जय वऱ्हाडी
तुम्ही मनसान हे काय, रामराम नायी, जय गोपाल नायी, जयकृष्ण नायी, राधेराधे नायी, सलाम आदाब नायी, नमस्कार, प्रणाम नायी, गुडनुन नायी, तं सांगतो जय वÚहाडी हे सबनाहून मोठं हाय काउन का वऱ्हाडी हे मायबोली हाय अन् मायहून कोनी मोठं हाय का? नायी ना म्हणून म्हणतो जय वऱ्हाडी म्हणा एकदा जोऱ्यात जय वऱ्हाडी.
अथीसा मंचावर बसेल हायेत उद्घाटक आपल्या तालुक्याचे राजे होना जिल्ह्याचा राज जिल्हाधिकारी तं तहसिलचा राजा तहसिलदार आदरणीय तहसिलदार सायेब राजेश वझीर अन साहित्यिक असलेले ठाणेदार तुनकलवार सायेब स्वागताध्यक्ष आपले भारतभाऊ बोबडे सामाजिक कार्यकर्ते अन् राजकीय पुढारी मंचाचे परमुख मा. शामभाऊ ठक मंचाचे खरे पाठीराखे अन् साहित्य व संस्कृत मंडळाचे माजी सदस्य पुष्पराज दादा, आपले दुसरे सामाजिक कार्यकर्ते अन् राजकीय पुढारी रमेशभाऊ वाटमारे शंकरराव घोरसे, आमचे प्रेरणास्थान प्रभाकर चव्हाण, डॉ. राजेश मिरगे, सन्मीत्र किशोर बळी, हिम्मत ढाळे सर, प्रा. डॉ. ममता इंगोले सबन पुरस्कार विजेते दोस्त, गुरुदेव प्रेमी संप्रदाय, सबन टाकईकर अन् वÚहाडी चे चायते.
आज मले लयहरिक झाला एवळ कौतुकपयले टाकयीत कोन नायी केल. तुमाले सांगतो म्या टाकयीले तालुक्यात पयला साहित्य संघ काहाडला संजीवनी साहित्यसंघ पण एवळ कौतुक नायी झालं. म्या तालुक्यात पयला काव्यसंग्रह प्ररकाशीत केला संजीवनी पन एवळ कौतुक नाई झालं संमेलन
घेतलं पंचायत समिती सभागृहात पन एवळ कौतुक नायी झालं. मले मोठमोठाले पुरस्कार भेटले पन टाकईत एवळ कौतुक नायी झालं. मी याच्याआंधी दोन साहित्य संमेलनाच अध्यक्षपद भुषवलं पन एवळ कौतुक नायी झालं. गावात केंद्र सरकारच्या एका खात्याचा परमुख (पोस्टमास्तर) झालो पन एवळ कौतुक नायी झालं. अंकुर साहित्य संघाचा केंद्रिय अध्यक्ष झालो पन एवळ कौतुक नायी झालं टाकईत पन टाकईले आखीर कौतुक करा लागलं पन त्यासाठी टाकईच्या वऱ्हाडी मंचाले पुढाकार घ्या लागला. शामभाऊ, पुष्पराज दादा, भारतभाउ, अन् वन्हाड मंचाचे पद्धिकार पुळे सरसावले तवा आज एवळं कौतुक झालं. भरून आलं राज्या मी काय हव एक तुयशीराम पन त्यातला राम ओयखला तुमी त्यातली तुयस ओयखली तुमी, तुमाले जय वऱ्हाडी करतो.
तसा मी वऱ्हाडी मंचापासून दूर नव्हतोच ६ पैकी पाच संमेलनात मी हजर हव चिरांगन परकाशनाले होतो, त्यात मायी कविता हाय हा मंच माया गावचा हाय तर असो गळेहो वऱ्हाडी आपली मायबोली हाय पन आपुन कोनत्याई भाषेच आकस करत नाही आता मराठीले अभिजात दर्जा भेटला आता वÚहाडीले चांगले दिवस येतीन. राज्य सरकारन फरमान काहाडलं का हरेक हफीसात मराठीच बोला.
हा संतायची भाषा हाय फकस्त आपुन वऱ्हाडी बोलत रायचं वऱ्हाडी लिहू, वऱ्हाडी बोलू, वऱ्हाडी जगू अन हो मायीत हाय का आजचा जेवन बेतही वऱ्हाडीच हाय अन् बनवनाराही वऱ्हाडीच हाय टाकईत वऱ्हाडे अळनाव हाय भारत भाऊनं पिवर माल मसाला देला वऱ्हाडी बोलणारे लिहणारे, ग्रामीन हायत तिले जगवनारे वऱ्हाडीच हायत, जादा शिकेल नसतील पर हुकेल नायीत बयनाबाई पाहा शिकेल होती का पन किती चांगल लिहून ठेवलं.
