अकोला : समाजभूषण बलदेवराव पाटील म्हैसने (गुरु) यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन समाज बांधवांच्या वतीने १८ एप्रिल २०२३ रोजी स्वराज्य भवन येथे सकाळी ११ वाजता करण्याचे ठरविले असून समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पाटील समाज वर वधू सुचक मंडळाचे अध्यक्ष माजी सैनिक सुभाष पाटिल म्हैसने, कार्याध्यक्ष आपला माणूस डॉ अशोक ओळंबे यांनी केले. कर्ता हनुमान मंडळ वानखडे नगर येथे आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकराव अमानकर तर प्रमुख अतिथी अशोकराव पटोकार, अतुल अमानकर, शिवाजी पाटील म्हैसने, संजय चौधरी अन्नपूर्णेस पाटील, योगेश ढोरे, महादेवराव वानखडे यांची उपस्थिती होती. यावेळी बलदेवराव पाटील यांचे समाज कार्य अफाट असून त्यांनी समाज बांधवांच्या स्वरक्षणासाठी रास्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संस्कार व प्रेरणेतून शेकडो व्यायाम शाळा काढून हजारो युवकांना समाज बांधवांच्या रक्षणासाठी प्रशिक्षित करून स्वरक्षणाचे धडे दिले, कुठल्याही पदाची लालसा न ठेवता अविरत समाज करीत आहेत त्यांचेवर राष्ट्र संत तुकडोजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचा पगडा असून समाज कार्य व राष्ट्र कार्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले असून अश्या महान कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा कार्य गौरव यथोचीत असल्याचे अशोकराव अमानकर यांनी सांगीतले.
यावेळी अशोकराव पटोकार, महादेवराव वानखडे यांनी आपले विचार मांडले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतुल अमानकर संचालन वसंत माळी तर आभार प्रा गोपाल साबळे यांनी मानले कार्यक्रमाला डॉ तेजराव नराजे, गणेशराव घोगरे, अरुण खोटरे, श्यामभाऊ मते, श्याम काळोखे, मोहन पाटील, चंद्रकांत ताठे, सुरेश राऊत हिम्मतराव पोहरे, प्रभाकर ठाकरे, योगेश ढोरे, प्रा दत्तात्रय भाकरे, चन्द्रशेखर वानखडे, प्रा वसंतराव उजाडे, सचिन तायडे, भास्कर वानखडे, निखिल नहाटे, अशोक भिलकर, संतोष आखरे, गजानन पटोकर, दत्तात्रय अरबट, एकनाथ मांगटे, रविंद्र दांदले, दिंगाबर खवले, अरुण साबळे, अनिल भिसे, अंकित वानखडे, प्रवीण दिघोळे, गजानन घ्यार, राजेश टेकाडे, वसंतराव उजाडे, भास्कर वानखडे, प्रल्हाद शेळके, अशोक पाटील, साहेबराव काळांक यांचेसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.