वेड लागणे म्हणजे काय हे खर तर एक कोडच आहे. पूर्वीच्या काळी वेड लागणे म्हणजे गोवर किंवा मालेरीयासाराख्याच एखादा रोग आहे असे मानत असत. शिवाय पाप केल्यामुळे चेटकिणी अंगात संचारतात आणि त्यामुळे रुग्ण मंडळी वेड्यासारखे वागतात असाही समज त्याकाळी बराच प्रचलित होता. रामायण आणि महाभारत या सारख्या ग्रंथातही चिंताग्रस्तता, नैराश्य वगैरे विकारांचे उल्लेख आढळतात. मानसिक आजार आणि मानसिक रुग्ण म्हटले कि, अंगावर काटा येतो माणूस हा बुद्धीमान प्राणी असल्यामुळे विचार करणार विचारांच्या या वेगवेगळ्या परिस्थितीत थोड्याफार प्रमाणात ताण-तणाव निर्माण होतोच, तसेच प्राणवायूचा अपुरा पुरवठा, अपुरा निर्वृष्ठ आहार या अशा कारणास्तव उदभवणारा तणाव प्रिय व्यक्तीचा मृत्यू, अपघात, प्रेमभंग, घटस्पोट वगैरे आघात, लैंगिक शोषण अथवा शारीरिक शोषण, बालवयातील कटू अनुभव, आर्थिक विवंचन, कौटुंबिक, व्यावसायिक, सामाजिक समस्या इत्यादी परिस्थितीजन्य घटक व्यक्तीत तीव्र तणाव निर्माण करतात. माणसाने जास्त विचार न करता हसतमुखाने जीवन जगले, तर कोणत्याच मानसिक व्याधींचा प्रादुर्भाव जाणवणार नाही; परंतु जीवनात अशी परिस्थिती उदभवल्यास जास्त विचार करून खर तर अतितीव्र तणावात रुपांतर होते व कालांतराने या तीव्र तणावाचे रुपांतर मानसिक रोगात होते. मानसिक रोग म्हटले कि, वेडसर, पागल हीच कल्पना केल्या जाते. त्यामुळे अशा रुग्णांकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळाच असतो.
फ्रान्स मधील फिलिपे पिनेल यांच्या स्मरणार्थ हा दिवस मानला जातो. त्यांनी स्किझोफ्रेनिया आजाराबद्दल समाजात असणारी चीड, या रुग्णांना दिली जाणारी हिन वागणूक याबद्दल क्रांती घडवून आणली म्हणून २४ मे हा दिवस जागतिक स्कीझोफ्रेनिया दिन म्हणून संपूर्ण जगात आपण साजरा करतो. स्कीझोफ्रेनिया याला आपण अंतराबंद असे देखील म्हणतो. स्किझोफ्रेनिया या आजाराला मराठीमध्ये छिन्नमनस्कता असे संबोधले जाते, तर ग्रीक नामावलीनुसार याला स्किझोफ्रिनिया असे म्हणतात. ‘स्किझो’ म्हणजे दुभंगलेले मन अथवा व्यक्तित्व होय. स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजारांमधील सर्वात गंभीर आजार मानला जातो. हा आजार पूर्णपणे कधीच बरा होत नाही. मात्र, हा आजार गोळ्या औषधांनी कंट्रोलमध्ये ठेवता येतो.
