सायकल फॉर झिरो हंगर’ मोहिमेला मिळणार चालना
राजस्थानच्या बिकानेरमध्ये होणाऱ्या या सायकल स्पर्धेसाठी देशभरातून तसेच परदेशांमधून स्पर्धकांना आमंत्रित करण्यात आले आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (सीएफआय) आणि वेदांत लिमिटेड यांनी टूर-डी-था स्पर्धेचे आयोजन केले आहे. वेदांतने ग्रामीण भारतातील अंगणवाड्यांचे रूप पालटण्यासाठी महत्त्वाकांक्षी मोहीम सुरू केली आहे. त्या मोहिमेला टूर – डी – थार स्पर्धेतून मदत केली जाणार आहे. ‘सायकल फॉर झिरो हंगर’ असे या मोहिमेचे नाव आहे. या मोहिमेअंतर्गत लहान मुलांना पोषण आहार दिला जातो.#Tour-de-Thar

राजस्थानच्या थार वाळवंटात येत्या २३ नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावरील टूर -द – थार ही सायकल स्पर्धा आजोजित करण्यात आली आहे. फ्रान्समध्ये दरवर्षी होणाऱ्या टूर -द- फ्रान्सच्या धर्तीवर भारतात होणारी ही पहिलीच आंतरराष्ट्रीय दर्जाची सायकल स्पर्धा आहे. #International ‘Tour-de-Thar’ cycling competition to be held in the Thar Desert on November 23
