भाग – 1 (अभंग क्रमांक 1 ते 50)
डॉ.शांताराम गोवर्धन बुटे
वारकरी संप्रदायामधील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन असलेले संत सेना महाराज होत. आपल्या महाराष्ट्र भूमीत अनेक संतांची मांदीयाळी उदयास आली आहे. या सर्व संतांनी समाजाला जागृत करण्याचे, शिकविण्याचे, व दिशा दाखविण्याचे समाज प्रबोधनात्मक महान कार्य आपल्या अभंगवाणीतुन केलेले आहे. संत सेना महाराजांनी सुध्दा आपल्या रसाळ व भावोत्कट अभंगातुन समाजाला उद्बोधित केले आहे. प्रस्तुत पुस्तकात संत सेना महाराजांच्या निवडक शंभर अभंगांचे निरुपण करण्यात आले आहे.
संत सेना महाराजांचा कालखंड हा इ. स. तेराव्या शतकाचा उत्तरार्ध समजतात. त्यांचा जन्म वैशाख वद्य द्वादशी मध्यप्रदेशामधील जबलपुर जवळील वांदुगड येथे झाला आहे. वडिलांचे नाव श्री. देविदास व आईचे नांव प्रेमकुवर असे आहे.
संत सेना महाराजांचा आध्यात्मिक अनुभव व पारमार्थिक अधिकार हा उच्च कोटीचा होता त्यांची संपूर्ण अभंगरचना ही स्वयंस्फुर्तीने झाली असल्याने या अभंगास दिव्यता प्राप्त झाली आहे. आज त्यांची विविध विषयावरील अभंगरचना उपलब्ध आहे.
प्रस्तुत पुस्तकात प्रा.डॉ. र. रा. गोसावी यांनी संपादीत केलेल्या श्री. सकल संत गाथेमधून शंभर निवडक अभंगांचा समावेश करण्यात आला आहे. संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज ह. भ. प. श्री. संभाजी महाराज देहूकर यांची प्रेरणा, मार्गदर्शन व आशिर्वाद हे अभंग निरुपण करतांना लाभला असल्याने मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करीत आहे. – डॉ. शांताराम गोवर्धन बुटे
1. अगा पंढरीनाथा ।
अगा पंढरीनाथा । शरण आलों कृपावंता ।। 1।।
याचा धरी अभिमान । सत्य करावें वचन ।। 2।।
गीता भागवतीं । स्वयें बोले रमापती ।। 3।।
म्हणती दीनानाथ । हेंचि सांभाळीं कीं व्रत ।। 4।।
मोकलिता दुरी । सेना न ठेविची उरी ।। 5।।
संत सेना महाराजांच्या पाच चरणाच्या अभंगातून पंढरीनाथास शरण येवून माझ्यावर कृपा करावी. मी आपली गीता भागवताची शिकवण घेत आहे. आपण मला मोकळे ठेवू नये सांभाळ करावा. मी काहीही मनात ठेवत नसल्याचे प्रतिपादन करतात.
पांडुरंगा, आपणांस मी काया, वाचा व मनाने शरण जावुन समर्पित झालो आहे. आपण कृपावंत व दयाळू आहात. आपल्या भाविक भक्तांवर आपण कृपादृष्टी दाखवित आला आहात. या बाबींचा माझ्यासारख्या भक्तांस अभिमान वाटत आहे. ईश्वरा, आपण आपले हे सत्यवचन पाळावे असे मला वाटत आहे. ईश्वरा, आपण गीता आणि भागवताद्वारे मानवी जीवनाचा उध्दार होण्याच्या दृष्टीने त्याचे कथन केले आहे. आणि आपण सांगितल्याप्रमाणे याचा आम्ही सर्व भाविकभक्तांनी स्विकार केला आहे. त्यानुसार मानवी जीवन जगल्यास, संसार आनंदाने व सुखाने पार केल्या जाईल.
संत सेना महाराज पांडुरंगास विनम्रपणे विनंती करतात की, मला या संसारात मोकळे ठेवू नये. आपणांस मी मनोभावे मी शरण आल्यामुळे माझ्यावर कृपादृष्टी दाखवावी.
2. अन्यायी अन्यायी ।
अन्यायी अन्यायी । किती म्हणोन सांगो काई ।। 1।।
तूं तो उदाराचा राणा । क्षमा करी नारायणा ।। 2।।
काम क्रोध लोभ मोहो । नाडिलों याचेनि पहाहो ।। 3।।
नावडे संतसंगती । नाहीं केली हरिभक्ति ।। 4।।
निंदा केली भाविकांची । चित्ती आस धनाची ।। 5।।
सेना पायांचा पुतळा । तुज शरण जी दयाळा ।। 6 ।।
संत सेना महाराजांनी सहा चरणाच्या अभंगातून ईश्वरा/पांडुरंगा आपण उदार अंतःकरणाचे असुन कोणावरही अन्याय होवू देत नाही. या संसारात काम, क्रोध, मोह, धन यामुळे माझा नाश होत असुन संतांची संगत सुध्दा आवडत नाही. तसेच हरिभजन होत नसुन भाविकाची निंदा केलेली आहे. मी आपणांस शरण आलो असल्याचे प्रतिपादन करतात.
ईश्वरा/पांडुरंगा, आपण फार कृपाळू व दयाळू आहात आपले अंतःकरण दयेचा सागर असुन अन्यायी किंवा जे पतीत आहेत अशांना आपण क्षमा करीत आलेले आहात. आपण आपल्या भाविक भक्तांना क्षमाशील वृत्ती दाखविली आहे. जे भाविक भक्त आपणांस शरण आले आहेत. त्या सर्वांचा आपण उध्दार केलेला आहे. मानवी जीवन जगत असतांना या संसारात षड्रिपूंपैकी काम, क्रोध, लोभ, मोह यामुळे मी फार नडलो आहे. माझा घात या शत्रुमुळे झाला आहे. तसेच मला संतांची संगती सुध्दा आवडत नाही. तसेच ईश्वरा/पांडुरंगा, मी आपली भावभक्तिसुध्दा करु शकलो नाही. जे कोणी आपले भाविकभक्त आहेत त्यांची निंदा करीत राहलो आहे. मनात धनाची आशा लावून बसलो आहे. मला केव्हा कसे धन मिळणार याचीच चिंता करीत बसलो आहे, त्यामुळे माझा नाश झाला आहे.
संत सेना महाराज म्हणतात, पांडुरंगा मी आपल्या चरणी मनोभावे शरण आलो आहे कारण आपण दयावंत आहात. आपण आपल्या भाविक भक्तांवर दया दाखवित आला आहांत.
3. अन्यायी अपराधी लडिवाळ संतांचा ।
अन्यायी अपराधी लडिवाळ संतांचा । तेथें किळकाळाचा रीघ नाहीं ।। 1।।
समर्थाचे बाळ समर्थचि जाणें । वागवी अभिमान म्हणतां त्यांचे ।। 2।।
अन्यायाच्या राशी उदंड केल्या जरी । तरी क्षमा करी मायबापा ।। 3।।
कल्पतरु छाया बैसला सेना न्हावी । दया ते वागवी बहु पोटीं ।। 4।।
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून संतांचा लाडका अन्यायी अपराधी असला तरी त्या ठिकाणी मृत्युचा शिरकाव होत नाही. ईश्वराचे सामर्थ्य तोच ईश्वर जाणतो अनेक अन्याय घडला तरी क्षमा करावी. आपण क्षमाशील आहात असे प्रतिपादन करतात.
एखादा अन्यायी व अपराधी असला तरी तो जर संतांचा लाडका राहिला असेल तर त्यास तेथे मृत्युचा शिरकाव/प्रवेश होवू शकत नाही. संतांच्या संत प्रवृत्ती पुढे काळाचेही काहीही चालत नाही. तेथे मृत्युही काहीही करु शकत नाही. ईश्वराचे/पांडुरंगाचे किती सामर्थ्य आहे हे ईश्वरालाच/पांडुरंगालाच कळते. हे इतर कोणीही जाणू शकत नाही. तर त्याची वागणुक अभिमानास्पद आहे. ईश्वरा/पांडुरंगा, आपण कृपाळू व दयाळू आहात असंख्य असा अन्याय घडला तरी आपण क्षमाशील असल्यामुळे, मायबाप असल्याने मला माफ करावे, कारण आपण पतीतांना सुध्दा पावन केले आहे. त्यांचा उध्दार केला आहे.
संत सेना महाराज म्हणतात, ईश्वरा/पांडुरंगा, आपण कल्पतरु आहात. कल्पतरु म्हणजे मनातली इच्छा पूर्ण करणारा वृक्ष होय. कल्पवृक्षाची उपमा ईश्वराला/पांडुरंगाला दिलेली आहे. आपण दया दाखवावी व माझ्या मनातील इच्छा पूर्ण करावी.
4. असतां वैकुंठवासी ।
असतां वैकुंठवासी । काय सांगें ऋषीकेशी ।
जाऊनि मृत्युलोकाशी । जन भक्तिसी लावीं कां ।। 1।।
आज्ञा वंदुनीया शिरीं । जल्मलो न्हावीयाचे उदरीं ।
वाचे नाम निरंतरी । रामकृष्ण गोविंद ।। 2।।
कलियुगामाजी जाण । सोपें हेंचि साधन ।
रामकृष्ण नारायण । ऐसें पुरुषोतम सांगत ।। 3।।
सेना म्हणे देवाधिदेवा । आम्हीं करावी तुझी सेवा ।
हेंची मागतों केशवा । नित्य रहावें मजपाशीं ।। 4।।
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून वैकुंठी असतांना ईश्वराने मृत्युलोकांत जावुन जनसामान्यास भक्तिमार्गास लावावे. ईश्वराची ही आज्ञा घेवून न्हाव्यांच्या वंशी जन्म घेवून निरंतर ईश्वराचे/पांडुरंगाचे नामस्मरण करीत रहावे. या कलियुगामध्ये सर्वत्र सोपे साधन हेच आहे. हे ईश्वराने सांगितले आहे. ईश्वरा, माझ्या हातून आपली सेवा घडावी हीच मागणी असल्याचे प्रतिपादन करतात.
ईश्वराचे वैकुंठी असतांना त्या ईश्वराने/पांडुरंगाने मला सांगितले की, आपण मृत्युलोकी जावून सर्वसामान्य जनतेला भक्तिमार्गास लावावे ही त्याची आज्ञा शिरोधार्य समजून न्हाव्याच्या वंशात माझा जन्म झाला आहे. माझ्या मुखाने मी सदैव त्या ईश्वराचे/रामकृष्ण गोविंदाचे नामस्मरण करीत आहे. रामकृष्ण गोविंद हे नाम निरंतर घेत आहे. या कलीयुगामध्ये मानवाची आयुष्यमर्यादा ही फार कमी असल्याने सर्वात सोपे साधन म्हणजे ईश्वराचे नाम रामकृष्ण नारायण आहे. असे ईश्वर सांगत आहे. ज्याद्वारे मानवी जीवनाचा उध्दार होवून जीवन सार्थकी लागेल.
संत सेना महाराज ईश्वराला मागणी करतांना म्हणतात, ईश्वरा, आम्ही आपल्या सोबत सदैव रहावे. आपली सेवा नित्य नेमाने घडावी. एवढेच माझे मागणे आहे.
5. असाल तेथें नामाचें चिंतन ।
असाल तेथें नामाचें चिंतन । याहुनि साधन आणिक नाहीं ।। 1।।
सोडवील माझा भक्तांचा कैवारी । प्रतिज्ञा निर्धार केली आम्ही ।। 2।।
गुण दोष याती न विचारी कांहीं । धांवे लवलाही भक्तकाजा ।। 3।।
अवघे काळीं वाचें म्हणा नारायण । सेना म्हणे क्षण जाऊं न द्या ।। 4।।
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून ईश्वराच्या नामाचे चिंतन हे साधन श्रेष्ठ असुन संसार सागरातून सोडवणारे, भक्तांचा पाठीराखा असल्याचे आम्ही प्रतिज्ञापुर्वक सांगत आहे. माणसाचे गुणदोष व कशाचिही तो ईश्वर विचार न करता भक्तांच्या कामकाजाकरीता त्वरीत धावून येतो म्हणून आपल्या मुखाने कोणताही क्षण वाया न घालविता ईश्वराचे नाम घ्यावे असे प्रतिपादन करतात.
मानवी जीवनात या संसारात आल्यानंतर ईश्वराच्या/पांडुरंगाच्या नामाचे चिंतन, स्मरण व मनन करावे कारण ईश्वराचे नाम हे सामर्थ्यशाली साधना व्यतिरिक्त इतर कोणत्याही साधनांची कास धरु नये. या ईश्वराच्या नामामुळे भक्तांचा पाठीराखा असणारा कृपाळू व दयाळू ईश्वर/पांडुरंगा भक्तांच्या कठीण प्रसंगात सहकार्यास धावत येत असुन ते निवारण करण्यासाठी सतत रक्षण करीत असतो. अशा प्रकारची आम्हा संतांची प्रतिमा आहे. माणसाचे गुण व दोष या कशाचाही ईश्वर/पांडुरंग विचार करीत नाही. ह्या सर्व बाबी त्याच्यापुढे गौण असुन आपल्या भाविक भक्तांच्या कामकाजासाठी सदैव त्वरीत धावत येवून खंबीरपणे पाठीशी उभा राहतो. तो भक्तांचा कैवारी ठरतो.
