सध्याच्या युगात जाहिरात व मार्केटिंग क्षेत्राने कोणत्याही इंडस्ट्रीमधील एखादे निश्चित प्रॉडक्ट असो वा सेवेला यशाच्या शिखरावर पोहचवले आहे. दरम्यान, या यशात प्रॉडक्ट वा सेवेची गुणवत्तेचे देखील तेवढेच महत्त्व असते; पण या प्रॉडक्ट्सवरील प्रिंटेड (छापील) छायाचित्रे ही देखील लोकांच्या मनात घर निर्माण करतात, मग ते मासिकांचे मुखपृष्ठ असो वा रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात येणारे मोठमोठे होर्डिंग्स. प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा या सर्वांच्या मागे हात असतो. प्रिंटिंग टेक्नॉलॉजीबाबत असंख्य | जणांना प्राथमिक माहिती असेलच. हे क्षेत्र तसे सर्वांच्या ओळखीचे; पण या आधुनिक युगात तंत्रज्ञानाच्या जोरावर या क्षेत्राने झेप घेतली आहे. त्याच अनुषंगाने आज आपण प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमधील डिप्लोमाबाबत काही प्राथमिक माहिती जाणून घेणार आहोत.
प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमधील डिप्लोमा हे आपणास चांगले अॅनालिटिकल स्किल्स (विश्लेषणात्मक कौशल्य), अचूकता आणि वेगाने बदलणारी मानसिकता विकसित करण्यास मदत करते. टेक्नॉलॉजीच्या प्रगतीमुळे प्रिंटिंग टेक्नॉलॉजी कोर्समधील डिप्लोमा हा करिअरसाठी फायद्याचा ठरतो. हा कोर्स पूर्णतः प्रिंटिंग टेक्नॉलॉजीच्या प्रक्रियांवर आधारित असतो. आज आपण त्याचीच तोंडओळख करून घेणार आहोत.
डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी म्हणजे काय?
डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी कोर्सचा कालावधी हा तीन वर्षांचा असतो. या कोर्समध्ये आपण प्रिंटिंग प्रेसचे संचलन, त्याला कोणत्या प्रकारे डिझाइन करण्यात आले आहे आणि इंजिनिअरिंगच्या माध्यमातून आपण प्री-प्रेस प्रक्रिया व पोस्ट प्रेस प्रक्रियेसह प्रिंटिंग टेक्निकच्या सर्व मुलभूत प्रक्रियांचा देखील यात आढावा घेतो. हा कोर्स केल्यानंतर आपण त्या सर्व छोट्या-मोठ्या ठिकाणी कार्यरत होऊ शकतो, जिथे प्रिंटिंगशी निगडीत कार्य पार पडते. जसे की, प्रिंटिंग प्रेस, कमर्शियल प्रिंटिंग प्रेस, पॅकेज प्रिंटिंग प्रेस व सरकारी प्रिंटिंग प्रेस इत्यादी.
हा डिप्लोमा का निवडावा?
डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी कोर्स निवडण्याचे काही कारणे आहेत.
● जसे की, आपण देखील नवे टेक्निकमधील रिसर्च आणि डेव्हलपमेंट प्रक्रियेबाबत आवड राखता, तर हा कोर्स आपल्यासाठीच साकारण्यात आला आहे.
● जर नाविन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी क्रिएटिव्ह व एक आगळी-वेगळी मानसिकता आपली असेल, तर हा कोर्स नक्की निवडावा.
● जर आपण इंडस्ट्रीमध्ये प्रगत तंत्रज्ञानाने साकारलेल्या मशीन व सॉफ्टवेअरवर काम करू इच्छिता.
● हा कोर्स केल्यानंतर आपण आपले विचार छायाचित्रांच्या माध्यमातून लोकांसमोर मांडू शकता.
● जरी या आर्टिफिकल इंटेलिजन्सने मागील काही वर्षांत आपले वर्चस्व वाढवले असले, तरी या क्षेत्रात आपल्याकडे पर्यायाची कोणतीच कमतरता नाही.
कौशल्य
डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजीसाठी काही कौशल्य आवश्यक असतात. जी आपणास पुढे करिअरच्या वेळी कामी येतात. जसे की, ग्राफिक डिझायनिंग, कम्युनिकेशन स्किल्स, डेस्कटॉप पब्लिशिंग वर्क, इमेज रिप्रोडक्शन टेक्निक, प्रिंटिंग मटेरिअल सायन्स आणि क्वालिटी टेस्टिंग, प्रिंटिंग प्रक्रिया व त्याचे मशिनरी ऑपरेशन, स्पेशलिटी आणि सिक्युरिटी प्रिंटिंग, पोस्ट प्रिंटिंग फिनिशिंग वर्क, प्रिंटिंग क्वालिटी कंट्रोल, प्रोजेक्ट हँडलिंग इत्यादी.
