भारतामध्ये सर्वप्रथम १५ ऑगस्ट १९७२ रोजी पिनकोड प्रणाली सुरू झाली. शहराची आणि गावाची अचूक ओळख व्हावी व पत्र किंवा पार्सलचे अचूक वितरण व्हावे, हा यामागील प्रमुख उद्देश होता. त्यावेळी दुसरी कोणतीच संसाधने उपलब्ध नसल्याने सहा अंकी पिनकोड अतिशय महत्त्वाचा समजला जायचा. वितरण प्रणालीमध्ये पिनकोड हा एकमेव पर्याय आणि आधार होता. […]