माहिती आणि प्रसारण मंत्री, अनुराग ठाकूर यांनी आज माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत चार संकेत स्थळांचं लोकार्पण केलं. ज्यात प्रेस सेवा पोर्टल, सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन पोर्टल आणि संकेत स्थळ, नॅवीगेट भारत पोर्टल आणि स्थानिक केबल ऑपरेटर्ससाठी राष्ट्रीय नोंदणी, यांचा त्यात समावेश आहे. या प्रणालीमध्ये पारदर्शकता आणणं आणि व्यवसाय सुलभ करणं, हा या पोर्टल्स सुरू करण्यामागचा उद्देश आहे, असं यावेळी ठाकूर म्हणाले. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होईल आणि मंत्रालयांतर्गत विभागांचं कामकाज अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होईल. प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं पारदर्शकता आणण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत आणि या दिशेनं टाकलेलं हे एक पाऊल आहे, असंही ठाकूर यांनी सांगितलं
About The Author
Post Views: 91