सातपुड्यातील मेळघाटचे वनवैभव आणि आदिम संस्कृतीचे दर्शन घडविणारा नरनाळा महोत्सव 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले.
अकोट येथे झालेल्या बैठकीत महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रम, नौकाविहार, सफारी, पक्षीनिरीक्षण, आदिवासी नृत्यकला, तसेच साहसी खेळ यांची आखणी करण्यात आली. 13 वर्षांनंतर होणाऱ्या या महोत्सवासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पोपटखेड जलाशय व शहानूर परिसराची पाहणी केली.

महोत्सवासाठी आवश्यक रस्तेदुरुस्ती, सुविधा, सुसज्ज दालने यांची तयारी वेगाने करण्याचे आदेश देण्यात आले. व्यापक प्रसिद्धीसाठी व्हिडिओ, माहितीपट, फलक यांचा वापर करावा आणि स्वयंसेवी संघटनांचा सहभाग वाढवावा, असे निर्देशही देण्यात आले.
About The Author
Post Views: 82