संत सेना महाराज म्हणतात, आपण माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर संसारात त्या ईश्वराचे/पांडुरंगाचे सदा सर्वकाळ आपल्या मुखाने नामस्मरण करावे. आपला कोणताही आयुष्यातील क्षण वाया घालवू नये.
6. आजि फळा आलें पुण्य ।
आजि फळा आलें पुण्य । गेलें भेदोनि गगन ।। 1।।
संत झालेति कृपाळ । माझा केलाजी सांभाळ ।। 2।।
संचित वोळलें । तुमचीं देखिलीं पाउलें ।। 3।।
सेना म्हणे नेणे । कृपा केली नारायणें ।। 4।।
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून संतांची कृपा माझ्यासारख्या भक्तांस लाभली असुन त्यामुळे पुण्यफळाशी आले आहे. माझ्या संचिताचे फळ मला प्राप्त झालेले आहे. त्यामुळे ईश्वराचे/पांडुरंगाचे चरण पाहता आले आहे. अशी कृपा माझ्यावर ईश्वराने/नारायणाने केली असल्याचे प्रतिपादन करतात.
तेराव्या शतकामधील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन असणारे संत सेना महाराज आहेत. या शतकात अगडपगड जातीतील संतांची मांदीयाळी उदयास आली होती. म्हणूनच ईश्वराप्रमाणे संत सुध्दा कृपाळू व दयाळू असतात. ही संतांची कृपा मला लाभली असल्याचे संत सेना महाराज सांगतात. आज माझे पुण्य फळासी आलेले आहे. आकाशाला भेदून टाकणारे पुण्य मला प्राप्त झाले आहे. कारण माझ्यावरती संतांची
कृपादृष्टी आहे. माझा सर्व सांभाळ संतांनी केला आहे. पुर्व सृकृत जे काही माझे जमा झाले होते ते संचित फळाशी आलेले आहे. त्याचे फळ मला प्राप्त झालेले आहे. कारण ईश्वराचे /पांडुरंगाचे चरण मला पाहता आले असुन त्या ईश्वरास मी काया, वाचा व मनाने समर्पित झालो आहे.
संत सेना महाराज म्हणतात, मी मनोभावे त्या ईश्वरास शरण गेल्यामुळे माझ्यावर ईश्वराने/पांडुरंगाने कृपा केलेली आहे.
7. आतां ऐसे करीगा देवा ।
आतां ऐसे करीगा देवा । तुझी घडो पाय सेवा ।। 1।।
मनामाजी दुर्बुध्दी । न यावी माउलिये कधीं ।। 2।।
चित्ती भाव जो धरिला । सिध्दी न्यावाजी विठ्ठला ।। 3।।
सेना म्हणे याविण कांहीं । लाभ दुसरा नाहीं ।। 4।।
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून ईश्वराला विनंती करतांना आपली चरणसेवा माझ्याकडून घडावी माझ्या मनात दुर्बुध्दी कधीही येवू नये. आपली भावभक्ति माझ्या चित्ती सदैव राहावी. व माझे संकल्प सिध्दीस न्यावे याशिवाय मला काहीही इतर लाभाची इच्छा नसल्याचे प्रतिपादन करतात.
संत सेना महाराज हे विठोबाचे निष्ठावंत भाविकभक्त आहेत. त्यांच्या मनात सदैव विठोबाचे स्मरण, चिंतन व मनन चालत असे. ते मनोभावे पांडुरंगास शरण गेले असल्याने ईश्वरास विनम्रपणे विनंती करतांना दिसतात. ईश्वरा आपण एवढी कृपा करावी की, आपली चरणसेवा मला सदैव घडावी तुझे स्मरण माझ्या मनात नित्य असु द्यावे. माझ्या मनात कोणतेही वाईट विचार व दुर्बुध्दी कधीही येवू देवू नकोस आपण कृपाळू व दयाळू असून माझी माऊली आहात. माझा सांभाळ व पालन पोषण करणारे आहात. म्हणून आपणच माझ्या चित्तात अहोरात्र विठोबा आहात, त्यामुळे माझे या जीवनातील संकल्प सिध्दीस जाणार आहेत. कारण आपण भाविक भक्तांचे पाठीराखे असुन सदैव त्यांच्या कामकाजाकरीता सहकार्य करीत आलेले आहात म्हणून आपण मला सहकार्य करावे.
संत सेना महाराज म्हणतात, ईश्वरा/पांडुरंगा माझ्या जीवनात आपली सेवा घडावी व आपणच माझ्या चिŸात सदैव राहावे हीच माझी इच्छा असुन माझी इतर काहीही लाभाची अपेक्षा नाही.
8. आजि सोनियाचा दिवस ।
आजि सोनियाचा दिवस । दृष्टीं देखिलें संतांस ।। 1।।
जीवा सुख झालें । माझें माहेर भेटलें ।। 2।।
अवघा निरसलाशीण । देखतां संतचरण ।। 3।।
आजि दिवाळी दसरा । सेना म्हणे आले घरा ।। 4।।
संत सेना महाराजांनी चार चरणाच्या अभंगातून संतांच्या भेटीमुळे सोनियाचा दिवस लाभला असल्याचे सांगतांना संतांची दृष्टीने झालेली भेट त्यामुळे जीवाला झालेला आनंदाचे कारण म्हणजे संत हे माझे माहेर असुन माझा सर्व शीण त्यामुळे नाहीसा झाला आहे. हा दिवस दिवाळी – दसरा असल्याचे प्रतिपादन करतात.
वारकरी सांप्रदायामधील संतांच्या भेटीचा आनंद ते प्रेमभावे व्यक्त करतांना म्हणतात, आज मला माझे माहेर भेटले आहे. कारण संतांच्या भेटीमुळे माहेरच्यांची भेट झाली आहे. आजचा दिवस हा सोनियाचा आहे कारण माझ्या डोळ्यांनी मी संतांना बघितले आहे. त्यामुळे माझ्या जीवास अत्यानंद झालेला आहे. संतांना मनोभावे शरण गेल्यानंतर मला त्यांच्या चरणाच्या दर्शनाचा लाभ झाला आहे. त्यामुळे माझ्या या संसारामधील असणारा थकवा नाहीसा झाला आहे. संतांच्या भेटीचा दिवस हा दसरा-दिवाळीप्रमाणे, आनंदाचा उत्साहाचा व प्रेमभावाचा असतो.
संत सेना महाराज म्हणतात, संतांची भेट ही फार महत्त्वाची असुन त्याद्वारे जीवाला आनंद होतो. दसरा-दिवाळी समान हा दिवस जीवाभावाचा व प्रेमाचा असतो याद्वारे घरामध्ये सुखशांती आलेली आहे.
9. आम्हां हेंचि अलंकार ।
आम्हां हेंचि अलंकार । कंठीं हार तुळशीचें ।। 1।।
नाम घेऊं विठोबाचें । म्हणवूं डिंगर तयाचें ।। 2।।
चित्तीं चाड नाहीं । न धरुं आणिकाची कांहीं ।। 3।।
सकळ सुख त्याचे पायीं । मिळें बैसलिया ठायीं ।। 4।।
सेना म्हणे याविण कांहीं । मोक्ष युक्ति चाड नाहीं ।। 5।।
संत सेना महाराजांच्या पाच चरणाच्या अभंगातून तुळशीचा हार/माळ हे आमचे अलंकार असुन आम्ही विठोबाचे नाम घेणारे भाविकभक्त आहोत. चिŸामध्ये कशाचिही कधी आवड नाही. ईश्वराच्या चरणी सर्वकाही सुख असुन ते बसलेल्या ठिकाणी सहज प्राप्त होते. याशिवाय मोक्ष व कशाचिही आवड नसल्याचे प्रतिपादन करतात.
पंढरीच्या विठोबाचे भाविकभक्तास आपल्या गळ्यात तुळशीची माळ परिधान करणे हे आवडीचे असुन तो आपला अलंकार समजतात. ती तुळशीची माळ गळयात घालणे भुषणावह बाब समजल्या जाते. विठोबाचे नाम मुखाने घेणारा हा भाविकभक्त विठोबाचा लाडका व आवडीचा असतो. विठोबाच्या नामाव्यतिरिक्त आपल्या चित्त आणीक कशाचीही आवड धरलेली नसते. सर्व सुख, आनंद हे त्या विठोबाच्या चरणी असल्याने त्याच ठिकाणी आपले चित्त स्थिर केल्या जाते. भाविकभक्तांनी आपला जीव त्या विठोबास समर्पित केलेला असतो.
संत सेना महाराज म्हणतात, ईश्वराच्या/पांडुरंगाच्या नामाव्यतिरिक्त मोक्ष/मुक्ती काहीही नको असल्याचे सांगतात, त्याची मनापासून आवड नसते.
10. आम्ही वारीक वारीक ।
आम्ही वारीक वारीक । करुं हजामत बारीक ।। 1।।
विवेक दर्पण आयना दाऊं । वैराग्य चिमटा हालऊं ।। 2।।
उदक शांती डोईं घोळूं । अहंकाराची शेंडी पिळूं ।। 3।।
भावार्थाच्या बगला झाडूं । काम क्रोध नखें काढूं ।। 4।।
चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत ।। 5।।
संत सेना महाराजांच्या पाच चरणाच्या अभंगातून आपल्या
व्यवसायामधील प्रतिमांचा वापर आध्यात्मिक तत्वाशी जोडला आहे. विवेकरुपी आरसा, वैराग्याचा चिमटा, शांतीरुपी पाणी, अहंकाराची शेंडी, कामक्रोधरुपी नखे अशा अनेकांचा वापर करुन उपदेश करण्यात आला आहे.
आम्ही वारीक वारीक म्हणजे सुक्ष्म प्रकारे या प्रपंच्याचे व परमार्थाचे मार्गदर्शन करणार आहोत. माझा व्यवसाय न्हाव्याचा असुन व्यवसायामधील प्रतिमांचा संबंध परमार्थीक तत्वाशी जोडला आहे. प्रपंच व परमार्थ करतांना सद्विवेकदृष्टी महत्वाची ठरते म्हणून माझ्याकडे येणाऱ्या गिऱ्हाईकास मी विवेकरुपी आयना म्हणजे आरसा दाखविणार आहे. ज्याद्वारे तो आपला प्रपंच व परमार्थ विवेकाने करणार आहे. प्रपंचाकडून परमार्थाकडे जातांना वैराग्याची कास धरावी लागते. म्हणून माझ्याकडे असणाÚया वैराग्यरुपी चिमट्याची ओळख करुन देणार आहेत.
मानवी जीवन जगत असतांना संसारात सुख समृध्दी येवून मनशांती फार महत्वाची व उपयोगाची ठरते. त्यांना मी शांतीरुपी पाणी डोळ्यास लावणार आहे. माणसाचा घात करणारा सर्वात भयानक शत्रु म्हणजे अहंकार होय. या अहंकाराच्या मी पणामुळे असंख्य समस्या आपले जीवन जगत असतांना निर्माण होतात. म्हणून अहंकाररुपी शेंडी पिळणार आहे.
मनात भावभक्ती त्या आलेल्या गि-हाईकामध्ये निर्माण करणार आहोत. माणसाचे अहंकाराप्रमाणेच काम व क्रोध हे सुध्दा शत्रु असतात. या दुर्गुणावर नियंत्रण ठेवण्यास सांगत आहे. त्याचे काम व क्रोधरुपी नखे काढणार आहे.
संत सेना महाराज म्हणतात, मी एकटया दुस-याला सांगत बसुन सर्व वर्णाच्या म्हणजेच ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र अशा चारही वर्णाच्या लोकांना म्हणजेच सर्वांना हा उपदेश सांगत आहे. त्यामुळे मला निवांतपणा लाभणार आहे.
11. आम्ही विष्णुचे दास ।
आम्ही विष्णूचे दास । न मानूं आणिक देवास ।। 1।।
स्तुति आणिकांची करिता । ब्रह्महत्या पडे माथा ।। 2।।
तुजविण देव म्हणतां । अवघी पापें पडो माथां ।। 3।।
न करी पूजा आणि सेवन । सेंना म्हणे तुझी आण ।। 4।।
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून आम्ही भगवान विष्णुचे दास आहोत. आम्ही इतर देवांना मानत नसुन त्यांची स्तुती केल्यास ब्रह्महत्या आमच्या माथी पडणार आहे. आम्हाला पाप लागणार असल्याचे प्रतिपादन करतात.
