वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
साेमवार २६ सप्टेंबरपासून नवरात्र सुरू होत आहे. हे लक्षात घेऊन रा. प. महामंडळातर्फे साेमवार २६ सप्टेंबरपासून विशेष देवी दर्शन बस सोडण्यात येणार आहे. ही बस अकोला जुन्या बस स्थानकावरून सकाळी ८ वा निघून ८.३५ वा बाळापूर येथील बाळादेवी मंदिरावर पोहाेचेल. तिथे बाळादेवीचे दर्शन झाल्यावर ९.२० वाजता बस निघून पातूर येथील रेणुका माता मंदीरावर सकाळी १०.०५ वाजता बस पोहाेचेल. पुढे रेणुकामातेचे दर्शन घेऊन १०.५० वाजता बस निघून राजनखेड मार्गे रुद्रायणी देवी येथे सकाळी ११.२० वा पोहाेचेल. या ठिकाणी भाविक देवीचे दर्शन घेतील.
तसेच डबे खाण्यासाठी विश्रांती देऊन बस १२.५० ला बस दोनद येथील आसरा माता देवीच्या दर्शनाकरता निघेल. दोनद येथे आसरा मातेचे दर्शन घेऊन २.२५ वाजता बस काटेपूर्णा येथील ढगा-चंडिका देवी दर्शनाकरता निघेल, चंडिका देवीचे दर्शन झाल्यावर बस ३.५० वाजता निघून ४.३० वाजता अकोला जुने बस स्थानक येथे पोहाेचेल.
- विशेष देवी दर्शन बस सेवेचा लाभ घ्या : या विशेष देवी दर्शन बसमुळे भाविकांना एकाच दिवसात ५ देवीमातेचे दर्शन करण्याची संधी मिळणार आहे. या संपूर्ण प्रवासाचे भाडे मोठ्यांसाठी २६० रुपये तर लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी १३० रुपये आकरण्यात येणार आहे. भाविकांनी माेठ्या संख्यने महामंडळाच्या विशेष देवी दर्शन बस सेवेचा लाभ घ्यावा. पी. बी. बुंदे, आगार व्यवस्थापक अकोला आगार क्र.१