नवी दिल्ली : (Free Aadhaar update deadline extended again) केंद्र सरकारने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवली आहे. यापूर्वीही ही मुदत तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली होती. आधार अपडेट करण्याची शेवटची तारीख १४ ‘सप्टेंबर होती. यूआयडीएआयने दिलेल्या माहितीनुसार, १० वर्षांपेक्षा जुने सर्व आधार अपडेट करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मोफत ऑनलाईन दस्तऐवज अपलोड करण्याची सुविधा १४ डिसेंबरपर्यंत पुन्हा वाढवली आहे, असे यूआयडीएआयने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. आधार कार्ड हे सरकारद्वारे भारतातील नागरिकांना जारी केलेले ओळखपत्र आहे. त्यावर १२ अंकी अद्वितीय क्रमांक छापलेला आहे. जो भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने जारी केला आहे. हा क्रमांक भारतात कुठेही व्यक्तीची ओळख आणि पत्त्याचा पुरावा असेल, असेही यूआयडीएआयने म्हटले आहे.
About The Author
Post Views: 67