आम्ही भाविक भक्त हे भगवान विष्णुचे दासŸव स्विकारणारे दास आहोत. भगवान विष्णुशिवाय इतर कोणत्याही देवास आम्ही मानत नाही. कारण आमची निष्ठा ही भगवान विष्णु परमात्म्याला समर्पित आहे. काया, वाचा, मनाने आम्ही भाविकभक्त हे विष्णुचेच आहोत. इतर देवतांची बांधिलकी, आम्ही जर पत्करली तर ब्रह्महत्येचे पाप आमच्या शिरावर लागणार आहे म्हणून आम्ही ह्या ब्रह्महत्येचे वाटेकरी होवू इच्छित नाही. भगवान विष्णुशिवाय इतर देवतांना जर आम्ही मानलेत तर अनर्थ होवून आमचे माथी पाप लागणार आहे. म्हणून हे पाप करण्याची आमची मानसिकता नाही. आम्ही आमच्या विष्णुचे दास्यŸव स्विकारुन निष्ठावंत भाविकभक्त बनलो आहोत.
संत सेना महाराज म्हणतात, ईश्वरा/पांडुरंगा, तुझी शपथ घेवून सांगत आहे की, भगवान विष्णु देवता व्यतिरिक्त इतर कोणत्याही पूजा करणार नसुन सेवा सुध्दा करणार नाही फक्त श्रीविष्णुची पूजा आणि सेवा करणार आहोत.
12. उरतलों पार ।
उरतलों पार । संसारसिंधू हा दुस्तर ।। 1।।
कृपा केली पांडुरंगें । सर्व निवाली आंगे ।। 2।।
सुख संतोष पडे मिठी । आवडी पोटीं होती तें ।। 3।।
उपाधी वेगळा । सेना राहिला निराळा ।। 4।।
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून ईश्वराच्या / पांडुरंगाच्या कृपेने हा संसार सागर पध्दतशीर पार केला आहे. त्यामुळे सुख-आनंद प्राप्त झाला आहे. तसे संसारात अनेक अडचणी त्रास असतो. परंतु याशिवाय आम्ही निराळे असल्याचे प्रतिपादन करतात.
ईश्वर/पांडुरंग हा फार कृपाळु व दयाळु असतो तो भाविक भक्तांच्या प्रेमभक्तिच्या जोरावर त्यांचा अंकीत होतो व त्याची कृपादृष्टी भाविक भक्तांवर सदैव राहत आलेली आहे. मानवी जीवनातील संसार हा कठीण व अडचणीचा आहे तो पार करण्यासाठी विठोबाची कृपा असणे गरजेचे असते. आम्हा भाविक भक्तांना पांडुरंगाच्या कृपेने हा संसार सागर आनंदाने व सुखाने पार केला आहे. अन्यथा होवू शकला नसता. आपला संसार आनंदात व सुखात संपन्न व्हावा ही आंतरिक मनोकामना होती. ईश्वराची/पांडुरंगाची दयाळुपणाने त्यांच्या प्रती समर्पित भाव ठेवल्याने या संसाराचा त्रास झाला नाही. तो सहज पार केला गेला आहे.
संत सेना महाराज म्हणतात, मानवी संसार हा अडचणींचा, त्रासाचा असतो म्हणून ईश्वराची/पांडुरंगाची कृपादृष्टी असावी लागते. याकडे वेगळयाच निराळया दृष्टीने बघत आहे.
13. उदार तुम्ही संत ।
उदार तुम्ही संत । मायबाप कृपावंत ।। 1।।
केवढा केला उपकार । काय वाणूं मी पामर ।। 2।।
जडजीवा उध्दार केला । मार्ग सुपथ दाविला ।। 3।।
सेना म्हणे उतराई । होतां न दिसे कांहीं ।। 4।।
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून संत हे उदार असुन आपल्या मायबापाप्रमाणे कृपाळु व उदार असतात. त्यांचे किती उपकार हे सांगण्यासारखे असतात. मी मात्र अज्ञानी आहे. येथील जडजीवांचा उध्दार करुन त्यांना सन्मार्ग दाखविला त्यांच्या उपकाराची उतराई कधीही होवू शकत नसल्याचे प्रतिपादन करतात.
संत हे मनाने उदार व समाजाकरीता आपले संपूर्ण जीवन समर्पित करणारे असतात. आपल्या आई वडिलाप्रमाणे ते कृपा करणारे असतात. आईवडिल जसे आपल्या अपत्याची काळजी घेतात, पालन-पोषण करतात त्यांना सुसंस्कारीत करतात, सर्वतोपरी सहकार्य करतात. अशा प्रकारे संत हे समाजातील सर्वांना मार्गदर्शन करीत आलेले आहे. त्यांनी समाजातील मानवजातीच्या कल्याणासाठी आपला देह झिजवला आहे. समर्पित केलेला असल्याने त्यांचे समाजाप्रती उपकार हे फार मोठे असुन शब्दात वर्णन करण्याजोगे नाही. या मानवी जातीचा, या जडजीवाचा उध्दार करण्यासाठी, सन्मार्ग दाखविण्याचे कार्य संतांनी अहोरात्र केलेले आहे.
संत सेना महाराज म्हणतात, संतांनी केलेल्या समाज कर्तव्याचे/
उध्दाराचे कार्याच्या उपकारातून उतराई आपल्याकडून होवू शकत नाही.
14. ऐसी आवडी आहे जीवा ।
ऐसी आवडी आहे जीवा । कैं पाहीन केशवा ।। 1।।
माझी पुरवा वासना । सिध्दी न्यावी नारायणा ।। 2।।
नलगे वित्त धन । मुखीं नाम नारायण ।। 3।।
सेना म्हणें कमळापती । हेंचि द्यावे पुढती पुढती ।। 4।।
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून ईश्वरा/पांडुरंगा, आपली भेट व्हावी व माझ्या डोळ्याने आपणांस केव्हा बघता येईल. ही मनातील इच्छा पूर्ण करावी. मला संपत्ती व ऐश्वर्याची आवश्यकता नसुन मुखाने फक्त नारायणाचे नाम घेता यावेत ईश्वरा, आपण मला हेच द्यावे असे प्रतिपादन करतात.
ईश्वरा/पांडुरंगा, मी आपला भाविकभक्त आहे. आपणांस मी मनोभावे शरण आलेलो आहे. माझ्या जीवास आपली भेट व्हावी, आपले रुप माझ्या डोळ्याने मला दिसावे अशी मनिषा माझी आहे. एवढी साधी इच्छा पांडुरंगा आपण पुर्णत्वास न्यावी मानवी जीवनातील संसारात आल्यानंतर माणुस हा धनाची अपेक्षा करीत असतो. परंतु माझ्या दृष्टीने मला
धनाची/पैशाची तसेच ऐश्वर्याची अपेक्षा अजिबात नाही. ईश्वरा/पांडुरंगा, आपले नाम एवढे श्रेष्ठ आहे की, त्याचे सामर्थ्याने अनेकांचा उध्दार झालेला आहे. म्हणूनच आपले नाम माझ्या मुखाने सदैव अहोरात्र घेत राहावे, हीच माझी अपेक्षा आहे त्याद्वारे माझा उध्दार होणार आहे.
संत सेना महाराज म्हणतात, ईश्वरा/पांडुरंगा, माझ्या मुखातुन सदैव आपल्या नामाचा उच्चार व्हावा हीच माझी मागणी आहे.
15. ऐशी आवडी आहे माझ्या जीवा ।
ऐशी आवडी आहे माझ्या जीवा । तुजसि केशवा निवेदिलें ।। 1।।
पांडुरंगा ऐसें वाटतेसे जीवा । करिन संतसेवा अहर्निशीं ।। 2।।
नलगे विŸा गोत वैकुंठी राहणें । साज्युता सदनीं चाड नाहीं ।। 3।।
करुणास्वरें सेना बहात विठ्ठला । हेतु पुरविला आवडीचा
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून ईश्वरा/पांडुरंगा, माझ्या जीवास असणारी आवड आपणांस निवेदन करीत असुन मला संपत्ती, वैकुंठ काहीही न देता फक्त दिवसरात्र संत सेवा करण्याची
संधी द्यावी. अशी करुणेची माझी हाक असुन ती पुरवावी असे प्रतिपादन करतात.
ईश्वरा/पांडुरंगा, मी आपला निष्ठावंत भाविकभक्त आहे. आपणांस मी मनोभाव शरण आलेलो आहे. आपणांस माझी नम्रतेने विनंती आहे की, या संसारात मला संपत्ती नाही दिली तरी चालेल. तसेच वैकुंठी राहणे सुध्दा मला पसंत पडणार नाही. व मुक्तिपैकी, सायुज्जता मुक्तिसुध्दा मला देवू नये. फक्त एकच करावे. माझ्या हातून संतसेवा घडावी तेही अहोरात्र मी संत सेवेत राहावे. ज्याद्वारे माझा परमार्थ साधल्या जाईल. मी संतांची सेवा प्रामाणिकपणे करणार असल्याचे आपणांस सांगत आहे. माझ्या दृष्टिने इतर सर्वकाही दुय्यम आहे. संतांच्या
सान्निध्याने त्यांच्या सेवेमुळेच माझ्या या जीवनाचा उध्दार होणार आहे. असे मला वाटते.
संत सेना महाराज म्हणतात, ईश्वरा/पांडुरंगा, माझ्या मनाची जी संत सेवा करण्याची जी इच्छा आहे ती करुणेने आपणांस विनवणी करीत आहे. ती पुर्ण करावी.
16. अंगिकार केला ।
अंगिकार केला । भार चालवी विठ्ठला ।। 1।।
संतीं सांगितलें । तें म्यां हृदयीं धरिलें ।। 2।।
तारिला अजामिळ । महापापी कीं चांडाळ ।। 3।।
पतितपावन । करी नाम हें जतन ।। 4।।
वागवीं अभिमान । सेना न्हावी यातिहीन ।। 5।।
संत सेना महाराजांच्या पाच चरणाच्या अभंगातून संतांनी ज्या बाबी सांगितल्या आहेत त्या मी हृदयामध्ये ठेवल्या आहेत. आपल्या नामाचा स्विकार केल्याने माझा भार आपणांवर टाकलेला आहे. ईश्वरा, आपण अनेक पापीयांचा उध्दार केलेला आहे. म्हणून नामाचा महिमा जतन करीत असल्याचे प्रतिपादन करतात.
ईश्वरा/पांडुरंगा, मी आपला निष्ठावंत भाविकभक्त आहे. संतांनी सांगितल्याप्रमाणे मी ईश्वराच्या नामाची कास धरली असुन सदैव माझ्या हृदयात आहे. ईश्वराच्या/पांडुरंगाच्या नामात एवढे सामर्थ्य/शक्ती आहे की, अनेक पापीयांचा उध्दार या नामामुळे झालेला असल्याचे दिसुन येते. अजामेळा याने मरतांना आपला मुलगा नारायण, नारायण असे नाव उच्चारले आहे. नारायण मुळ नाम हे ईश्वराचे असल्याने त्याचा उध्दार भगवंताने केलेला आहे. म्हणून ईश्वराचे नाम आपल्या हृदयात जतन करुन ठेवावे कारण ते नाम पावन करणारे असल्याने आपला उध्दारच होवून आपले जीवन सार्थकी लागणार आहे.
संत सेना महाराज म्हणतात, ईश्वराचे/पांडुरंगाचे नामामध्ये एवढी अगाध शक्ती आहे की, आपल्या जीवनाचा उध्दार त्यामुळे होतो. म्हणुन या ईश्वराच्या नामाचा अभिमान वाटु द्यावा आपण कोणत्याही जातीचे असलो तरी काहीही फरक पडत नाही. ईश्वराचे नाम महत्वाचे ठरते.
17. अंतरीचें पुरें काम ।
अंतरीचें पुरें काम । घेतां नाम विठोबाचे ।। 1।।
नाम साराचेंही सार । शरणागत यमकिंकर ।। 2।।
पाहिले वेदांत । निश्चय केला निगमांत ।। 3।।
सेना म्हणे न वेचा कांहीं । लाभ नाहीं या ऐसा ।। 4।।
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून ईश्वराचे/पांडुरंगाचे नाम हे सर्व साराचे सार असुन ते अंतःकरणापासुन घेतल्यास यमाचे सेवक/दुत हे शरण जातात हे सर्व वेदांत व निगमाने पाहिले आहे. याशिवाय या जीवनातील संसारात लाभ नसल्याचे प्रतिपादन करतात.
ईश्वराचे/पांडुरंगाचे नाम हे सर्वश्रेष्ठ व सामर्थ्यशाली असुन सर्व साराचे सार आहे. तसेच ते बीजतत्व असुन संपूर्ण सृष्टी यामधून निर्माण झालेली आहे. म्हणूनच विठोबाचे नाम अंतःकरणापासून आपल्या मुखाने घेत राहावे. ईश्वराचे नाम घेण्याचे काम आपण आपल्या मनाला सांगावे त्यामुळे यमाचे दुत हे ईश्वराच्या नामाच्या सामर्थ्याने आपणांस शरण जातात. त्यांचे यापुढे काहीही चालत नाही. ईश्वराच्या नामाची महती/सामर्थ्य हे वेदांत म्हणजेच उपनिषिदाने जाणले आहे. तसेच निगम म्हणजे
आध्यात्मिक शास्त्राने सुध्दा याची महती गायली आहे.
संत सेनामहाराज म्हणतात, ईश्वराच्या/पांडुरंगाच्या नामामुळे मानवी जीवनाचा उध्दार होत असुन याशिवाय कशाचिही कास धरु नये. त्यामुळे आपला लाभच होणार आहे. जीवन सार्थकी ठरणार आहे.
