वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
जगातील ९५ देशांमध्ये झालेल्या संशोधनानंतरचा निष्कर्ष
वॉशिंग्टन : आधुनिक काळामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मोठ्या प्रमाणावर प्रगती केली असली तरी आणि या विज्ञानाने उपलब्ध केलेल्या विविध साधनसामग्रींचा माणसाकडून उपभोग घेतला जात असला तरी एका नव्या संशोधनाप्रमाणे जगातील शंभर कोटीपेक्षा जास्त लोकांचा अद्यापही जादूटोणासारख्या अंधश्रद्धा प्रक्रियेवर विश्वास आहे. जगातील ९५ देशांमध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये करण्यात आलेल्या संशोधनानंतर हा निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आला आहे.
४०% लोकांना अद्यापही हडळ किंवा चुडेल किंवा भूत अस्तित्वात असतात यावर विश्वास आहे, असे या संशोधनातून समोर आले आहे. शिक्षणाचा प्रसार आणि अंधश्रद्ध भावना यांचा थेट संबंध असल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले. उदाहरणार्थं स्वीडनमध्ये शिक्षणाचा शंभर टक्के प्रसार झाला आहे तेथे फक्त नऊ टक्के लोकांचा जादूटोण्यावर किंवा भुतावर विश्वास
आहे, पण आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये शिक्षणाचा प्रसार खूपच कमी असल्याने ९०% लोक जादूटोण्यावर विश्वास ठेवत असल्याचे लक्षात आले. अमेरिकन युनिव्हसिंटीतील संशोधक बोरीस गेअर्समन यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले होते. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे याबाबत अद्याप भारत आणि चीनमधील संपूर्ण माहिती उपलब्ध झालेली नाही. पण जगामधील अनेक संसदेत जादूटोण्यामुळे होणाऱ्या हानीबाबत प्रस्ताव सादर झाले आहेत.