नकळत नियम तोडणाऱ्यांसाठी सुविधा
अलिकडे वाहतूक पोलिस चांगलेच सतर्क झाले आहेत. जवळपास प्रत्येक चौकात तुम्हाला एक तरी वाहतूक पोलिस कर्मचारी दिसून येईल एवढच नव्हे तर नियम तोडणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आता अनेक सिग्नलवर तसंच महामार्गावर ठिकठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. अनेकांकडून न कळत नियम तोडले जातात.
तुमचा कडून एखाद्या नियमाचं उल्लंघन झालं असेल तर आता तुम्हाला थेट इ-चलनच्या रुपात दंड आकारला जातो. बऱ्याचदा अनेकांना ई-चलन लागल्याची कल्पनादेखील नसते, जेव्हा ई- चलन लागल्याचा मेसेज येतो तेव्हा आपल्याला धक्का बसतो. तुम्हाला नेमकं चलन कधी आणि कोणत्या कारणासाठी लागलं आहे हे तपासता येऊ शकतं. यासाठी तुम्हाला फक्त काही स्टेप फॉलो कराव्या लागणार आहेत. घरबसल्याच तुम्ही ई-चलनचं स्टेटस चेक करू शकता तसचं तुम्हाला लागलेला दंड देखील भरू शकता. त्यासाठी तुम्हाला पोलिस स्टेशन किंवा परिवहन कार्यालयात चकरा मारण्याची गरज नाही. कारण तुम्ही जेवढे नियम मोडले असतील तेवढे ई-चलान हे तुमच्या नावे कापले गेलेले असतील. जे भरणं तुम्हाला बंधनकारक आहे. हे ई- चलान दिर्घकाळ न भरल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई देखील होवू शकते. हे टाळता येणार आहे.
चलान स्टेटस असं करा चेक यासाठी सर्वप्रथम तुम्हाला echallan.pari- vahan.gov.in या वेबसाइटवर जावं लागेल यानंतर वेबसाइटवरील Check Challan Status या पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला क्रिनवर चलान नंबर, वाहन नंहर आणि ड्रायव्हिंग लायसन्स नंबरचा पर्याय दिसेल. इथ वाहन नंबरच्या पर्यायावर क्लिक करा. इथं गाडीचा रजिस्टेशन नंबर टाका. त्यानंतर कॅप्चा कोड भरा. त्यानंतर ‘Get Detail’ या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला चलान निघालं आहे कि नाही हे कळू शकेल. याच वेबसाइटवरून तुम्ही ऑनलाइन ई- चलान भरू शकता. ई-चलान वेळेवर भरणं आवश्यक आहे. नाहीतर त्यामुळे तुमचं नुकसान होवू शकतं. कारण तुम्ही जेवढे नियम मोडले असतील तेवढे ई-चलान हे तुमच्या नावे कापले गेलेले असतील.