अरे खोप्यामधी खोपा सुगरनीचा चांगला
देखा पिलासाठी तिन जीव झाडाले टांगला
अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर
आंधी हाताले चटके तवा भेटते भाकर
मन वढाय वढाय जसं पिकातल ढोर
किती हाकला हाकला फिरी येते पिकावर
तुकोबाची गाथा, ज्ञानबाची ज्ञानेश्वरी, तुकडोजीची ग्रामगीता, कबिराचे दोहे, नामदेवाच्या ओव्या चोखोबाचे अभंग
ते जसे लिहत तसे वागत जगत
चोखोबाचा हा अभंग पाहा
उसे डोगा परी रस नोहे डोंगा
काय भुललासी वरलिया रंगा
नदी डोंगी परी जल नोहे डोंगा
काय भुललास वरलिया रंगा
हे आपल्याले समजून घ्या लागीन
चोखा डोंगा तरी भाव नोहे डोंगा
काय भुललासी वरलिया रंगा
जसं लिहू तसं जगा लागीन तं लोक मानतीन लिहणं अन् जगनं अलग अलग नायी पायजे.
मायी तेही छोटीसी कविता काय मनते पाहा
काय लिव्हता हो तुमी
सदा कदायी कागदपेन हाती दिवसा राती
नेहमी नेहमी काय लिव्हता हो तुमी
शेत नाही पाहयलं, औतं नाही वाहयल
कसी होते कनसाची कानी
काय लिव्हता हो तुमी
कविता गरिबीची लिवता
रोज बदामशिरा गीयता
अशी ड्याप्लीकेट गाणी,
काय लिव्हता हो तुमी
तुमच्या कवितेतली नार,
सजतेभलता श्रृंगार
पातळी नाभीखाली येते,
तुमच्या हास्याचे हासू होते
मले ठाव हाय हाय तुमचं किती पानी
काय लिव्हता हो तुमी
संतानी मानवतावादी, समतावादी लिव्हल
काउन का साहित्य म्हणजे काय साहित
ज्यात समाजाचं हित ते साहित
समाजाशी एकरूप व्हा लागते
आजच्या दिवशी का
हुयेना पन आपुन आपला पहेराव घातला
जेवन वऱ्हाडा केलं सबन वऱ्हाडी बोललो
वÚहाडी कविता सादर केल्या हा आपला आपलेपना वÚहाडीले पोषक हाय.
गळे हो बारशीटाकळी ही जुनी नगरी हाय या गावाले बारा येशी होत्या गावात फिरलो तं तुमाले वेशीचे अवशेष दिसतील. राजवाड्यासारखे कालीका मातेचं वाडे दिसतील. अथिसा आलेत खोलेसराचे दर्शन घ्या, दर्शन घ्या. दोनी हेमाडपंथी मंदिर हायत. हे मंदिर हजारएक वर्सा आंधीचे हायत मंदिरावर शिलालेख हायत, अखंड गोटयातले हे मंदिर हायत कालीका मंदिरावती शिल्प कोरीव काम पाहयसान, त दंग होसान कलेचा बेजोड नमुना हाय. या गावात किल्ला होता, गडी होती, होते भुयार जुन नाव बारशी टंकावती असं होत होता होता बारशीटाकळी झालं. डायरेक सुरयाची किरणं मुर्तिवर पडतात अस बांधेल हाय खोलेसरात बारोमास पिंडीतून पानी येते. अथिसा इतिहास संशोधक मंडयीन भेट देयेल हाय. या गावात मोठी पायईर हाय. गजानन महाराजाच्या पोथीतले गोविंदबुवा टाकयीकर अथोलचेच. त्यायची समाधी हाय. जत्रा भरते अथी या गावात एका मानसान लाकळाची सायकल तयार केली होती. इंग्रज होते तवा खोलेसर देव जागती ज्योत हाय फोकनाळया पुळ्या सोळत नायी मायाजोळ पुरावा आहे. पण आता इमान रायला नायी, भाव रायला नायी, सत्व गेलं जाउ दया पन आपली वऱ्हाडी तरी जपा तिले जाउ देउ नका.
माझ्या मराठीची बोल कौतुके
परि अमृतातेही पैजा जिंके
आज लियणारे वाढले पन वाचनारे कमी झाले. कायी बोली भाषा मरत हायत त्यायले जगवलं पायजे. वऱ्हाडी, झाडाबोली, आहेराणी, कोकणी अशा बोलीत जगल्या पायजेत. आपुन वऱ्हाडी म्हणून वऱ्हाडी जगवलं पायजे. वऱ्हाडी बोलाची काय लाज सरम पयले आपुन घरात वÚहाडीततं बोलो माय, बाबा, मले, तुले मंग आता काय झालं. पन याचा अर्थ असा नायीका परमाण भाषेचा राग करा आवश्यक तथी वापरली पायजे. घरी बजारात एकमेकाले वऱ्हाडी बोला, अठरा बलुतेदाराची ती भाषा हाय. ग्रामीण बाज हाय, तो जगवा, भाषा टिकली तं आपुन टिकू.