18. करिसी खटपटी ।
करिसी खटपटी । पोटासाठीं आटाआटी ।। 1।।
नाम घेतां विठोबाचें । काय तुझ्या वाचें वेंचे ।। 2।।
धनाचिया आशा । वाउगा फिरसी दाही दिशा ।। 3।।
जावें हरिकीर्तना । आवडेचि तुझ्या मना ।। 4।।
सेना म्हणे ऐसा नरा । जवळूनि दूर करा ।। 5।।
संत सेना महाराजांच्या पाच चरणाच्या अभंगातून या संसारात माणुस हा काबाडकष्ट पोटासाठी व धनाच्या आशेने करीत असतो. आपल्या मुखाने त्या विठोबाचे नाम घेतल्यास काहीही बिघडत नाही. हरिकीर्तनाचा लाभ घेवुन मनाशी आवड निर्माण करावी. असे न करणाÚया माणसाच्या आपण दूर करावे असे प्रतिपादन करतात.
माणुस म्हणून जन्माला आल्यानंतर माणुस ह्या संसारात अहोरात्र काबाडकष्ट आपल्या पोटासाठी करतांना दिसतात. आपणांस धन, संपत्ती मिळावी ते मिळविण्यासाठी चारही दिशाला म्हणजेच सगळीकडे धावपळ करतो. परंतु आपल्या मुखाने त्या विठोबाचे नाम घेतांना मात्र दिसत नाही. विठोबाचे नाम मुखाने घेतल्यास त्याला काहीही कष्ट पडत नाहीत. काहीही त्रास होत नाही. त्याच्या वडीलाचे सुध्दा काहीही नुकसान होत नाही. ईश्वराचे/पांडुरंगाचे नाम हे सर्वश्रेष्ठ व सामर्थ्यशाली असुन तारक आहे. म्हणजेच या संसारातून तारणारे आहे. आपल्या मनाला हरिकीर्तनाला जावे असे वाटले पाहिजे. त्याची आवड मनात जोपासली पाहिजे. त्यामुळे आपला फायदाच होतो. नुकसान काहीही होत नसते.
संत सेना महाराज म्हणतात, आपल्या फक्त पोटासाठी जगणारा व काबाडकष्ट करणारा, मुखाने हरिनाम न घेणारा व हरिकीर्तनास न जाणाÚया माणसाच्या आपण दूर राहावे. त्याचे जवळसुध्दा जावू नये.
19. करा हाचि विचार ।
करा हाचि विचार । तरा भवसिंधु पार ।। 1।।
धरा संतांची संगती । मुखीं नाम अहोराती ।। 2।।
अजामीळ पापराशी । पार पावविलें त्यासी ।। 3।।
नका धुरें भरुं डोळा । सेना सांगे वेळोवेळां ।। 4।।
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून संसारसागर आनंदाने पार करण्यासाठी संतांची संगत धरावी व मुखाने विठोबाचे नाम घ्यावे अशा प्रकारचा विचार करावा ईश्वराच्या नामाने पापी असणाÚया अजामेळाचा उध्दार झाला आहे. आपली दृष्टी भ्रमिष्ट करु नये. असे वारंवार सांगत असल्याचे प्रतिपादन करतात.
मानवी जीवनात संसारात जगत असतांना हा संसार सागर सुखाने व आनंदाने पार करण्यासाठी संतांना मनोभावे शरण जावे लागते व संतांची संगत धरावी. संतांच्या मार्गदर्शनाद्वारे व उपदेशाद्वारे आपल्या मुखाने विठोबाचे नाम सदा सर्वकाळ घेत राहावे अशा प्रकारचा विचार आपल्या मनात आणावा. ईश्वराच्या/पांडुरंगाच्या नामात एवढे सामर्थ्य आहे की, अनेक पापीयांचा उध्दार या नामतŸवाद्वारे झाला आहे. अजामेळा यांनी मरतेवेळी आपल्या मुलाचे नारायण, नारायण असे नाव घेतले असता, नारायण हे मुळ नाम श्री भगवंत परमात्मा विष्णु देवतांचे असल्याने त्याचा उध्दार झाला आहे. आपल्या असंख्य पापांचा नाश या नामामुळे झाल्याचे दिसुन येते.
संत सेना महाराज म्हणतात, संतांची संगत, विठोबाचे नाम मुखाने घेणे याबाबत आपल्या डोळयात धूर भरु नये. आपण भ्रमिष्ट होवू नये. आपली दृष्टी ही चांगली ठेवावी. असे वेळोवळी सांगत आहे.
20. करितां परोपकार ।
करीतां परोपकार । त्याच्या पुण्या नाहीं पार ।। 1।।
करीतां परपीडा । त्याच्या पाया नाहीं जोडा ।। 2।।
आपुलें परावें समान । दुजा चरफडे देखून ।। 3।।
आवडे जगा जें कांहीं । तैसें पाहीं करावें ।। 4।।
उघडा घात आणि हित । सेना म्हणे आहे निश्चित ।। 5।।
संत सेना महाराजांच्या पाच चरणाच्या अभंगातुन परोपकाराची परिणीती पुण्यात, परपीडेची दुःखात तसेच आपले व परके या सर्वांचा परिणाम माणसाला भोगावा लागतो. माणसाचे हित व घात सुध्दा सर्वकाही आपल्यावरच अवलंबुन असुन म्हणून निश्चित योग निवड करण्याचे प्रतिपादन करतात.
मानवी जीवनातील संसारामध्ये माणसाने केलेले परोपकार निश्चितच पुण्याचा साठा होण्यास कारणीभुत ठरते. याउलट इतरांना परपीडा म्हणजेच त्रास देण्याची परिणीती ही पापात म्हणजेच दुःख होण्यात होत असते. म्हणजेच परोपकार पुण्यात म्हणजेच सुखात, व परपीडा हे पापात म्हणजेच दुःखात त्याचा परिणाम होत असतो. तो माणसाला भोगावा लागतो. आपण माणुस म्हणून जगत असतांना आपुले आणि परके यामध्ये समानता करावी लागते. भेदाभेद करु नये. अन्यथा त्याचे इतरांना दुःख व त्याचे परिणाम भोगावे लागतात. मानवी जीवन जगत असतांना जे काही योग्य सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने चांगलेच करावे लागते. माणसाचे हित साध्य करणे हे आपल्यावरच अवलंबुन असते. व घात करणे हे सुध्दा आपणच आपला करीत असतो.
संत सेना महाराज म्हणतात, परोपरकार की परपीडा यामधुन योग्य म्हणजे परोपकाराची निवड करुन आपला घात न करता माणसाचे हित साधावे. अशा प्रकारे आपले जीवन जगत जावे. ज्याद्वारे आपला उध्दार होईल.
21. करितां योगयाग ।
करितां योगयाग । सिध्दी न पवेचि सांग ।। 1।।
देव एक भावाविण । नाहीं व्यर्थ शीण ।। 2।।
केल्या तपाचिया राशी । तरि न मिळेची त्यासी ।। 3।।
करितां धूम्रपान । न भेटे नारायण ।। 4।।
सेना म्हणे नको कांहीं । एका वीण दुजे नाहीं ।। 5।।
संत सेना महाराजांच्या पाच चरणाच्या अभंगातून ईश्वर/पांडुरंग हा भावाचा भुकेला असतो योग, याग, तप व धुम्रपान या साधनाद्वारे तो प्राप्त होवु शकत नाही तर मनातील भावभक्तिने तो प्राप्त होतो. तेव्हाच भगवान नारायणाची भेट होवू शकते. याशिवाय दुसरा कोणताही उपाय नसल्याचे प्रतिपादन करतात.
ईश्वर/पांडुरंग हा प्राप्त होण्यास योग साधनेची आवश्यकता नसते याग म्हणजे यज्ञांची सुध्दा गरज भासत नाही. तप व धुम्रपान ही साधनासुध्दा निकाली ठरते. म्हणजेच योग, याग, तप आणि धुम्रपान या पाचही साधनाद्वारे ईश्वरप्राप्ती होईलच हे सांगता येत नाही. मात्र ईश्वराला/पांडुरंगाला, काया, वाचा व मनाने शरण जावून मनोभावे त्या ईश्वराची पांडुरंगाची भावभक्ति केल्याने तो निश्चित प्राप्त होत असल्याचे व त्याची भेट होत असल्याचे महाराज सांगतात. माणसाच्या मनातील आंतरिक भावभक्ति ही महŸवाची ठरते त्यामुळे ईश्वर/पांडुरंगा भाविक भक्तांच्या अंकीत राहतो व त्यांच्या अंकीत असतो भक्तांच्या रक्षणार्थ व कामकाजाकरीता धावत येत असतो. इतर साधनाने ते साध्य होवु शकत नाही.
संत सेना महाराज म्हणतात, ईश्वराची/पांडुरंगाची भावभक्ति व्यतिरिक्त इतर काहीही नको आहे.
22. करितां विनवणी ।
करितां विनवणी । हात जोडोनियां दोन्ही ।। 1।।
हेंचि द्यावे मज दान । करा हरीचें चिंतन ।। 2।।
जातों सांगुनिया मात । पांडुरंग बोलावित ।। 3।।
सोडा द्वादशी पारणें । सुखें करावें कीर्तन ।। 4।।
दिवस मध्यान्हीं आला । सेना वैकुंठासी गेला ।। 5।।
संत सेना महाराजांच्या पाच चरणाच्या अभंगातून ईश्वराला / पांडुरंगाला दोन्ही हात जोडून विनवणी करतात की, मला हरिचे चिंतन करण्याचे दान द्यावे. मला पांडुरंग बोलावत असुन एकादशीला हरिचे कीर्तन व द्वादशीला तो उपवास सोडावा मध्यान्ही दिवस आल्यानंतर वैकुंठासी जात असल्याचे प्रतिपादन करतात.
संत सेना महाराज, मनोभावे ईश्वराला/पांडुरंगाला दोन्हीही हात जोडून विनम्रपणे विनंती करतांना दिसतात. माझ्या मनात हरिचे चिंतन, मनन व स्मरण सतत राहु द्यावे असे मला दान द्यावे. हीच माझी मागणी आहे. मला पंढरीच्या पांडुरंगाचे वैकुंठीस जाण्यासाठी बोलावणे आलेले असल्याने मनात सदैव विठोबाचे चिंतन असावे. आज असणाÚया एकादशीचा दिवस, आपण आनंदाने त्या हरिचे हरिकीर्तन करावे. एकादशीनंतरचा दुसरा दिवस हा द्वादशी असतो. एकादशीला आपला उपवास असतो. उपवास म्हणजे ईश्वराचे भजन, पूजन, प्रवचन कीर्तनाद्वारे त्याच्याजवळ जाणे होय. द्वादशीला आपण एकादशीचा उपवास सोडावा आणि पारणे फेडतो.
संत सेना महाराज म्हणतात, द्वादशीला पारणे फेडल्यानंतर त्यादिवशी दुपारला पांडुरंगाने वैकुंठी बोलावल्यामुळे तेथे जात आहे.
23. कशासाठीं करितां खटपट ।
कशासाठीं करितां खटपट । तप तीर्थ व्रतें अचाट ।। 1।।
नलगे शोधावें गिरिकानन । भावें रिघा विठ्ठला शरण ।। 2।।
विभांडक शृंगी तपस्वी आगळा । क्षण न लागतां रंभेनें नागविला ।।3।।
जाणोनि सेना निवांत बैसला । केशवराजा शरण रिघाला ।। 4।।
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून तप, तीर्थ व व्रत या पर्वावर अरण्याकडे जाणे या सर्व बाबीमुळे ईश्वर/पांडुरंग शोधता येईल हे सांगता येत नाही. पण मनोभावे, भावभक्तिने पांडुरंगास शरण गेल्यास तो मिळू शकतो. ज्ञानी व तपस्वी असणारे ऋषी यांची तपश्चर्या रंभेने भंग केली म्हणून ईश्वराला पांडुरंगाला शरण जावे असे प्रतिपादन करतात.
ईश्वराची पांडुरंगाची प्राप्ती ही तपश्चर्या करुन होवू शकत नाही. ज्ञानी व तपश्चर्या करणारे शृंगी ऋषी यांची तपश्चर्या भंग करुन रंभेने त्यांना नागविल्याचे दिसुन येते तसेच अनेक तीर्थाटने केल्यावर सुध्दा ईश्वराची प्राप्ती होवू शकत नाही. तसेच व्रतवैकल्याने सुध्दा तो प्राप्त होवू शकत नाही. त्याला शोधण्याकरीता अरण्यात/पर्वतावर जाण्याची आवश्यकता वाटत नाही. ईश्वराला/पांडूरंगाला काया, वाचा, मनाने शरण जावे व मनोभावे समर्पित व्हावे. आपल्या मनातील भावभक्तिद्वारे तो भगवंत/विठोबा आपणांस प्राप्त होत असतो. इतर कोणतेही साधन वापरण्याची आवश्यकता नसते.
संत सेना महाराज म्हणतात, ईश्वर/पांडुरंग हा भावभक्तिने प्राप्त होत असतो याकरीता त्या ईश्वरास मनोभावे शरण जाणे आवश्यक असते. ह्या सर्व बाबी सांगुन मी निवांत बसलो आहे.
