अकोल्यातल्या डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात देशातला पहिला आंतरराष्ट्रीय सेंद्रिय प्रमाणीकरण पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.पहिल्या ३० विद्यार्थ्यांच्या तुकडीनं नुकतंच हा अभ्यासक्रम पूर्ण केला.विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.विलास भाले आणि विद्यमान कुलगुरू डॉ.शरद गडाख यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. बदलत्या परिस्थितीनुरूप सेंद्रिय घटकांच्या प्रभावी वापरासह विषमुक्त अन्नधान्य निर्मिती ही काळाची गरज बनली आहे. त्यानुसार भविष्यात कृषी क्षेत्राशी निगडित सर्व शास्त्रज्ञ, शासन आणि संस्थांना काम करावं लागणार आहे असं डॉ. भाले यावेळी म्हणाले.
About The Author
Post Views: 80