अकोला (15 जून) जिल्हा व महानगर समन्वय समितीचे संयुक्त विद्यमाने अकोला ज्येष्ठ नागरिक संघाचे विरंगुळा केंद्रात जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक जागरूकता सभा संपन्न झाली. अभि विनायकराव पांडे अति. मुख्य सचिव महाराष्ट्र ज्येष्ठ नागरीक महासंघ हे अध्यक्षस्थानी होते. सभेमध्ये डॉ. सुहास काटे निमंत्रक विदर्भ पश्चिम प्रादेशिक विभाग, ना.मा. मोहोड उपाध्यक्ष प्रादेशिक विभाग, नारायण अंधारे अध्यक्ष जिल्हा समन्वय समिती प्राचार्य डॉ सत्यनारायण बाहेती अध्यक्ष पेन्शनर जिल्हा संघटना, रामभाऊ बिरकड उपाध्यक्ष पैंशनर संघटना, तुळशीराम बोबडे सदस्य विदर्भ पश्चिम प्रादेशिक विभाग बाळकृष्ण काळे, सचिव मातोश्री ज्ये.ना. संघ. प्रभुनारायण सिंह बिसेन अध्यक्ष माॅं गायत्री ज्येष्ठ नागरिक संघ यांनी आपल्या मनोगतांमध्ये जेष्ठांची अवहेलना थांबवून त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी ही बाब अधोरेखित केली.

अभि. विनायकराव पांडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये फेस्कॉमशी जुळण्याचे आवाहन केले. चंद्रकांत कुलकर्णी यांनी यथोचित सूत्रसंचालन केले. सभेला धर्मराज सरोदे ,ज्ञानदेव खेडकर, विनायक महाजन, प्रकाश राजवैद्य, मनोहर खरपकार, अशोक देशमुख, श्रीकांत सावळकर, अनंत अंधारे यांची उपस्थिती होती.
रामकृष्ण इंगळे सचिव साने गुरुजी ज्ये. ना. संघ यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.