वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
युजर्ससाठी नवनवीन फीचर आणणारे व्हॉट्सअॅप आता आणखी एक सरप्राईज घेऊन येत आहे. हे फक्त गुप्ससाठी लागू होणार आहे. व्हॉट्सअॅप आपल्या जुन्या फीचरमध्ये एक अपडेट सादर करत आहे. ज्यामुळे १,०२४ मेंबर्स ग्रुपमध्ये जोडता येणार आहेत. सध्या हे बीटा वापरकर्त्यांसाठी सादर करण्यात आले आहे. जूनच्या सुरुवातीला, इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मने ग्रुपमध्ये ५१२पर्यंत मेंबर्स जोडण्याची सुविधा सुरू केली होती. आता समूहात एक हजारांहून अधिक लोकांना समाविष्ट केले जाऊ शकणार आहे. याशिवाय यूजर्सची प्रायव्हसी लक्षात घेऊन अनेक नवीन फीचर्स आणत आहे. कंपनी पेंडिंग ग्रुप पार्टिसिपंट फीचर आणत आहे. सध्या हे वैशिट्य डेव्हलपमेंटच्या टप्प्यात आहे. हे अॅप भविष्यातील अपडेटसह आणले जाईल.
About The Author
Post Views: 73