अनेक अलंकारांपैकी अंगठी हादेखील एक अलंकार असल्याने अनेकजण फॅशन म्हणून बोटात अंगठी घालतात, तर काहीजण आपल्या राशीनुसार अंगठी घालतात, मात्र अनेकवेळा | अंगठीमागचे वैदिक शास्त्र माहीत नसल्याने गफलत होते. या अर्धवट माहितीमुळे काहीजण कोणत्याही धातूची अंगठी कोणत्याही बोटामध्ये घालतात. ज्याचा विपरित प्रभाव त्यांच्या ग्रहस्थितीवर होतो. ज्योतिष शास्त्रानुसार हाताच्या पाचही बोटांवर विविध ग्रहांचा प्रभाव असतो त्यामुळे प्रत्येक बोटावर एक ठराविक धातूची अंगठी घालण्याचा सल्ला दिला जातो. ज्याचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर पडतो, पण यात जर चूक झाली तर संबंधित व्यक्तीला त्याचे परिणाम भोगावे लागतात. यासाठी कोणत्या बोटात कोणती अंगठी घालावी हे माहीत असायला हवे.
● अनामिका
अनामिका म्हणजेच रिंग फिंगरमध्ये तांब्याची अंगठी घालण्याचा सल्ला दिला जातो. या बोटावर सूर्य ग्रहाचा प्रभाव असतो.

● कनिष्ठा
कनिष्ठा म्हणजे करंगळीमध्ये चांदीची अंगठी घालण्याचा सल्ला दिला जातो. या बोटावर बुध ग्रहाचा प्रभाव असतो. या बोटामध्ये चांदीची अंगठी घातल्याने वैवाहिक जीवन सुखमय राहते.
• तर्जनी
शास्त्रानुसार, तर्जनीमध्ये नेहमी सोन्याची अंगठी परिधान करावी. कारण, तर्जनी बोटावर गुरु ग्रहाचा प्रभाव असतो. त्यामुळे या बोटामध्ये सोन्याची अंगठी परिधान करणं शुभ मानलं जातं. या बोटामध्ये सोन्याची अंगठी परिधान केल्याने सुख-समृद्धी प्राप्त
● मध्यमा
मध्यमा बोटामध्ये फक्त लोखंड या धातूची अंगठी परिधान करण्याचा सल्ला दिला जातो. या बोटावर शनी ग्रहाचा अधिक प्रभाव असतो. त्यामुळे या बोटामध्ये कधीही सोन्याची अंगठी परिधान करू नये. कारण यामुळे आयुष्यात नकारात्मकता वाढू शकते.
• अंगठा
ज्योतिष शास्त्रानुसार, अंगठ्यामध्ये चांदी किंवा प्लॅटिनमची अंगठी घालणं शुभ मानलं जातं. अंगठ्यावर शुक्र ग्रहाचा अधिक प्रभाव असतो. या बोटात अंगठी घातल्याने व्यक्ती तणावापासून दूर राहतो.