वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
भाडेकरार म्हणजे काय?
भाडेकरार हे एक कायदेशीर कंत्राट आहे, जे मालमत्तेचे मालक आणि तेथे राहू इच्छिणारे भाडेकरू यांच्यादरम्यान केले जाते. अर्थात, आपण या कायदेशीर दस्तावेजावर जास्त लक्ष देत नाही; परंतु आपण त्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. करारनामा हे एक महत्त्वाचे कायदेशीर दस्तावेज/ कंत्राट आहे, ज्यात मालमत्ता भाड्याने देण्याबाबतची सर्व माहिती, अटी, शर्ती आणि बाबींचा समावेश असतो. त्यात अनामत ठेव, तुमचे मासिक भाडे, मालमत्तेबाबतची माहिती जसे आकारमान, पत्ता, स्वरूप आणि अर्थातच करारनाम्याचा कालावधी याबाबी समाविष्ट असतात. तुम्ही भाडेकरारनाम्यावर स्वाक्षरी करण्यापूर्वी करार, नियम आणि त्यातील कलमे वाचलेली असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वैध भाडेकरार कसा निष्पादित करावा?
भाडेकराराचा कालावधी १२ महिन्यांपेक्षा जास्त असल्यास तो नोंदणी कायदा १९०८ नुसार नोंदणीकृत केला गेला पाहिजे. कालावधी १२ किंवा ११ महिन्यांपेक्षा कमी असल्यास भाडेकरार नोंदणीकृत करणे आवश्यक नाही. स्टॅपपेपरवर करारनामा लिहून त्यावर स्वाक्षरी करणे पुरेसे आणि कायदेशीर ठरते.
भाडेकराराचा कालावधी एक वर्षापक्षा कमी असल्यास मालमत्ता ज्या ठिकाणी स्थित आहे, त्या परिसरातील उपनिबंधक कार्यालयातून प्राप्त झालेल्या स्टॅपपेपरवर भाडेकरार छापलेला असला पाहिजे. या पृष्ठाच्या वरच्या बाजूला असलेल्या ‘डाऊनलोड’चा पर्याय निवडून तुम्ही स्टॅपपेपरवर छापणे आवश्यक असलेल्या भाडेकराराचा नमुना डाऊनलोड करू शकता.
भाडेकरार स्टॅपपेपरवर छापण्यात आल्यानंतर स्टॅपपेपरच्या प्रत्येक पानाच्या तळाशी मालक आणि भाडेकरूंनी स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. तो कायद्याने बंधनकारक होण्यासाठी करारनाम्यावर दोन साक्षीदारांच्या सह्या, त्यांची नावे आणि पत्ते असणे गरजेचे आहे.
भाडेकराराचा कालावधी १२ वर्षे किंवा अधिक असल्यास भाडेकरार स्टॅपपेपरवर छापून संबंधित प्रदेशाच्या उपनिबंधकाच्या कार्यालयात नोंदणीकृत केला गेला असला पाहिजे. मालक आणि भाडेकरू या दोघांनीही स्वतः उपनिबंधकांच्या कार्यालयात उपस्थित राहून करारनाम्यावर स्वाक्षरी केली पाहिजे. भाडेकरार छापील असलेल्या स्टॅपपेपरवर त्या दोघांनीही करारनाम्याच्या प्रत्येक पानाच्या तळाशी निबंधकांसमोर स्वाक्षरी करणे गरजेचे आहे. स्टँपपेपरवर दोन साक्षीदारांची स्वाक्षरी असली पाहिजे आणि आवश्यक रकमा भरण्यात आल्यानंतर नोंदणी करण्यात यावी. भाडेपट्टा आणि भाडेकरार यांच्यातील फरक
