हिवाळ्यात अंगदुखी आणि थंडीशी संबंधित अनेक आजार होतात. गोड गूळ जेवढा चवीला चांगला असतो, तेवढाच तो आरोग्यासाठीही फायदेशीर असतो. हिवाळ्यात गूळ तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून दूर ठेवू शकतो. या नैसर्गिक स्वीटनरमध्ये भरपूर पोषक असतात. १० ते २० ग्रॅम गूळ अनेक आजारांपासून बचाव करतो.
आकडेवारी दर्शवते की, भारत हा गुळाचे मुख्य उत्पादक देश आहे. गुळाला ‘औषधी साखर’ असेही म्हणतात. असे म्हटले जाते की, सुमारे ३००० वर्षांपासून आयुर्वेदिक औषधांमध्ये गोडपणा जोडण्यासाठी गूळ वापरला जात आहे, घसा आणि फुफ्फुसाच्या संसर्गाच्या उपचारात गूळ फायदेशीर मानला जातो. पंजाबच्या बेबेज आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे आयुर्वेदाचार्य प्रमोद आनंद तिवारी यांनी सांगितले की, हिवाळ्यात गूळ खाल्ल्याने अनेक
फायदे होतात. रोज गूळ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती तर वाढतेच, पण संसर्गापासूनही बचाव होतो. गूळ ही गुणांची खाण आहे. यामध्ये झिंक, मॅग्नेशियम, आयर्न, पोटॅशियम सोबतच असते. गुळाचे नियमित सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीराला संसर्गापासूनही संरक्षण मिळते. गुळाचा तापमानवाढीचा प्रभाव असतो, त्यामुळे हिवाळ्यात खोकला आणि सर्दी झाल्यास गूळ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. गुळाचा चहा प्यायल्याने ताजेपणा येतो आणि आळस दूर होतो. हिवाळ्यात गूळ खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. यामुळे पचनक्रियाही सुधारते. आयुर्वेदामध्ये, गुळाचा उपयोग श्वसनाच्या समस्यांसह अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी तसेच रक्त शुद्ध करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी केला जातो, असेही आयुर्वेदाचार्य प्रमोद आनंद तिवारी म्हणाले.

फुफ्फुसाच्या संसर्गात आराम
गूळ फुफ्फुसाचा संसर्ग कसा टाळतो किंवा त्याची काळजी कशी घेतो हे सांगताना तिवारी म्हणाले, गुळ फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासही मदत करतो. खरं तर त्याच्या अँटी-अलर्जिक गुणधर्मांमुळे, फुफ्फुसांमध्ये अॅलर्जी निर्माण करणाऱ्या घटकांना वाढू देत नाही. या घटकांमुळे फुफ्फुसांमध्ये अडचण येते. श्वासोच्छ्वासाच्या समस्या आणि खोकल्यासारख्या समस्यांमध्ये नियमितपणे गुळाचे सेवन केल्याने श्वसनाच्या समस्यांपासून आराम मिळतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गुळात डिटॉक्सिफायिंग गुणधर्मदेखील आहेत. जे शरीराला हानी पोहोचवणारे विषारी घटक काढून टाकतात. त्यात लोहदेखील भरपूर असते ज्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढते. यामुळे रक्त शुद्ध राहते.