24. कळेल तैसें गाईन तुज ।
कळेल तैसें गाईन तुज । नाहीं जनासवें काज ।। 1।।
स्तुती करीन आवडी । जैसी जीवा वाटे गोडी ।। 2।।
नाम गाईन आनंदें । नाचेन आपुलाले छंदे ।। 3।।
सेना म्हणे नाहीं । जनासवें काज कांही ।। 4।।
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून ईश्वरा/पांडुरंगा, मी आपला भाविक भक्त असल्याने मला जसे गाता येईल त्याप्रमाणे मी गाणार आहे. आपली जशी स्तुती करता येईल. तशी आवडीने करणार आहे. मला लोकांचे काहीही घेणे देणे नाही. ईश्वराचे नाम आनंदाने घेवून आपल्या आवडीने गाणार आहे.
ईश्वरा/पांडुरंगा, मी आपणांस मनोभावे शरण आलेलो आहे. तसेच आपला निष्ठावंत भाविकभक्त आहे. मी आपणांस काया, वाचा, मनाने समर्पित झालेलो आहे. म्हणूनच आपले गोडवे मी मला ज्याप्रमाणे कळले आहे. तशाप्रकारे गाणार आहे. मला लोकांचे काहीही पर्वा नाही. आपली स्तुती ही आवडीने माझ्या जीवास जशी योग्य वाटते तशाप्रकारे मनोभावे करणार आहे. आपले नाम हे सर्वश्रेष्ठ असुन सामर्थ्यशाली आहे. म्हणून आपले नाम मी आनंदाने, प्रेमाने गाणार आहे व आपल्या आवडीने नाचणार आहे. मी तल्लीन होवून ह्या सर्व बाबी करणार आहे. कारण माझ्या हृदयात सदैव आपले स्थान आहे. त्याचेच चिंतन, स्मरण व स्तवन करीत आलेलो आहे.
संत सेना महाराज म्हणतात, ईश्वरा/पांडुरंगा, आपले सर्वश्रेष्ठ असणारे नाम मी प्रेमाने व आनंदाने गाणार आहे. याकरीता मला लोकांची काही पर्वा नसुन त्यांच्याशी माझे काहीही काम नाही.
25. कांहीं न करी रे मना ।
कांहीं न करी रे मना । चिंती या चरण विठोबाच्या ।। 1।।
ठाव नाहीं कल्पनेसी । राशी सुखाची अमूप ।। 2।।
पाहिलें श्रीमुख । नासे दुःख महाताप ।। 3।।
होईल विसावा । सेना म्हणे सुख जिवा ।। 4।।
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून ईश्वराचे/पांडुरंगाचे चरणावर आपले चित्त असु द्यावे. इतर काहीही मनाने केले नाही तरी चालणार आहे, संसारामधील कल्पनेच्या आहारी न गेल्यास सुखप्राप्त होते. विठोबाचे श्रीमुख पाहताक्षणी महातापापासून होणारे दुःख नाहीसे होते त्यामुळे जीवाला आराम लाभणार असल्याचे प्रतिपादन करतात.
ईश्वरा/पांडुरंगा, मी आपला निष्ठावंत भाविकभक्त आहे म्हणून माझ्या चित्तात अखंड तुझेच चरण मला सदैव दिसत आहे. माझ्या मनात तुझ्या चरणाव्यतिरिक्त इतर काहीही नसते. या संसारामधील असणाÚया कल्पना ह्या बाधक असतात. त्यामुळे अनेक अडचणी जीवन जगतांना दिसून येतात माझे मन तुझ्या चरणी असल्याने मला कल्पना बाधु शकत नाही. त्यामुळे या जीवनात सुख, आनंद व प्रेम भरपूर निर्माण झाले आहे. आदिभौतिक, आदिदैविक व आध्यात्मिक तापापासून होणारे दुःख नाहीसे झालेले आहे.
संत सेना महाराज म्हणतात, ईश्वर/पांडुरंगा, आपण माझ्या चित्तात सदैव राहीला त्यामुळे मला या संसारात भरपूर आनंद व सुख प्राप्त होत आहे. त्यामुळे माझ्या जीवाला आराम लाभणार आहे.
26. कटीं ठेऊनिया कर ।
कटीं ठेऊनिया कर । रुप पाहिलें मनोहर ।। 1।।
तेणें समाधान चिŸा । पायीं ठेवियला माथा ।। 2।।
वाहो टाळी गातो गीत । सुखें नाचे राउळांत ।। 3।।
सेना म्हणे नामा पुढें । तुच्छ सकळ बापुडें ।। 4।।
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून पांडुरंगाच्या सगुण स्वरुपाचे वर्णन करतांना विठोबाने आपले हात कमरेवर ठेवले आहेत. पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक झाल्यानंतर चित्ताला समाधान लाभते. त्याचे रुपसुध्दा आकर्षक आहे. टाळी वाजवून गीत गात आहे. व आनंदाने राऊळात नाचत आहे. ईश्वराच्या नामापुढे सर्वकाही तुच्छ असल्याचे प्रतिपादन करतात.
ईश्वराचे/पांडुरंगाचे निवासस्थान पंढरी वैकुंठ असुन त्या ठिकाणी दोन्हीही हात कमरेवर ठेवून तो पांडुरंग समचरण विटेवर उभा आहे. पांडुरंगाचे सुंदर असे सगुण स्वरुप मनाचा वेध घेणारे आकर्षक असे आहे. पांडुरंगाचा मी निष्ठावंत भाविकभक्त असल्याने काया, वाचा, मनाने समर्पित होवून त्याचे चरणावर माझे मस्तक ठेविले आहे. त्यामुळे माझ्या चित्ताला समाधान लाभले आहे. माझ्या मनाला झालेल्या आनंदाने मी टाळी वाजवून पांडुरंगाचे गीत गात आहे. व राऊळात आनंदाने नाचत आहे.
संत सेना महाराज म्हणतात, ईश्वराच्या/पांडुरंगाच्या नामापुढे सर्वकाही तुच्छ आहे. कारण ईश्वराचे नाम हे बीजतŸव असुन संपूर्ण सृष्टी त्यामधुन निर्माण झाली आहे. हे जग त्यामधूनच निर्माण झाले आहे.
27. घेतां नाम विठोबाचें ।
घेतां नाम विठोबाचें । पर्वत जळती पापांचे ।। 1।।
ऐसा नामाचा महिमा । वेद शिणला झाली सीमा ।। 2।।
नामें तारिलें अपार । महा पापी दुराचार ।। 3।।
वाल्हा कोळी ब्रह्महत्यारी । नामें तारिला निर्धारीं ।। 4।।
सेना बैसला निवांत । विठ्ठल नाम उच्चारीत ।। 5।।
संत सेना महाराजांच्या पाच चरणाच्या अभंगातून ईश्वराच्या / पांडुरंगाच्या नामाचे महŸव कथन केले आहे. विठोबाच्या नामाच्या सामर्थ्यामुळे पापाचे पर्वतसुध्दा जडतात. या नामाची महती सांगतांना वेद थकुन गेले आहेत. नामाद्वारे असंख्य दुराचाÚयांचा उध्दार झाला आहे. ब्रह्महत्या करणारा वाल्या कोळीचा नामाद्वारे उध्दार झाला आहे. विठोबाचे नाम मुखाने घेवून शांतचित्ताने बसत असल्याचे प्रतिपादन करतात.
ईश्वराच्या/पांडुरंगाच्या नामाचे सामर्थ्य एवढे मोठे आहे की, माणसाच्या हातून पर्वताएवढे पाप झाले तरी त्या पापाचा नायनाट या ईश्वरी नामामुळे होत असतो. ईश्वराचे पांडुरंगाचे नामाचे महŸव प्रतिपादन करतांना ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद हे चार वेद थकुन गेले आहेत. त्यांची परिसिमा संपली आहे. ईश्वराच्या/पांडुरंगाच्या नामाने असंख्य पाप करणारे दुराचारी सुध्दा या संसारामधून तरुन गेले आहे. बह्महत्या करणारा वाल्याकोळी याने केलेल्या रामनामाच्या जपामुळे सर्व पापांचा नायनाट झाला असुन त्याने रामायणाची निर्मिती केलेली आहे. त्यांचा ईश्वराच्या रामनामामुळेच उध्दार झाला आहे.
संत सेना महाराज म्हणतात, ईश्वराचे/पांडुरंगाचे नाम सर्वश्रेष्ठ असुन तारक असल्याने ते मी माझ्या मुखाने घेत आले. व निवांतपणे बसलो आहे.
28. चित्त नाहीं हातीं ।
चित्त नाहीं हातीं । करुं जाता हरिभक्ति ।। 1।।
मज इतुली वासना । भेटी द्यावी नारायणा ।। 2।।
कोण जाणे दानधर्म । नव्हे स्वतंत्र कैचें कर्म ।। 3।।
सेना म्हणे सांगें मात । जेणें माझें होय हित ।। 4।।
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून ईश्वरा/पांडुरंगा माझे चित्त माझ्या हातात नसल्याने हरिभक्ति करता येत नाही. आपण माझी इच्छा पूर्ण करावी. दान, धर्म व सत्कर्म सांगुन संसारातील अडचणीचा कसा प्रतिबंध करावा व माझे हित साधावे असे प्रतिपादन करतात.
ईश्वरा/पांडुरंगा, माणसाचे मन फार चंचल असते. ते कधीही स्थिर राहत नाही. म्हणून माणसाचे चित्त माणसाच्या हाती नसते. त्याचेवर नियंत्रण मोठ्या प्रयासाने मिळविता येते. तसेच ईश्वराचे हरिभक्ति कशा पध्दतीने करावी हे मला कळत नाही. कारण माझे चित्त माझ्या हाती नाही. माझी आपणांस विनवणी आहे की, आपण माझी ही मनोकामना पुर्ण करुन माझे चित्त आपल्या चरणी स्थिर करावे. आपल्या चिंतनात मला राहु द्यावे व आपण मला भेट द्यावी मानवी जीवनात आल्यानंतर दानधर्म कसा करावा लागतो. त्याबाबत सुध्दा मला मार्गदर्शन करावे. तसेच जीवनात कर्माला सुध्दा महत्व असते, सत्कर्मामुळे परमार्थ घडतो व वाईट कर्माने पाप घडते. सुख दुःखाच्या स्वरुपात त्याची फळे माणसाला भोगावी लागतात.
संत सेना महाराज म्हणतात, मानवी जीवनातील संसारात अनेक समस्या असतात ह्या समस्या/अडचणी सोडविण्यास व त्यास कशाप्रकारे प्रतिबंध करावा जेणेकरुन माझे हीत साधल्या जाईल, व माझ्याकडून परमार्थ घडणार आहे. याबाबत मार्गदर्शन करावे.
29. जातां पंढरीसी सुख वाटे जीवा ।
जातां पंढरीसी सुख वाटे जीवा । आनंदें केशवा भेटतांचि ।। 1।।
या सुखाची उपमा नाहीं त्रिभुवनीं । पाहिली शोधोनी अवघीं तीर्थे ।। 2।।
ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार । ऐसे वैष्णव डिंगर दावा कोठें ।। 3।।
ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक । ऐसा वेणूनादीं काला दावा ।। 4।।
ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर । ऐसें पाहतां निर्धार नाहीं कोठें ।। 5।।
सेना म्हणे खूण सांगितली संतीं । यापरती विश्रांती न मिळे जीवा ।। 6।।
संत सेना महाराजांच्या सहा चरणाच्या अभंगातून पंढरीसारखे सुख त्रिभुवनात सुध्दा सापडत नाही कारण तेथे पंढरीनाथाचे दर्शन होते. विठोबाचा नामघोष, वैष्णवजन, चंद्रभागा, भक्त पुंडलिक या सर्व बाबी इतर कोठेही आढळत नसन्याचे प्रतिपादन करतात.
विठोबाचे निष्ठावंत भाविकभक्त मोठया श्रध्देने पंढरीला जातात. तेव्हा त्यांच्या आनंदाला परिसिमा नसते. त्यांच्या जीवाला अत्यंत आनंद होतो. त्या भक्तांना मिळणारा आनंद व सुख हे त्रिभुवनात मिळणाÚया आनंद व सुखाच्या पलिकडचा असतो. असे तीर्थक्षेत्र कोठेही शोधुन सापडत नाही. या ठिकाणी होणारा विठोबाच्या नामाचा जयघोष, दिंड्या पताकांचा भार, वैष्णवजन दिसून येतात. तसेच येथे वाहणारी चंद्रभागा व भक्तपुंडलिक यांनी पांडुरंगाला पंढरीत आणले हे येथेच दिसुन येतात. भाविकभक्तांनी केलेला वेणुनाद हा पंढरीत होतो. विटेवर समचरण उभा असणारा व दोन्ही हात कटेवर ठेवणारा विठोबा हा येथे पंढरीतच आहे. इतरत्र कोठेही दिसत नाही.
संत सेना महाराज म्हणतात, पंढरीसारखे सुख व आनंद इतरत्र कोठेही नसुन पांडुरंगाच्या भेटीमुळे पंढरीत संत संगती लाभली आहे. मला भक्तिची खुणगाठ संतांनी सांगितली आहे. त्यामुळे माझे अस्थिर मन स्थिर झाले असुन मनशांती लाभली आहे.
