राज्य नेत्ररोग संघटनेच्या वतीनं राज्यातल्या १५० रुग्णालयांत सुमारे ३ हजार रुग्णांची तपासणी केल्यावर १६ टक्के रुग्णांना रेटिनोपॅथी झाल्याचं आढळून आलं. सर्वेक्षणानुसार नव्यानं मधुमेहाचं निदान झालेले १६ टक्के रेटिनोपॅथी रुग्ण प्रथमच आढळून आले. संघटनेच्या ३ हजार सदस्यांच्या सहकार्यानं १५७ सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये तपासणी मोहीम आयोजित केली होती. मधुमेह सर्व सामाजिक-आर्थिक वर्गातील लोकांमध्ये बाळावत आहे. त्यामुळे वेळेत निदान आणि उपचार होणं आवश्यक असल्याचं महाराष्ट्र नेत्ररोगशास्त्र सोसायटीच्या वैज्ञानिक समितीचे अध्यक्ष डॉक्टर वर्धमान कांकरिया यांनी सांगितलं.
About The Author
Post Views: 93