लाह्या बत्तासे रेवळ्या
शेव जीलेबी खान्याची
हिंडो जतरीत बेज्या
मजा शीन्मा पाह्यन्याची
चस्मा लाल कागदाचा
फटु हीरोईन संग
भौ पयलेची जत्रा
तीचा राह्ये न्यारा ढंग
शीन्मा टुरींग टाकीज
राह्ये तमाशाचा फळं
साल भरचं जीन्नस
राहे घ्याची गळबळं
मायं घेतसे पावशी
चिरे भाजीपाला तीनं
जत्रा नाथ बाबाची
मले शीकवलं जीनं
असे पयसा अदला
कमी माह्या खीशातं
तरी मजा जत्रीची
लुटो मी मोट्या जोशातं
बसो अगस पायन्यात
फोळो बंदुकीनं फुगे
लान पनची जत्रा
रात रातभर जागे
पानफुल बेलपुळा
नाथ बाबाले वाह्यला
आता गेले ते दीवस
अन आठोनी राह्यल्या
–श्याम ठक
बार्शीटाकळी जि . अकोला ९९७५७९२५२०