30. जेथें वेदा न कळे पार ।
जेथें वेदा न कळे पार । पुराणसी अगोचर ।। 1।।
तो हा पंढरीराणा । बहु आवडतो मना ।। 2।।
सहा शास्त्र शिणलीं । मग मौनचि राहिली ।। 3।।
सेना म्हणे मायबाप । उभा कटी ठेउनी हात ।। 4।।
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून पंढरीचा पांडुरंग हा चार वेद, सहाशास्त्र व अठरापुराणे या सर्वांना कळला असुन ते सर्वजण स्तुती करतांना थकुन गेलीत असा असणारा विठोबा मला मनापासून आवडतो. तोच माझा पालनपोषण करणारा मायबाप आहे. त्याने आपले हात कमरेवर ठेवून उभा असल्याचे प्रतिपादन करतात.
पंढरीचा पांडुरंग हा ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्वेद या चारही वेदांना कळला नाही, समजला नाही. तसेच न्याय, सांख्य, योग, वैशेषिका, पूर्वमिमांसा व उत्तरमिमांसा अशी सहाशास्त्रे या विठोबाची स्तुती करतांना थकुन गेली आहेत. त्यांनाही तो कळला नाही. व शेवटी ती मौन झालीत. त्याचप्रमाणे अठरा पुराणे म्हणजे ब्रह्म, पद्म, विष्णु, शिव, लिंग, गरुड, नारद, भागवत, अग्नी, स्कंद, भविष्य, ब्रम्ह, मार्कंडे, वामन, वराह, मत्स, कुर्म आणि ब्रम्हांड होत. या पुराणांनी सुध्दा विठोबाचे नाम ग्रहण करण्यास असमर्थता दर्शविली आहे. असा असणारा पंढरीचा राणा मला मनापासून आवडतो. कारण मी त्याचा निष्ठावंत भाविकभक्त आहे. माझ्या मनात सदैव त्या विठोबाचे चिंतन सुरु असते.
संत सेना महाराज म्हणतात, विठोबा माझे मायबाप आहेत. ते मला जन्म देणारे, पालनपोषण करणारे व शिकविणारे असे आहेत. असा असणारा विठोबा दोन हात कमरेवर ठेवुन समचरण विटेवर उभा आहे.
31. जो हा दुर्लभ योगिया जनासी ।
जो हा दुर्लभ योगिया जनासी । उभाचि देखिला पुंडलिकापासी ।। 1।।
हारपलें दुजेपण फिटला संदेह । निमाली वासना गेला देहभाव ।। 2।।
विटेवरी उभा पंढरीचा राणा । सेना म्हणे बहु आवडतो मना ।। 3।।
संत सेना महाराजांच्या तीन चरणाच्या अभंगातून पंढरीचा पांडुरंग हा योगीयांना दुर्लभ झाला असला तरी तो पुंडलिकाजवळ उभा आहे. पांडुरंगामुळे मनातील द्वैतभाव नाहीसा झाला असुन संशयाचे निवारण झालेले आहे. वासनासुध्दा नाशपावून देहभान विसरलो आहे. असा तो विटेवर उभा असणारा विठोबा मनापासून आवडत असल्याचे प्रतिपादन करतात.
ईश्वर/पांडुरंगा, हा योगाद्वारे योगीयांना लाभणे कठीण असुन तो दुर्लभ आहे, सहज प्राप्त होवु शकत नाही. परंतु तोच पांडुरंग भक्त पुंडलिकाजवळ चंद्रभागेच्या तीरावर दोन्ही हात कटेवर ठेवून समचरण विटेवर उभा आहे. जे योगीयांना प्राप्त झाले नाही. तो मात्र भक्त पुंडलिकास सहज प्राप्त झाला आहे. तेही आपल्या आईवडीलांच्या निस्वार्थी व निरपेक्ष सेवेमुळे होय. विठोबाला/पांडुरंगाला काया, वाचा व मनाने समर्पित झाल्यास, मनोभावे शरण गेल्यास मनातील द्वैतभाव म्हणजेच दुजाभाव, मी तु पणा नाश पावल्यास या संसारातील समस्या/अडचणी व संशय दूर केल्या जातात. तसेच संपूर्ण वासना हया नष्ट होतात. पांडुरंगाच्या चरणी मनोभावे समर्पित झाल्याने आपण आपले देहभान विसरुन जातो. सदैव त्याच्या चिंतनात राहुन हा संसार सहज पार केल्या जातो.
संत सेना महाराज म्हणतात, पंढरीचा पांडुरंग हा विटेवर उभा असुन तो आम्हांस मनापासून आवडतो. कारण आम्ही त्याचे निष्ठावंत भाविकभक्त आहोत.
32. ठेविला पाय माथा संतजनीं ।
ठेविला पाय माथा संतजनीं । तिन्हीं लोकी जाण सरता केला ।। 1।।
घालीन लोटांगण वंदीन पाय माथा । पुरेल माझी इच्छा धणीवरी ।। 2।।
सेना म्हणे धन्य धन्य झालों देवा । न करितां सेवा भेटी दिली ।। 3।।
संत सेना महाराजांच्या तीन चरणाच्या अभंगातून संतांच्या चरणी समर्पित भाव ठेवल्याने तीनही लोकांवर विजय मिळवला आहे. त्यांच्या चरणी लोटांगण घातल्याने या ठिकाणच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. पांडुरंगा, आपली सेवा न करीता सुध्दा मी धन्य झालो असल्याचे प्रतिपादन करतात.
संतांच्या चरणी दृढ विश्वास व समर्पित भाव ठेवावा लागतो. संतांद्वारे आपण ईश्वरापर्यंत जावू शकतो. म्हणून प्रथम संतांवर काया, वाचा व मनाने शरण जाणे आवश्यक असते. त्यांच्या मार्गदर्शनानुसारच संसारामधील वाटचाल आपण यशस्वीपणे करु शकतो. हे निर्विवाद सत्य आहे. संतांना मनोभावे शरण गेल्याने तीनही लोक म्हणजे स्वर्ग, मृत्यु व पाताळ यामधील लोकांवर विजय मिळविता येतो. म्हणून संतांना शरण गेल्यानंतर त्यांच्या चरणावर लोटांगण घातल्यानंतर त्यांच्या सहकार्याने, शिकवणीद्वारे या संसारामधील सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. कारण संत सर्व मनोरथ पूर्ण करतात. कारण संत हे देव व देव हे संत असतात.
संत सेना महाराज म्हणतात, ईश्वरा/पांडुरंगा, मी धन्य झालो आहे. मी आपली सेवा जरी केली नाही फक्त संत सेवेमुळेच मला हा लाभ झाला आहे. मी त्यांच्या मार्गदर्शनामुळेच या जीवनात यशस्वी ठरलो असुन माझे जीवन सार्थकी लागले आहे.
33. तरी का माझा केला अंगिकार ।
तरी का माझा केला अंगिकार । आतां विचार करिसी वायां ।। 1।।
तुज मी ठाऊक होतों अन्याई । हा खरा तेव्हा कां विचार केला नाहीं ।। 2।।
आमुचें तें आम्ही केलेंसे जतन । अंतर तुम्हांकूण न पडावा ।। 3।।
समर्थाचें असे वचन प्रमाण । शरणागता जाण जतन जीवी ।। 4।।
तुझा म्हणेविलों सांभाळी जी आतां । न घे अपेश माथा सेना म्हणे ।। 5।।
संत सेना महाराजांच्या पाच चरणाच्या अभंगातून ईश्वरा/पांडुरंगा, आम्ही आपले भाविकभक्त आहोत आपणा माझा अंगीकार केला आहे. आता मी कसाही असलो तरी मला स्विकारण्याचा विचार आधी करणे आवश्यक होते. शरण आलेल्यांना आपण अभय, व सहकार्य केलेले दिसुन येते. तो आपला बाणा आहे. म्हणून आम्हा भक्तांचा आपण सांभाळ करावा व अपयश आपल्या चरणी घेवू नये. असे प्रतिपादन केले आहे.
ईश्वरा/पांडुरंगा, आम्ही आपणांस काया, वाचा व मनाने समर्पित झालेलो आहोत. मनोभावे शरण गेलेलो आहो. कारण आम्ही आपले निष्ठावंत भाविकभक्त आहोत. आपण सर्वप्रथम माझा अंगीकार म्हणजेच स्विकार केलेला आहे. आता याबाबत आता विचार करणे वायफळ आहे. मी जरी अन्यायी असलो तरी आपला भाविकभक्त आहे. आपले नाम आम्ही आमचे हृदयात जतन करुन ठेवले आहे, व सदैव अहोरात्र आपले चिंतन, मनन व स्मरण करीत असतो. त्यामुळे आम्हांस आपण अंतर पडू देवू नये. आपण सामर्थ्यशाली आहात. व निष्ठावंत भाविकभक्तांना आपण कधीही दूर करीत नाही व अंतर पडू देत नाही. हा आपला बाणा व प्रतिष्ठा आहे. जो कोणी आपणांस मनोभावे शरण जातो. त्यास अभय व सहकार्य करुन त्याचा संसार आपण सार्थकी लावला आहे. त्याचा
उध्दार केला आहे.
संत सेना महाराज म्हणतात, आम्ही आपले भाविकभक्त आहोत. कसेही असलो तरी आपण आमचा आता सांभाळ करावा.
34. तुज ऐसें वाटे देह व्यर्थ जावा ।
तुज ऐसें वाटे देह व्यर्थ जावा । द्यूतकर्म खेळावा सारीपाट ।। 1।।
मग नाहीं नाम निजल्या जागा राम । जन्मोनि अधम दुःख पावे ।। 2।।
दासीगमनीं धीट विषयीं लंपट । जावया वाट अधोगती ।। 3।।
नर्काजावयासी धरसील चाड । तरी निंदा गोड वैष्णवांची ।। 4।।
सेना म्हणे नामाचें लावीं कांरे पिसें । जन्मल्या सायासें व्यर्थ जासी ।। 5।।
संत सेना महाराजांच्या पाच चरणाच्या अभंगातून पांडुरंगाच्या नामाचे वेड लागल्यास जन्म सार्थकी लागेल. अन्यथा आपला देह हा व्यर्थ जाणार आहे. जीवन जगत असतांना अधःपतनाचे कर्म केल्यास परिणाम वाईट होतो. वैष्णवांची निंदा सुध्दा कधीही करता कामा नये. असे प्रतिपादन करतात.
ईश्वराच्या/पांडुरंगाच्या नामात एवढे सामर्थ्य आहे की, त्या नामाची कास धरल्यास मानवी जीवन सार्थकी लागते. व उध्दार होतो. जीवन जगत असतांना आपला देह सत्कारणी लागावा असे मनापासून आपणांस वाटु द्यावे. अन्यथा वाईट कर्माने जसे सारीपाट, स्त्रीगमन, ज्याद्वारे आपण अधोगतीस जात असतो. हया सर्व बाबी माणसाच्या घात करणाÚया असतात. अशा या वाईट मार्गास लागु नये. तो मार्ग पत्करु नये. त्याची आवड मनात ठेवू नये. आपण ईश्वराचे भाविकभक्त असल्याने वैष्णवांची निंदा करु नये. वैष्णवांची निंदा न करता आनंदाने व आवडीने स्तुती करावी. ज्याचा परिणाम हा चांगला होणार आहे.
संत सेना महाराज म्हणतात, ईश्वराच्या पांडुरंगाच्या नामाची आवड आपण आपल्या मनाला लावावी ज्याद्वारे आपला संसार सुखाचा होवून मानवी जीवन सार्थकी लागेल व आपला उध्दार होईल.
35. तुम्ही संत दयानिधी ।
तुम्ही संत दयानिधी । तारा सांभाळा दुर्बुध्दि ।। 1।।
तुम्हां आहे शरणागत । तरी तारावा पतित ।। 2।।
अधिकार नाहीं । न कळे भक्तिभाव कांहीं ।। 3।।
वागवा अभिमान । सेना आहे याती हीन ।। 4।।
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून संताबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. संतांशी शरण गेल्यानंतर संतांनी दुर्बुध्दी असणाÚयांना सांभाळावे त्यांना मार्गदर्शन करुन त्यांचा उध्दार करावा. पतितांचा तसेच जडजीवांचे कल्याण करावे. व त्यांना सन्मार्ग दाखवावा. भक्तिभाव नसला तर तो त्यांना सांगावा. कारण ते शरण आलेले आहेत. याचा अभिमान बाळगावा असे प्रतिपादन केले आहे.
संत हे मानवी जीवनाचा उध्दार करण्यासाठी अहोरात्र झटत असतात. ते समाजाला विधायक दिशा देण्याचे कार्य करीत असतात. आपला संपूर्ण देह हा मानव कल्याणासाठी झिजवत असतात. हे संत
कृपाळू व दयाळू असतात. अशा संतांना काया, वाचा, व मनाने समर्पित होवून शरण आल्यास ते मानवाचा उध्दार करीत असतात. म्हणून जे
बुध्दीहीन आहेत, तसेच वाईट बुध्दीचे आहेत, म्हणजेच पतित आहेत अशांना ईश्वराचा भक्तिभाव कळला नसल्यास तो त्यांना सांगुन त्यांचे जीवन सार्थकी लावावे व या संसारातून त्यांना सुखरुप तारुन न्यावेत. कारण त्यांना काहीही कळत नाही. ते नासमज असतात. आपण संत देयेचे धाता आहात.
