आपल्यापैकी अनेकजणांना ‘डेस्क जॉब’ हे खूप आरामदायी आणि सोपे काम वाटते. बरेचजण ८ ते ९ तास एकाच जागी बसून काम करतात, पण असे काम आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते.
आजकाल बरेचजण डेस्क जॉब करत असल्याने अनेक प्रकारचे आजार लोकांना होत आहेत. एकाच जागी तासंतास बसून काम केल्याने कोणते आजार उद्भवतात ते पाहुयात.
रोगप्रतिकारशक्ती कमी होते- तासंतास खुर्चीवर बसून काम केल्याने शरीरातील पेशी कमकुवत होतात. परिणामी, रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ लागते. त्यामुळे सतत बसून काम करू नका. अधूनमधून ब्रेक घेणे गरजेचे आहे. डायबिटीस जास्त वेळ खुर्चीवर बसल्यास डायबिटीसचा धोका वाढतो. सतत बसून काम केल्याने इन्सुलिनचे प्रमाण कमी होते आणि रक्तातील साखर वाढते आणि यामुळे शरीर डायबिटिससाठी असुरक्षित बनते.
हृदयरोग – जेव्हा बराच वेळ तुम्ही खुर्चीवर बसता, तेव्हा तुमचे शरीर निष्क्रिय होते. याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांना चिकटून राहते. ज्यामुळे रक्तवाहिन्या खराब होतात. यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता निर्माण होते.
कंबरदुखी आणि पाठदुखी – सतत बसून काम केल्याने हांडावर ताण येतो. हाडे कमकुवत होऊ लागतात. हळूहळू गुडघा आणि बॅकपेनची समस्या निर्माण होते.
वजन वाढणे – सतत बसून काम केल्याने शारीरिक हालचाली मंदावतात. याने शरीरातील फॅट्स वाढतात. यामुळे लोक लठ्ठपणाचे शिकार बनतात. एकाच जागी बसल्याने लिपोप्रोटीन लिपीसचे रेणू बाहेर पडू शकत नाही. अशाने विविध ठिकाणी फॅट्स जमा होऊ लागतात.
स्मरणशक्तीवर परिणाम – सतत बसून काम करण्याचा सर्वात मोठा धोका म्हणजे स्मरणशक्तीवर याचा परिणाम होतो. या लाईफस्टाईलचा तुमच्या मनावरदेखील परिणाम होतो. अनेक गोष्टी विसरायला होतात.
हाय बीपी – शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्याने हाय बीपीचा त्रास संभवतो. हाय बीपीमुळे धमनीच्या भिंतीवर रक्ताचा दाब खूप जास्त जातो. अशाने रक्त पंप करण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागते. यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.