गर्भधारणेदरम्यान काही महिलांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, या स्थितीला गर्भधारणेतील मधुमेह (Gestational Diabetes) असे म्हणतात. या आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १० मार्च हा दिवस गर्भधारणेतील मधुमेह जागरूकता दिन म्हणून पाळला जातो.
गर्भधारणेतील मधुमेह वेळेवर ओळखला नाही तर आई व बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गर्भवती महिलांनी नियमित तपासणी करणे, डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार व व्यायाम पाळणे आणि आवश्यक असल्यास औषधोपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

या आजारामुळे बाळाचे वजन जास्त होणे, प्रसूतीदरम्यान गुंतागुंत निर्माण होणे तसेच भविष्यात आईला मधुमेह होण्याची शक्यता वाढू शकते.
गर्भधारणेतील मधुमेह (Gestational Diabetes) टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायगर्भधारणेदरम्यान आई व बाळाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी पुढील उपाय महत्त्वाचे आहेत
१)संतुलित आहार घ्या – ताज्या भाज्या, फळे, कडधान्ये, पूर्ण धान्य यांचा आहारात समावेश करा. साखर, गोड पदार्थ व जंक फूड कमी खावे.२)नियमित व्यायाम करा – डॉक्टरांच्या सल्ल्याने दररोज हलका व्यायाम किंवा चालणे (Walking) करावे.३)नियमित तपासणी करा – गर्भवती महिलांनी वेळोवेळी रक्तातील साखरेची तपासणी करून घ्यावी.४)वजन नियंत्रणात ठेवा – गर्भधारणेदरम्यान जास्त वजन वाढू नये यासाठी योग्य आहार व व्यायाम आवश्यक आहे.५)डॉक्टरांचा सल्ला घ्या – कोणतीही लक्षणे दिसल्यास किंवा कुटुंबात मधुमेहाचा इतिहास असल्यास डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.६)तणाव टाळा आणि पुरेशी झोप घ्या – मानसिक तणाव कमी ठेवणे व पुरेशी विश्रांती घेणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
या उपायांचे पालन केल्यास गर्भधारणेतील मधुमेहाचा धोका कमी होऊन आई व बाळ दोघांचेही आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होते.
सर्व गर्भवती महिलांनी शासकिय आरोग्य केंद्रात नियमित तपासणी करून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित मातृत्वाकडे वाटचाल करावी,. डॉ. बळीराम गाढवे जिल्हा आरोग्य अधिकारी अकोला.
