वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
माहिती आणि तंत्रज्ञानाच्या जागतिक महामार्गावर पिछाडीवर पडलेल्या भारताला गतिमान करण्यासाठी इंटरनेटच्या गतीचे एक वादळ येऊ घातले आहे. भारतामध्ये फाईव्ह-जी मोबाईल सेवेच्या शुभारंभाचा अवघ्या काही दिवसांत (ऑक्टोबर) नारळ फोडण्याची जय्यत तयारी सुरू आहे. ही सेवा कार्यान्वित होताच फाईव्ह-जी मोबाईलधारकांना सध्याच्या सुमारे ५० पट इतके म्हणजे १५० एमबीपीएस इतक्या गतीने माहिती डाऊनलोड करता येणे शक्य होणार आहे.
भारतामध्ये सध्या मोबाईलासाठी ४-जी सेवेचा वापर केला जातो. स्पीड टेस्ट या मोबाईलच्या गतीचे नियंत्रण आणि मापन करणाऱ्या संस्थेच्या माहितीनुसार या सेवेमध्ये डाऊनलोडची सरासरी गती अवधी ३.२ एमबीपीएस इतकी आहे. जे मोबाईलधारक फाईव्ह-जी हँडसेटचा वापर करतात, त्यांना फोर-जी सेवेद्वारे तुलनेने ३० ते ३५ टक्के अधिक गती मिळते. पण इंटरनेटच्या जागतिक गतीचा विचार करता भारतात जागतिक सरासरीच्या निम्म्याहून कमी गती आहे आणि या मानांकनात भारताचा ११७ वा क्रमांक लागतो.
माहिती व तंत्रज्ञानाच्या या लंगड्या बाजूने भारतातील प्रगतीच्या मार्गामध्ये हा सर्वात मोठा अडथळा होता. त्याला दूर करण्यासाठी भारतात फाईव्ह-जी स्पेक्ट्रमचे लिलाव झाले. त्यानंतर वर्षभरात ही सेवा भारतात उपलब्ध होईल, अशी अटकळ होती. परंतु, या क्षेत्रातील कंपन्यांनी त्याच्या पायाभूत सुविधांची अल्पावधीत उभारणी करून विहित काळापूर्वीच आपली सज्जता केली आहे.
टेलीकॉम कंपन्यांची सज्जता
तथापि, जसजशी ग्राहक संख्या आणि उपयोग वाढत जाईल, तसतशी गती कमी होईल. परंत. यातील प्रमख कंपन्यांच्या सूत्रानुसार १० कोटी ग्राहक संख्येसाठी स्थिर प्रमाणात सरासरी ६० एमबीपीएस गती उपलब्ध होईल, असे नियोजन आहे. कंपन्यांनी पायाभूत सुविधांच्या रचनेमध्ये, टॉवर्सच्यासंख्येमध्ये वाढ केली,तर सरासरी १०० एमबीपीएस स्पीड ग्राहकांना मिळू शकते. याखेरीज ही सेवा दोन वर्षांत देशाच्या ग्रामीण भागातील कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचेल. असेही नियोजन आहे.१३ मेट्रो सिटीत सेवा ऑक्टोबरच्या मध्यावर ही सेवा देशातील १३ महत्त्वाच्या शहरांमध्ये सर्वप्रथम सुरू करण्याचे नियोजन आहे. यामध्ये अहमदाबाद, बंगळूर, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गाझियाबाद, गुरगाव, हैदराबाद, जामनगर, कलकत्ता, लखनौ, मुंबई आणि पुणे या शहरांचा समावेश आहे. या शहरातील फाईव्ह-जी सेवेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना १५० ते २०० एमबीपीएस विलक्षण इतक्या गतीने माहिती डाऊनलोड करण्याचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी ३.५ गिगाहर्टस् इतकी बँडविड्थ उपलब्ध आहे.