स्किझोफ्रेनिया हा एक गुंतागुंतीचा तीव्र स्वरूपाचा मानसिक आजार आहे. या वर्षीची थीम आहे ‘एम्पावरिंग ऑटिस्टिक वॉयस () आत्मकेंद्रित आवाजांना सक्षम करणे Signs of Schizophrenia
खर तर स्किझोफ्रेनिया या रोगाच्या रुग्णाचे अवलोकन केले असता, दोन व्यक्ती या रुग्णाने बोलतांना पहिले असता या रुग्णाला वाटते की ती दोन व्यक्ती आपल्याच बाबतीत बोलत आहे. अशा स्थितीत रुग्णाला जास्त ताण निर्माण होतो व तो रुग्ण चलबिचल अवस्थेत जातो. त्या रुग्णाच्या मनात वारंवार याच गोष्टी येतात. मनोविकारांमध्ये ‘स्किझोफ्रेनिया’ हा एक ‘भयानक’ विकार आहे. कुठल्याही देशातल्या, वंशातल्या, जातीतल्या किंवा धर्मातल्या माणसांना हा रोग होऊ शकतो. स्किझोफ्रेनिया हा आजार झाला आहे हे ओळखण्यासाठी त्याची पाच प्रमुख लक्षण आहेत. एक म्हणजे सतत भ्रम होणे ( डील्युजन्स), दुसरे लक्षण म्हणजे सतत आभास होणे ( हँलुसिनेशन), तिसरे लक्षण म्हणजे विस्कळीत आणि असंबंध्द बोलणे आणि लिहिणे, चौथे लक्षण म्हणजे असंबंध्द आणि पाचवे लक्षण म्हणजे नकारात्मक विचार या पाच पैकी कुठलीही दोन लक्षणे किंवा कुठलेही एक लक्षण खूप तीव्रपणे सतत सहा महीने दिसून आले तर त्या रुग्णाला स्किझोफ्रिनिया आजार झाला असे म्हणतात. शहरी आयुष्यातल्या तणावामुळे, प्रचंड वाढलेल्या गतीमुळे आणि इतर कारणांमुळे स्किझोफ्रेनिया या आजाराचे प्रमाण वाढलेले आढळते.
स्किझोफ्रनिया होऊ नये याकरिता खर तर गरोदरपणात आणि बाळंतपणात आईच्या प्रकृतीची खूप काळजी घेणे हा एक प्रतिबंधक उपाय आहे. कारण काही वेळा याच प्रक्रियेत बिघाड झाल्यामुळे किंवा प्रसुतीच्या वेगवेगळ्या संबंधित कारणांमुळे स्किझोफ्रेनियाची शक्यता वाढते. याबाबत काळजी घेतल्यास निदान काही केसेस तरी स्किझोफ्रिनिया होण्यापासून वाचू शकतील. पण तरीही स्किझोफ्रिनिया पूर्णपणे टाळता येईल असे अजून तरी चित्र दिसून येत नाही. स्किझोफ्रिनिया अर्थात अंतरबंध या रोगामध्ये विचार भावना व कृती यामध्ये फारकत पडत जाते. स्किझोफ्रेनिया हा एक मानसिक आजार असून हा आजार अनेक मानसिक रोगांचा समूह आहे. ज्यात बाह्य परिस्थितीने व्यक्तीचा संबंध असाधारण होऊन जातो. काही काळ या रोगाच्या लक्षणात थोडीफार विभिन्नता दिसून येते. अंतरबंदला इंग्रजीत डिमेंशिया प्रिकॉक्स असे पण म्हटले जाते. स्किझोफ्रिनिया या मानसिक आजाराची गणना मोठ्या मनोविकारात केली जाते. मानसिक रोगाच्या दवाखान्यात ५५ टक्के रोगी स्किझोफ्रेनिया या रोगाचे आढळून येतात आणि पहिल्यांदा येणारे असे २५ टक्के पेक्षा कमी नसतात. अंतरबंधाच्या अर्थात स्किझोफ्रेनिया या रोगाच्या इलाजासाठी खूप काळ लागतो. स्किझोफ्रिनिया या आजाराच्या रुग्णांची संख्या दवाखान्यात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुरुषांमध्ये २० ते २४ वर्षे वयाच्या तसेच स्त्रियांमध्ये ३५ ते ३९ वर्षे वयाच्या दरम्यान हा रोग सर्वात जास्त होतो. खर तर दवाखान्यात भारती झालेल्या रोग्यांमधून ४० टक्के लोक लगेच निरोगी होऊन जातात व ६० टक्के लोक जीवनभर किंवा अनेक वर्षांपर्यंत दवाखान्यात राहतात. स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराचे चार रूप पहिले असता; १) सामान्य रुपात व्यक्ती आपल्या चारही दश्यातील परिस्थिती ते स्वतःला हळूहळू ओढून घेतो. २) दुसऱ्या रुपात यौवनमनस्कता (हीबेफ्रीनिक) असे म्हणतात. रोगीचे विचार तसेच कर्म भरम वर आधारित होतात. हा रोग साधारणतः यौवनावस्था मध्ये होत असतो. ३) तिसऱ्या रुपात रोगीच्या मस्तिष्कचा – अंग-संचालन मंडळ विकृत होऊन जातो. नाही तर त्याच्या अंगाची गती अत्यंत शिथिल होऊन जाते. नाही तर रोगी अति प्रचंड होऊन जातो आणि जोरात पाळायला लागतो, भांडायला लागतो, इतरांवर आक्रमण करतो तसेच हिंसक होतो. ४) चौथा रूप अधिक वयात प्रगट होतो आणि विचार संबंधी होतो. रोगी स्वतःला फार मोठा व्यक्ती म्हणतो किंवा रोग्याला वाटते की तो कोणाच्यातरी कडून सतवल्या जात आहे. कितीतरी वेळा रोगींमध्ये एका पेक्षा जास्त रूप पहावयास मिळते.
भारतामध्ये पुरुषांपेक्षा महिलांना मानसिक रोगाने जास्त प्रमाणात ग्रासलेले आहेत. नॅशनल इंस्टीटयूट ऑफ मेंटल हेल्थ नुसार भारतीय महिला रोज कोणत्या ना कोणत्या मानसिक तणावातून जात असतात. घरापासून कार्यालयापर्यंत असलेले वातावरण तिच्या जीवनाला असंतुलित करून टाकते. महिला भावनांनी जास्त जुडलेल्या असतात. त्यामुळे त्यांना या समस्यांचा सामना करावा लागतो. महात्मा गांधीजींनी म्हटले आहे की, शरीराला जसे स्वच्छते करिता पाण्याने स्नान घालणे आवश्यक आहे तसेच मनाच्या स्वच्छते करिता मनाला प्रार्थनेने स्नान घालावे लागते. प्रार्थना म्हणजे नवस नाही, देवासोबतचा करार नाही. आत्मशुद्धी, मनः शुद्धीकरता व बुद्धीशुद्धीकरता प्रार्थना असते.
आज संपूर्ण जग कोरोना व्हायरस विरोधात लढत आहे. जगातील प्रत्येक व्यक्ति आज काही न काही प्रमाणात तनावात आहे. २४ मे हा दिवस आपण संपूर्ण जगात जागतिक स्किझोफ्रेनिया दिन म्हणून साजरा करतो. स्किझोफ्रेनिया या आजाराबद्दल भाष्य करणारा मानसिक आरोग्य क्षेत्रातील ‘देवराई’ हा पहिलाच चित्रपट देवराई या चित्रपटात नायक शेष हा स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराने ग्रस्त रोगी असतो. खर तर जागतिक स्किझोफ्रेनिया दिनी जनसामान्यांपर्यंत स्किझोफ्रेनिया या आजाराबाबत जनजागृतीद्वारे माहिती पोहोचविणे गरजेचे आहे. आजही आपल्या आपल्या देशात मानसिक रुग्णांवर इलाजासाठी बाबा, बुवा, महाराज यांच्या कडे नेले जाते. मानसिक आजाराबाबत असलेल्या अंधश्रद्धा दूर व्हावं तसेच स्किझोफ्रेनिया या आजाराबाबत लोकांपर्यंत माहिती पोहोचाव एवढीच या जागतिक स्किझोफ्रेनिया दिनी अपेक्षा !
नितीन प्र. श्रीवास्तव
