शिर्ला (अंधारे) येथील ज्येष्ठ कवी नारायण अंधारे यांना साहित्य क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या अंकुर साहित्य संघाचा वाड्.मय पुरस्कार 2022 जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचे वितरण दि. 23 डिसेंबरला गुरुकृपा मंगल कार्यालयात संत तुकाराम चौक अकोला येथे ६१ व्या अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलनात मान्यवरांचे हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येईल ‘गुण गातो आवडीने’ हा कवी अंधारे यांचा दुसरा काव्यसंग्रह असून त्यांचे चार कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘कैवल्याचे लेणे’ (२०२१) ‘कांचनछाया’ (२०२२) ‘ज्येष्ठांचा मी सांगाती’ (२०२३) अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधून निवृत्त झाल्यानंतर ते ज्येष्ठ नागरिक चळवळीत सक्रिय झाले चळवळीमधूनच ते लिहिते झाले, शिर्ला येथील श्री सोमपुरी महाराज ज्येष्ठ नागरिक संघ आणि अकोला जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती, जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे ते जिल्हा अध्यक्ष आहेत.