहित्यात पडल्याची नोंद अध्यपदावरून नोंदवली. समारोपीय कार्यक्रमामध्ये योगीता वानखडे, वनिता गावंडे यांनी साहित्य विचार मांडले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद पंत, किशोर आष्टीकर, वर्षा कावरे, विष्णू लोडम, विलास वानखडे, गजानन मोहरीर, प्रदीप येसनकर, संजना पंत, आसावरी पंत, विद्या गोसावी, तृप्ती उंबरकर, सुनील ढोकणे, शैलेश गिरी यांनी परिश्रम घेतले.