वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क.
…………………………………………………………………………………….……………………………………………………………………………………………
अंबड : खरे धर्मप्रसारक बहुरूपी शासनाच्या योजनांपासून वंचित आहेत. अशी खंत बहुरूपी मुकुंदा शिंदे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असलेला बहुरूपी समाज हा परंपरागत आपले गाव सोडून इतर अन्य कोणत्याही गावोगावी भटकंती करून विविध वेशभूषा व रंगभूषांनी स्वत:चे शरीर सजवून हिंदू धर्माच्या श्रीराम, भोलेनाथ, बजरंगबली आशा अनेक देवतांचे हुबेहूब रूप धारण करून हिंद धम च्यिा देवतांची लहान मुलापासून ते सर्वसामान्यांपर्यंत आठवण करून दर्शन देतात. सदरचे बहुरूपी हे हिंदू धर्मप्रसाराचे काम करणारे व्यक्ती व्यक्ती असून त्यांना प्रत्येक शहरातील मुख्य बाजारपेठेत व प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन आपल्या सजविलेल्या शरिराचे प्रदर्शन करावे लागते. दिवसभर भटकंती करून दारोदार भटकंती केल्यानंतर जे मिळेल त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. सदरील बहुरूपी हे शासनाच्या अनेक विविध योजना व अनुदानापासून वंचित असल्याची व्यथा श्री राम भक्त बजरंगबलीच्या वेशात इच्छापूर्ती श्री साईबाबा मंदिर, पाचोडरोड अंबडजि.जालना येथे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी व भिक्षा म गण्यासाठी आलेल्या एका बहुरूपी मुकुंदा विनायक शिंदे रा, नरसाळा जि. यवतमाळ यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, आम्ही या गावाहून दसऱ्या गावी धर्माचा प्रसार आणि प्रचाराचे करीत भटकंती करून आम च्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. यादरम्यान आम्हाला आमच्या मुली – मुलांचे शिक्षण सुद्धा पूर्ण करता येत नाही. महाराष्ट्र शासनाच्या अथवा केंद्र शासनाच्या कोणत्याही अनुदान योजनेचा आजपर्यंत लाभ मिळालेला नाही. आमचे समाजात संघटनात्मक असा कोणताही मोठा नेता अथवा कार्यकर्ता नसल्यामुळे आमच्या व्यथा सरकार दरबारी मानल्या जात नाहीत ही मोठी शोकांतिका आहे. दरम्यान मांडलेल्या या व्यथा आधारे महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाने या बहुरूपी समाजाच्या व्यक्तींना शासनाच्या कोणत्या ना कोणत्या शासकीय योजनेतून अनुदान देऊन त्यांच्या मुला-बाळांच्या शैक्षणिक विकासाचा व घरकुल योजनेतून पक्की घरे बांधून देऊन जोडधंदा म्हणून उदरनिर्वाहासाठी रोजगाराचा मार्ग शोधून काढावा अशी अपेक्षा या बहुरूपी समाजाकडून होत आहे.