एक चित्पावन बोली हाय तिचा वापर कमी झाला त्याच्यातं त्या लोकायचं वर्चस्व कमी झालं म्हणुन आपुन सावध राहा मी तं म्हणतो आवतन पत्रिका शोक संदेश वऱ्हाडीत छापा. मग पहा पाठ्यपुस्तकात वऱ्हाडी यीन आज शामभाउची वावर पेरते आलीच ना मुल्यात्मक लिवल पायजे पैशासाठी, लिहू नका, नकली लिहू नका, कायीबी लिहू नका यानं भाषेच भला होत नायी. कायी सोताचं भलं कस हुयीन हे पाहयतात गावागावात वाचनालय असलं पायजे, सरकारन खेळ्यात जास्त अनुदान देलं पायजे. खरंखुरं लिवा घाबराची गोट नायी पन स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नायी. कोनाचे भाट हु नका. विश्व साहित्य समेलनापेक्षा असे लहान लहान समेलनं झाले पायजेत. सरकार तिकळे मोठमोठया रकमा देते इकळे 5/10 लाख त दया बावा. काउनका अथी गर्दी नसीन पन दर्दी हायत. बारशीटाकयीन वऱ्हाडीचा झेंडा हाती घेतला आपुन हातभार लावला पायजे.
वऱ्हाडीच संशोधन झालं पायजे. त्याच्यावर पीएच डी घेता आली पायजे. मराठी शाळा बंद पळू देवू नका. इंग्रजी शिकू नका असं मी नायी म्हणत पन असं होवू देवू नका जसं गुडदे म्हणतात.
‘‘खरं खरं सांगतो करत नाही टिका मराठी शिकासाठी जा लागीन अमेरिका“. आपले वऱ्हाडी सण, आपले ग्रंथ, आपल्या प्रथा, मरता कामा नायी. रामायण रामलिला, गंडार, भजन, सामुदायीक प्रार्थना, बहुरूपी, ग्रामगीता, लोककला, डोंबारी, पोतराज, नंदीवाले हे सबन जगलं पायजे. वाढवलं पाजये, डॉ. बाबासायेब म्हणत का दोन रुपयातून एक रुपयाची भाकर अन एक रुपयाचं पुस्तक घ्या वाकय, दोरखंडे, कासरा, पेंडी, तुत्या, वखर, खुरपं हे सबन भुलता कामा नय. नायीतं अस हुयीन पिलु म्हणजे कायचं पिल्लु ? गायीच पिलु म्हणजे काहोळ, वासरु, म्हशीच वगार, रेडकु हे कसं सपष्ट अन् समजीन अस हाय वऱ्हाडीत.
‘‘माया वऱ्हाडीचा लावा मस्तकाले टिका वऱ्हाडी बोला, वÚहाडी जगा, वऱ्हाडी शीका“, ‘‘सबके लिये खुला है वÚहाडी ये हमारा नारा“ गाडगे बाबा खास वऱ्हाडी बोलत त्यायचा वारसा जपा आज त्यायची जयंती हाय. शेतकरी जगला पायजे सबन संपावर गेलेतं कायी बिघळत नाही पन शेतकरी संपावर गेला तं समजा सबन मेले. हे समजून घ्या लागील तुमाले मले
मायी माय वऱ्हाडी मले शिकवते बोली ।
लेक बहिनीच्या मनी किती गुपीत पेरली
वÚहाडीच्या उपकारासाठी स्व सुरेश भटाच्या लायनी म्हणतो,
गे वऱ्हाडी तुसे मी फेडीन पांग सारे
आणित आरतीला हे सूर्य चंद्रतारे
मी लय मोठा ग्यानी नायी, लय शिकेल नाही, वय झालं म्हणून मोठा मानुनका, ग्यानाले मोठं म्हना.
माय मुक्ताई मुक्ताई दहा वरसाचं लेकरू चांगदेव योगीयानं तिले मानला रे गुरु, माया आधी मा पुष्पराज दादा, मा. प्रकाशभाऊ पोहरे, नरुभाउ इंगळे, डॉ. राजेश मिरगे अन् माया युवादोस्त किशोर बळी या मोठमोठया लोकायनं अध्यक्षपद भुषवलं त्या मानानं मी तेवळा मोठा नायी. पन घरचा हवं गावचा हवं घ्या गोळ करून माया बोलण्याचा मतलब ध्यानी घया.
चांगल वाटलं ते घ्या बाकी सोळुन या अथी बाकी कोनत्याही वऱ्हाडी साहित्यीकायच्या नावाचा उल्लेख केला नाथी काउनका एखादं सुटलं तं घरावर गोटे म्हणून सबनायले हात जोळून माफी मांगतो. गरीबाले भुलु नका, थोळे दिवस रायले, असचं पिरेम राहू द्या. मले अध्यक्षपद देवून कायम अंकित केलं. आभार म्हणत नायी उपकार भुलत नायी.
जय वऱ्हाडी