तसं पाहता मित्रांनो, आपल्याला प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमधील डिप्लोमा कोर्स करायचा असेल, तर दहावीमध्ये ५५ टक्क्यांपेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण व्हावे लागेल. दहावीनंतर देखील आपण या कोर्ससाठी अर्ज दाखल करण्यास पात्र असता. तिथे काही कारणास्तव हुकलात, तर अकरावीत बिजगणिताचा विभाग निवडत आपण बारावीचे शिक्षण पूर्ण करावे व या कोर्ससाठी अर्ज दाखल करावा. डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी कोर्स ऑफर करणाऱ्या कोणत्याही संस्थेची निवड करत त्यात प्रवेश घ्यावा. अशा असंख्य संस्था असतात, ज्या साऊंड इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमाची ऑफर देतात. आपण डिप्लोमाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी अर्ज दाखल करू शकता.
अभ्यासक्रम
डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये शिकवण्यातयेणारा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे:
फेस द वर्ल्ड स्किल्स १
इंग्लिश कम्युनिकेशन १
स्पोर्ट्स आणि योग अप्लाइड मॅथेमॅटिक्स १ बेसिक इंजिनियरिंग ग्राफिक्स इंट्रोडक्शन टु प्रिंटिंग प्रोसेस
डेस्कटॉप पब्लिशिंग
वर्कशॉप प्रोजेक्ट
फेस द वर्ल्ड स्किल २
बेसिक सायन्स
इंट्रोडक्शन टु कॉम्प्युटर
ग्राफिक डिझाइन
इमेज रिप्रोडक्शन टेक्नॉलॉजी
पात्रता
जर आपण इयत्ता दहावीच्या आधारे येथे प्रवेश घेऊ इच्छिता, तर आपणास कमीत कमी ५५ टक्के गुण असावेत, तसेच उमेदवाराला बारावीच्या पार्श्वभूमीवर प्रवेश घ्यायचा असेल, तर ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असावेत. प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमधील डिप्लोमा कोर्सच्या प्रवेशासाठी काही परीक्षांचे आयोजन करतात. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थी डिप्लोमासाठी पात्र ठरतो. कोणत्याही विद्यापीठात कोणत्याही कोर्ससाठी एसएटी / एसीटीची मागणी केली जाते. सोबतच परदेशातही हा डिप्लोमा कोर्स करता येतो, त्यासाठी आयईएलटीएस वा टीओईएफएल या प्रवेश परीक्षांच्या गुणाच्या आधारे प्रवेश मिळतो.
करिअर पर्याय
प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमधील डिप्लोमा प्राप्त केल्यानंतर असंख्य महत्त्वाच्या इंडस्ट्रीत आपण काम करण्यास पात्र ठरता. ज्यात न्यूज पेपर प्रिंटिंग प्रेस, कमर्शियल प्रिंटिंग प्रेस, पॅकेज प्रिंटिंग प्रेस, गव्हर्नमेंट प्रिंटिंग प्रेस, सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस, पब्लिशिंग हाऊस, अॅडव्हरटायजिंग एजन्सीस, पॅकेजिंग इंडस्ट्री, डिजिटल प्रिंटिंग कंपनीज इत्यादींचा समावेश येतो. तसेच, या क्षेत्रातील काही महत्त्वाच्या कंपनींचा विचार करता, त्यात नॅशनल काऊन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च, स्टेट टेक्स्टबुक कॉर्पोरेशन, श्रीजी प्रिंटिंग्स, नॅशनल बुक ट्रस्ट, वर्तमानपत्रे कार्यालय, सन ब्रेडिंग सोल्युशन्स, फ्लेक्सो इमेज ग्राफिक्स, मॅकमिलन पब्लिशर्स इंडिया प्राइव्हेट लिमिटेड, इंटीग्रेटेड प्लास्टिक पॅकेजिंग इत्यादी नामांकित क्षेत्रात आपण कार्यरत होऊ शकता. मित्रांनो, हे असे क्षेत्र आहे, ज्याची व्याप्ती ही आगामी काळात वाढतच जाणार आहे. सध्या या क्षेत्राची आपल्यास तोंडओळख जरी असली, तरी येथे कार्यरत मनुष्यबळ खूप कमी आहे. त्यामुळे येत्या काळात या क्षेत्रातील तंत्रज्ञानात बदल होत प्रशिक्षित मनुष्यबळाची नितांत गरज भासणार आहे. अशात हे क्षेत्र उत्तम करिअर घडवण्यासाठी तरुणांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.