बुलढाणा: जिजाऊ माँसाहेबांचे पिताश्री राजे लखुजीराव जाधव यांचा समाधीस्थळ परिसर विकसित करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाच्या वतीने सिंदखेडराजा येथे उत्खनन सुरू आहे. या दरम्यान शेषनागावर पहूडलेल्या शंख, चक्र, गदाधारी श्रीविष्णूची अतिशय कलात्मक व पौराणिक मूर्ती आढळून आली आहे. श्रीविष्णूची चरणसेवेत बसलेली लक्ष्मी व सोबतच समुद्रमंथनाचे दृश्य साकारलेले दुर्मिळ प्रकारातील रेखीव […]