भाडेपट्टा आणि भाडेकरार यांच्यामधील मुख्य फरक म्हणजे कराराच्या कालावधीचा आहे. भाडेकरार सामान्यतः कमी कालावधीचा म्हणजे एक महिना, ६ महिने, १२ महिने आणि १८ महिने अशा प्रकारचा असतो तर भाडेपट्ट्यात ९९ वर्षे अशा दीर्घकालीन कालावधीचा समावेश असतो. या दोन्हींमध्ये अनेक बाबी समानही आहेत. जसे सुरक्षा अनामत रक्कम नमूद करणे, भाड्याची रक्कम, वीज आणि देखभाल खर्च आणि जबाबदाऱ्या, वापराचे नियम, पाळीव प्राण्यांना परवानगी इत्यादी. ११ महिन्यांच्या भाडेकरारनाम्याचे स्वरूप एका निश्चित कालावधीसाठी भाडेकरार केला जातो, तेव्हा त्या स्वरूपात पूर्वनिश्चित केलेल्या सर्व अटी आणि शर्ती नमूद केलेल्या असतात. उदाहरणार्थ, ११ महिन्यांच्या भाडेकराराच्या स्वरूपात खालील गोष्टी समाविष्ट असतात, त्यात करारनामा कोणी निष्पादित केला, कोणत्या दिवशी निष्पादित केला, भाडेकरू आणि मालकांचे तपशील, ठरवलेले भाडे, मालमत्तेच्या वापराचा हेतू तसेच भाडेकरू आणि मालकांसाठी जागा रिकामी करण्याचा सूचना कालावधी अशा अनेक गोष्टी थोडक्यात नमूद केलेल्या असतात. नोंदणीकृत भाडेकरारनामा स्वरूप आधी नमूद केल्याप्रमाणे नोंदणीकृत भाडे करारनामा स्वरूपात भाडेकरू आणि मालकाचे तपशील, भाड्याच्या व्यवस्थेच्या अटी आणि शर्ती तसेच कालावधीचा उल्लेख म्हणजे करारनाम्यांतर्गत ११ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी याबाबी असतात. तुम्हाला सार्वजनिक नोटरीकडून नोटराइज्ड स्वाक्षरीची तसेच नोंदणी करण्यासाठी स्टॅपपेपरचीही गरज भासेल. वाणिज्यिक भाडे करारनाम्याचे स्वरूप एका वाणिज्यिक भाडेकरारनामा किंवा भाडेपट्ट्यात व्यावसायिक भाडेकरू आणि वाणिज्यिक मालमत्तेचे मालक यांच्यादरम्यान कायदेशीररित्या बंधनकारक करार असतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या नवीन स्टार्टअपसाठी एक कार्यालयीन जागा भाड्याने द्यायची असल्यास किंवा दीर्घकालीन कंत्राटी कालावधीसाठी मोठ्या जागेत स्थलांतरित व्हायचे असल्यास या प्रक्रियेत तुम्ही वाणिज्यिक भाडेकरारनामा करणे सक्तीचे आहे.
भारतात राहू इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी भाडेकरार नोंदणीकृत करणे सक्तीचे आहे. मग ते मालक/ जमीनमालक असोत किंवा राहण्यासाठी जागा शोधणारे भाडेकरू असोत. निवासी किंवा वाणिज्यिक किंवा इतर कोणत्याही जागेसाठी असेल. भारतात भाडेकरारनामा नोंदणीकृत करण्यात खालील टप्पे आहेत. एका वर्षापेक्षा अधिक कालावधीचे भाडेकरार नोंदणीकृत करणे महत्त्वाचे आहे आणि एक वर्षापेक्षा अधिक कालावधीचे भाडेकरार (म्हणजे ११ महिन्यांपेक्षा कमी कालावधी) पब्लिक नोटरीकडून मुद्रांक शुल्कासह नोटराइज करणेही महत्त्वाचे आहे. भारतातील पहिले प्रॉपटेक युनिकॉर्न नोब्रोकर डॉटकॉमने याबद्दल अधिक माहिती दिली आहे.
भाडेकरार कसा तयार करावा
१.भाडे आणि सुरक्षा अनामतीशी संबंधित आवश्यक त्या कलमांसह भाडेकराराची एक रूपरेखा तयार करावी.
२.निश्चित मूल्याच्या स्टॅपपेपरवर भाडेकरार छपाई करून घ्यावा.
३. भाडेकराराच्या ठरवून दिलेल्या ठिकाणी भाडेकरू आणि मालक या दोघांच्याही स्वाक्षरी घ्याव्यात.
४. योग्य त्या ठिकाणच्या उपनिबंधकांच्या कार्यालयात भाडेकरू आणि मालकांना घेऊन जावे.
५. वैयक्तिक पडताळणी आणि वैधता यांच्यासाठी पासपोर्ट आकाराची छायाचित्रे आणि ओळखपत्रे यांची एक प्रत सोबत न्यावी.
६. मुद्रांक शुल्क भरल्यावर भाडेकराराची नोंदणी पूर्ण होईल. मालमत्तेचे मूल्य किंवा भाड्याची रक्कम कितीही असली तरी शुल्क सामान्यतः ११०० रुपये असते.