संत सेना महाराज म्हणतात, मी यातीहीन जरी असलो तरी विठोबाचा निष्ठावंत भाविकभक्त आहे त्यास मनोभावे शरण गेलेलो आहे. आपण संत मंडळींनी याचा अभिमान बाळगावा की, आपण मानवजातीचे कल्याण करीत आहात व उध्दार करीत आहात.
36. तुम्ही करा कृपादान ।
तुम्ही करा कृपादान । येइन धाऊन पायापें ।। 1।।
घेईन संतांची भेटी । सांगेन सुखाचिये गोष्टी ।। 2।।
जैसे माते पाशीं बाळ ।। सांगे जीवीचें सकळ ।। 3।।
सेना म्हणे हरे ताप । मायबाप देखुनी ।। 4।।
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातुन ईश्वर/पांडुरंग हा कृपाळु व दयाळु आहे. तो संतांच्या भेटी घेवुन सुखाच्या गोष्टी करतो. ज्याप्रमाणे आईजवळ तिचा बाळ जीवाभावे सर्वकाही गोष्टी सांगत असतो त्याच्याप्रमाणे भक्त आणि ईश्वराचे असते. अशा पांडुरंगाच्या दर्शनाने पापाचा नाश होत असल्याचे प्रतिपादन करतात.
पांडुरंग हा दयाळु व कृपाळु असुन आपल्या भाविक भक्तांविषयी त्यांच्या मनात दयाभाव असतो. तो भाविकभक्तांच्या संकटास व सहकार्यास सदैव धावत येत असतो. तो आपल्या संताच्या भेटीस येत असतो. व त्यांच्याशी सुखाच्या गोष्टी करीत असतो. आपण भक्त/संत ह्यांच्या मानवी जीवनातील संसार हा सुखी व आनंदी रहावा. असे त्या पांडुरंगास मनापासून वाटते. एखादी माता आपल्या बाळाची संपूर्ण काळजी घेत असते. त्याचे सुखदुःख जाणत असते व त्याला सर्वोतोपरी सहकार्य करीत असते. तसेच ईश्वराचे आहे. आपल्या भाविकभक्तांची संपूर्ण काळजी ईश्वर/पांडुरंग घेत असतो. भाविकभक्त सुध्दा बाळाप्रमाणे आपल्या जीवाभावाच्या सर्वकाही गोष्टी विठोबास सांगत असतो. असे प्रेमभावाचे नाते भाविकभक्त व पांडुरंगामध्ये आहे. असा अनुबंध भाविकभक्त व ईश्वरामध्ये दिसुन येतो.
संत सेना महाराज ईश्वराचे/पांडुरंगाचे दर्शन झाल्यानंतर या मानवी जीवनातील संसारातील आदिभौतिक, आदिदैविक व आध्यात्मिक अशा तीनही तापापासून होणाÚया दुःखाचा नाश करीत असतात. कारण पांडुरंग हा भाविकभक्तांचा मायबाप असतो.
37. तेचि एक संत जाणा ।
तेचि एक संत जाणा । आवडती नारायणा ।। 1।।
पांडुरंगावांचोनि कांहीं । न जाणे दुसरे पाही ।। 2।।
मुखीं नाम अमृतवाणी । घाले मनीं डुल्लती ।। 3।।
सेना म्हणे पायीं माथां । त्यांच्या ठेवियला आतां ।। 4।।
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून संतांचे वर्णन करतांना जे ईश्वराला आवडतात तेच खरे संत होत. पांडुरंगाशिवाय ज्याचे कोणीही नसते. संतांच्या मुखातून सदैव ईश्वराची अमृतवाणी बाहेर पडते. अशा संतांच्या चरणी वंदन करीत असल्याचे प्रतिपादन करतात.
ईश्वराला/पांडुरंगाला आवडणारा खरा संत असतो. संत आणि पांडुरंगाचे नाते एवढे विश्वासाचे आहे की, भाविकभक्तांच्या मनात सदैव पांडुरंगच वसलेला असतो. त्यांच्या ध्यानी, मनी, व स्वप्नी तोच असतो. म्हणून पांडुरंगाशिवाय त्यांचे जीवनात इतर काहीही नसते. आपल्या मुखातुन अहोरात्र त्याच पांडुरंगाचे नाम सदैव असुन आपले मन त्याच्याच चिंतनात सदैव रममान झालेले असते, म्हणून पांडुरंग हा संतांच्या अंकीत असतो. आज्ञेत असतो. आपला भाविकभक्त असणाÚया संतांच्या सुखासाठी व रक्षणासाठी तो पांडुरंग सतत धावत येत असतो. संत हाच ईश्वराचा/पांडुरंगाचा भाविकभक्त असतो.
संत सेना महाराज म्हणतात, ईश्वराच्या/पांडुरंगाच्या भाविकभक्त असणाÚया संतांच्या चरणी माझे वंदन करीत आहे. कारण संतांच्या
माध्यमातून ईश्वराकडे/पांडुरंगापर्यंत माणसाला जाता येते. संत हा ईश्वर आणि माणसामधील दुवा असतो.
38. त्रैलोक्य पाहतां ।
त्रैलोक्य पाहतां । नाहीं उवग तुमच्या चिŸा ।। 1।।
तया आमुची चिंता । नसे काय ऋक्मिणीकांता ।। 2।।
दुर्दर राहे पाषाणांत । तया चारा कोण देत ।। 3।।
पक्षी अजगर । तया पाळी सर्वेश्वर ।। 4।।
सेना म्हणे पाळुनी भार । राहिलों निर्धार उगाची ।। 5।।
संत सेना महाराजांच्या पाच चरणाच्या अभंगातून ईश्वरा/पांडुरंगा, आपण या तिन्ही लोकांचे पालनकर्ता आहांत. तुम्हास याचा अजिबात कंटाळा येत नाही. आपण सृष्टीचे पालनकर्ता असल्याने सर्व जीवांचे पालन करीत असतो. एवढे सर्व काही करुन सुध्दा पांडुरंग हा वेगळा राहतो असे प्रतिपादन करतात.
ईश्वर/पांडुरंग हा स्वर्ग, मृत्यु व पाताळ हया तीनही लोकांचा पालनकर्ता आहे. संपूर्ण सृष्टीचे पालकत्व ईश्वराकडे येते. एवढा मोठा व्याप सांभाळून सुध्दा पांडुरंगाला याचा कधीही कंटाळा आलेला नाही. त्याच्या चित्ताला कधी त्रास झाला नाही म्हणून आम्ही तर आपले भाविकभक्त आहोत त्यामुळे माझी आपणांस चिंता वाटु देवू नये. कारण आपण माझे पालनकर्ता आहांत. आपण माता रुक्मिणीचे पती आहात. या सृष्टीमध्ये असणाÚया सर्व जीवांचा सांभाळ, त्यांचे पालनपोषण आपण करीत आहांत. आपण पशु पक्षी तसेच अजगर हया जीवांचा भार स्वतःहुन स्विकारला आहे. त्याचप्रमाणे पाषाणात राहणाÚया जीवांचे सुध्दा काळजी घेत आहात. आपण या सर्वांचे सरंक्षण व सहकार्यास धावत आलेले आहात.
संत सेना महाराज म्हणतात, ईश्वरा/पांडुरंगा आपण या सृष्टीचे पालनहार आहांत पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी आपणांवर आहे. म्हणून माझा सुक्ष्म भार आपण सांभाळावा त्यामुळे मी निर्धास्त झालो आहे.
39. देई मज जन्म देवा ।
देई मज जन्म देवा । करीन सेवा आवडी ।। 1।।
करीन संतांचे पूजन । मुखीं नाम नारायण ।। 2।।
असो भलते ठायीं । सुख दुःखाचा चाड नाहीं ।। 3।।
मोक्ष सायुज्यता । सेना म्हणे जिवा चित्ती ।। 4।।
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून ईश्वरा/पांडुरंगा, आपण मला मानवी जन्मास घालावे. त्यामुळे मला आवडीने संत सेवा व संतांचे पूजन करता येईल. माझ्या मुखाने ईश्वराचे नाम घेता येईल. मी कुठेही असलो तरी मला सुख दुःखांची आवड नसुन मोक्ष व सायुज्जतेची या चित्ताला आवश्यकता नसल्याचे प्रतिपादन करतात.
ईश्वरा/पांडुरंगा, आपण प्रत्येक जन्मात मला मानव जन्मालाच घालावे कारण मानव म्हणून जन्माला आल्यानंतर मला संतांची सेवा मनोभावे करता येईल. मला मार्गदर्शन देणाÚया संतांचे पूजन करता येणार आहे. तसेच माझ्या मुखातून सदैव आपल्या नामाचे चिंतन व स्मरण करणार आहे. मानवी जीवन जगत असतांना कोणत्याही परिस्थितीत मी कोठेही असलो तरी मला सुख दुःखाची आवड मला अजिबात नाही. मी त्या पलिकडचा विचार करीत आहे. ईश्वराचे/पांडुरंगाचे नामाच्या चिंतनाने मुक्ति प्राप्त होत असतात. व अगणित पुण्य जमा होते. मला या मुक्ति/मोक्ष व सायुज्जता मुक्तिची आवश्यकता वाटत नाही. फक्त मुखाने आपले नाम घेत राहणार आहे. तेच मी करणार आहे.
संत सेना महाराज म्हणतात, मानवी जन्म मला दिल्याने माझ्या हातुन संतसेवा होणार असुन मुखाने ईश्वराचे नाम घेता घेणार आहे. मला मुक्तिची अजिबात अपेक्षा नाही.
40. धन कोणा कामा आलें ।
धन कोणा कामा आलें । पहा विचारुनि भले ।। 1।।
ऐसें सकळ जाणती । कळोनियां आंधळे होती ।। 2।।
स्त्रिया पुत्र बंधु पाही । त्याचा तुझा संबंधु नाहीं ।। 3।।
सखा पांडुरंगावीण । सेना म्हणे दुजा कोण ।। 4।।
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून ईश्वर/पांडुरंगच हे अंतिम सत्य आहे. त्याच्याशिवाय कोणीही या संसाराचा/जीवानाचा तारणहार असु शकत नाही. धन, संपदा हे साध्य असु शकत नाही. हे कळुन सुध्दा जग आंधळे बनते. आपल्या स्त्रिया, पुत्र व बंधु हे सर्व काही क्षणिक संबंधापुरते असतात. शेवटी या जीवनात पांडुरंगाशिवाय आपले कोणीही नसते. असे प्रतिपादन केले आहे.
मानवी जीवनात म्हणजेच संसारात आल्यानंतर आपणांस असे वाटते की, धनसंपदा हे आपले साध्य आहे. परंतु ते साध्य नसुन साधन आहे. त्यांच्या काही मर्यादा आहेत. काही मर्यादेपर्यंत त्याची साथ योग्य वाटते. परंतु मनाशी विचारल्यास ते निरर्थक ठरते. आपले पत्नी, मुले,
बंधु व सगेसोयरे हे सर्वकाही तात्पुरते संबंधित असतात. अंतकाळी कोणीही सोबतीला असु शकत नाही. असे असुन सुध्दा माणुस डोळ्याने सर्वकाही बघुन आंधळा झाल्यासारखा वागतो. तो भ्रमिष्ठ झाल्यासारखा मृगजळासारखा आपले जीवन जगत असतो. म्हणून धनसंपदा, सगेसोयरे हे सर्वकाही क्षणिक असुन ते अंतिम सत्य असु शकत नाही. म्हणून आंधळे न बनता डोळसपणे जगावे.
संत सेना महाराज म्हणतात, मानवी जीवनात आल्यानंतर सर्वकाही नश्वर आहे. अंतिम सत्य फक्त पांडुरंगाचा आधारच असुन त्याची कृपादृष्टी आपणांस लाभली पाहिजे. पांडुरंगाशिवाय दुसरा कोणीही पाठीराखा असू शकत नाही. म्हणून आपण त्यास मनोभावे शरण जावे.
