महाराष्ट्राला समाजसुधारकांची परंपरा लाभली असून समाजाच्या वैचारिक जडणघडणीत सुधारकांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. समाजसुधारणा ही विशिष्ट कालखंडात पूर्ण होणारी प्रक्रिया नाही. समाजाला सुधारणेचा विचार व योग्य दिशा देण्याबरोबरच भक्कम कृतीची साथ असावी लागते. समाजसुधारणेकरिता आवश्यक असलेली विचारक्रांती करायला प्रवृत्त झालेल्या गोपाळ गणेश आगरकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनविषयक मांडलेले विचार अतिशय मोलाचे आहेत. […]