41. धन्य अलंकापुर धन्य सिध्देश्वर ।
धन्य अलंकापुर धन्य सिध्देश्वर । धन्य ते तरुवर पशुपक्षी ।। 1।।
धन्य इंद्रायणी धन्य भागीरथी । तेथें स्नान जे करिती धन्य जन्म ।। 2।।
धन्य तो प्रयाग धन्य ते त्रिवेणी । वहाती येऊनि गुप्तरुपें ।। 3।।
धन्य ते भूमी धन्य ते प्राणी । देखती नयनीं ज्ञानदेवा ।। 4।।
धन्य ते भाग्याचे होती अळंकापुरी । तयाचा निर्धारी धन्य वंश ।। 5।।
धन्य दासानुदास अळंकापुरीचा । सेना न्हावी त्याचा रजःकण ।। 6।।
संत सेना महाराजांच्या सहा चरणाच्या अभंगातुन संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अलंकापुरीचे सविस्तर विवेचन करतात. अलंकापुर हे धन्य असुन तेथील सिध्देश्वर सुध्दा धन्य आहे. या ठिकाणी असलेली इंद्रायणी नदी, येथील भूमी, पशु, पक्षी धन्यवादास पात्र ठरतात. कारण त्यांना संत ज्ञानेश्वराचे दर्शन होते. येथे असणारा प्रत्येक जन भाग्यवान ठरत असल्याचे प्रतिपादन करतात.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीने पुनीत झालेल्या अलंकापूर म्हणजे आळंदीचे वर्णन संत सेना महाराज करतांना म्हणतात की, अलंकापूर व तेथील सिध्देश्वर म्हणजे भगवान शंकराचे असणारे मंदिर हे पवित्र तीर्थक्षेत्र असुन त्यामुळे आपणांस धन्यता लाभते व आपण भाग्यवान ठरतो. या ठिकाणी वाहत असणारी इंद्रायणी नदी व यास्थळी असणारे व निवास करणारे पशु पक्षी हे सुध्दा धन्यवादास पात्र ठरतात. याठिकाणी सुध्दा त्रिवेणी संगम म्हणजे तीन नद्यांचा संगम असुन ज्याला प्रयाग संबोधले जाते. हे सर्व काही भगवंताची गुप्त रुपे असुन भाग्यवंतास त्याचा लाभ होत असुन ते सर्व भाग्यवान ठरतात. कारण त्यांना या ठिकाणी असणाÚया संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे नित्य दर्शन घडत असते. अशा अलंकापूर येथे निवास करणारे त्यांचे वंशज, ईश्वराचे/ज्ञानेश्वरांचे दास्यत्व करणारे भाग्यशाली ठरतात.
संत सेना महाराज म्हणतात, अलंकापूर हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. जेथे निवास हा भाग्यवंतास लाभतो. त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांचे अस्तित्व आहे त्या ठिकाणची रजधुळ सुध्दा आम्हांस पवित्र वाटते. आम्ही तिचा स्विकार मोठ्या प्रेमाने व आनंदाने करीत आहे.
42. धन्य धन्य निवृत्तिराया ।
धन्य धन्य निवृत्तीराया । शरण आलें तुझियां पायां ।। 1।।
नको पाहूं दुसरें आतां । गुण दोषाची वारता ।। 2।।
नाहीं माझा अधिकार । यातीहीन मी पामर ।। 3।।
अपराधाचा केलों । सेना म्हणे काय बोलों ।। 4।।
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातुन संत निवृत्तीनाथांचे बाबत विवेचन केले आहे. संत निवृत्तीनाथ महाराजांना मनोभावे शरण आलो असुन त्यांच्या दर्शनाने धन्य झालो आहे. आम्हा भक्तांचे गुणदोष काहीही न पाहता आमचा स्विकार करावा. मला काहीही अधिकार नाही तसेच मी अपराधी व पामर असल्याचे प्रतिपादन करतात.
संत निवृत्तीनाथ महाराज हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधु व आध्यात्मिक गुरु आहेत. व भगवान शंकराचा अवतार आहे. अशा संत निवृत्तीनाथ महाराजांची समाधी त्रंबकेश्वर येथे आहे. त्यांच्या दर्शनाने व भेटीने आम्ही भक्तगण धन्य झालो असुन त्यांना काया, वाचा व मनाने शरण गेलो आहे. आपण संत निवृत्ती महाराज आम्हा भक्तांचे गुणदोष न पाहता आमचा स्विकार करावा. आम्ही काहीही अधिकार मागत नसुन आम्ही यतिहीन आहोत तसेच आम्ही पामर सुध्दा आहोत. आम्हाकडून अपराध जरी झाले तरी आपण आमचा स्विकार करावा असे वाटते.
संत सेना महाराज म्हणतात, संत निवृत्तीनाथ महाराज आपणासं आम्ही मनोभावे शरण आलो आहे. आमच्याकडून झालेल्या अपराधासहीत आपण आमचा स्विकार करावा. याबद्दल मी आपणांस काहीही बोलत नाही.
43. धन्य धन्य दिन ।
धन्य धन्य दिन । तुमचें झालें दरुषण ।। 1।।
आजि भाग्य उदया आलें । तुमचें पाऊल देखिलें ।। 2।।
पूर्व पुण्य फळा आलें । माझें माहेर भेटलें ।। 3।।
सेना म्हणे झाला । धन्य दिवस आजि भला ।। 4।।
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून ईश्वराचे/पांडुरंगाचे दर्शन झाल्याने हा दिवस धन्य ठरला असुन आमचा उध्दार झाल्याचे सांगतात. आपल्या चरणाच्या दर्शनाने पुण्य फळास आले आहे. माझे माहेर मला भेटल्याचे प्रतिपादन करतात.
ईश्वराचे/पांडुरंगाचे आम्ही भाविकभक्त असुन काया, वाचा व मनाने त्या पांडुरंगाशी समरस झालो आहे. त्यांना मनोभावे शरण गेलो आहे. अशा विठोबाचे आम्हास दर्शन झाल्याने आम्ही धन्य झालो आहे. व आजचा दिवस भाग्याचा ठरला आहे. व आम्ही भाग्यवान ठरलो आहे कारण यामुळे आमच्या भाग्याचा उदय झाला आहे. याला कारण विठोबाचे चरण कमलाचे दर्शन झालेले आहे. आजपर्यंत तसेच जन्मोजन्मात केलेली पुण्याई फळास आली असल्याने विठोबाचे दर्शनाचे भाग्य आम्हाला लाभले आहे. अनंत जन्माचे सुकृत कारणीभूत ठरले आहे. पंढरी आणि पंढरीनाथ हे माझे व भाविकभक्तांचे माहेर आहे. अशा माहेरची भेट झालेली आहे.
संत सेना महाराज म्हणतात, विठोबाचे दर्शन झाल्याने भाग्य फळाशी आले म्हणूनच आजचा दिवस हा धन्य झाला आहे व आम्ही सुध्दा धन्यवादास पात्र ठरलो आहोत.
44. धन्य महाराज पुंडलीक मुनी ।
धन्य महाराज पुंडलीक मुनी । वैकुंठींचा सखा आणिला भूततळालागोनी ।। 1।।
केला उपकार जग तारिलें सकळ । निरसली भ्रांति माउली स्नेहाळ ।। 2।।
आली चंद्रभागा गर्जना करीत । तुझिया भेटीलागी उतावीळ धांवत ।। 3।।
जोडोनियां पाणि सेना करी विनवणी । म्हणे धन्य पुंडलिका माथा ठेविला चरणीं ।। 4।।
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून भक्त पुंडलिकानी वैकुंठीच्या पांडुरंगाला भुतळी आणुन या जगावर उपकार केला आहे. मनाची भ्रांती नाश पावली आहे. त्या ठिकाणी विठोबाच्या भेटीला चंद्रभागा सुध्दा धावत आली आहे. हात जोडून भक्त पुंडलिकाच्या चरणी नतमस्तक होत असल्याचे प्रतिपादन करतात.
भक्त पुंडलिकांनी या भुतलावर वैकुंठीचा देव/पांडुरंगास आणले आहे. म्हणुन ते धन्यवादास पात्र ठरतात. विठोबा माउली ही भक्तांची कैवारी व कृपाळू व दयाळू असल्याने भक्तांच्या मनामधील भ्रांती समुळ नष्ट झाली आहे. पंढरीच्या विठोबाच्या भेटीसाठी चंद्रभागा पंढरीत धावत आली आहे. ती चंद्रभागा पांडुरंगाच्या भेटीसाठी उताविळ झाली होती. त्यामुळे पंढरी हे तीर्थक्षेत्र निर्माण झाले आहे. भक्त पुंडलिकाने विठोबाला प्रसन्न केले होते. आपल्या आईवडीलांची निस्वार्थी व निरपेक्ष सेवा बघुन व प्रसन्न होवुन विठोबा तेथे आले आहेत, व समचरण विटेवर दोन्ही कमरेवर हात ठेवुन स्थिर उभे झाले आहे. म्हणून भक्त पुंडलिकाने पंढरीत विठोबाला आणल्यामुळे सर्व मानव जातीवर उपकार केले आहे. हे आपणांस मान्य करावे लागते. त्यामुळे भाविकभक्तांचा उध्दार झाला आहे.
संत सेना महाराज म्हणतात, पंढरीच्या पांडुरंगाला आणण्याचे श्रेय हे भक्त पुंडलिकांना जाते त्या पुंडलिकाच्या चरणी नतमस्तक होवुन दोन्ही हात जोडत आहे व नम्रपणे विनवणी करीत धन्यता मानत आहे.
45. धन्य महाराज अलंकापुरवासी ।
धन्य महाराज अलंकापुरवासी । साष्टांग तयासी नमन माझें ।। 1।।
या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचें । उध्दरती तयाचें सकळ कुळें ।। 2।।
इंद्रायणी स्नान करिती प्रदक्षिणा । तुटती यातना सकळ त्याच्या ।। 3।।
सेना म्हणे त्याचें धन्य झालें जिणें । ज्ञानदेव दरुशनें मुक्त होती ।। 4।।
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातुन संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अलंकापुरी म्हणजेच आळंदी धन्य असुन त्यांच्या चरणी नमस्कार करतो. संत ज्ञानोबाचे नित्यनेमाने नाम घेतल्यास आपल्या कुळाचा उध्दार होतो. इंद्रायणी नदीच्या स्नानाने या संसारातील यातना नाश पावतात. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवन धन्य असुन त्यांच्या दर्शनाने मुक्ति मिळत असल्याचे प्रतिपादन करतात.
संत ज्ञानेश्वर महाराजांची आळंदी म्हणजे अलंकापूर होय. अशा संत ज्ञानोबांच्या चरणी माझा साष्टांग नमस्कार करीत आहे. असे सेना महाराज म्हणतात. संत ज्ञानेश्वर महाराज हे भगवान विष्णुचे अवतार आहेत. व मानव कल्याणासाठी व उध्दारासाठी त्यांचा जन्म या भूतलावर झालेला आहे. म्हणून संत ज्ञानेश्वरांचे दररोज आपल्या मुखाने नाम घेतल्यास आपल्या सर्व कुळांचा उध्दार होतो. अलंकापूर येथे पवित्र नदी इंद्रायणी आहे. म्हणून आळंदी हे तीर्थक्षेत्र झाले आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी सिध्देश्वर म्हणजेच महादेवाच्या मंदिराला लागुन आहे. या इंद्रायणी नदीत स्नान केल्यामुळे या संसारामधील आदिभौतिक, आदिदैविक व आध्यात्मिक अशा तीन प्रकारच्या तापापासून प्राप्त होणारे दुःख व यातना या सर्वांचा नाश होणार आहे.
संत सेना महाराज म्हणतात, जो कोणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन मनोभावे घेणार आहे. त्याचे जीवन धन्य झालेले असते. त्यांना संत ज्ञानेश्वरांचा आशिर्वाद व कृपादृष्टी लाभलेली असते.
46. नलगे योग तप ।
नलगे योग तप । करणें साटोप आम्हांसी ।। 1।।
सोपें साधन आमुचें । नाम गाऊं विठोबाचें ।। 2।।
जो नातुडे धुम्रपानीं । राहे संपुष्टि येऊनि ।। 3।।
जया नाहीं रुप । आम्हां कीर्तनीं समीप ।। 4।।
सेना म्हणे लडिवाळ । जाणो हरीसी निर्मळ ।। 5।।
संत सेना महाराजांच्या पाच चरणाच्या अभंगातून ईश्वराचे/पांडुरंगाचे नाम हे सर्वात सोपे साधन असुन हरिकीर्तनात तो पांडुरंग आमच्या सोबत असतो. याकरीता आम्हांस योग, तप व धुम्रपान या साधनांची आवश्यकता नाही. हा पांडुरंग आम्हा भक्तांचा लाडका असुन तो निर्मळ चित्त असणाÚयांना जाणवत असल्याचे प्रतिपादन करतात.
ईश्वराचे पांडुरंगाचे नाम हे सर्वश्रेष्ठ व सामर्थ्यशाली असुन त्या नामाद्वारे मानवी जीवनातील संसार आपण सहज तरुन जाऊ शकतो. तसेच हे ईश्वराचे नाम सर्वात सोपे साधन असुन मुखाने सहज घेता येते. इतर योग, तप व धुम्रपान ही ईश्वरप्राप्तीची साधने कठीण असुन त्रासदायक आहेत. त्या साधनांचा स्विकार करण्याची आवश्यकता वाटत नाही. आम्ही ईश्वराचे नाम भाविक भक्त आनंदाने गाऊन घेणार आहोत. म्हणून ईश्वरी नामसाधनेस आम्ही प्राधान्य व महत्व देत आाहोत. ईश्वरास/पांडुरंगास मनोभावे शरण गेल्यास तो एवढा दयाळु व कृपाळु आहे की, आपल्या भाविकभक्तांच्या सहकार्य व संरक्षणास सतत धावत येतो. व त्या भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. अशाप्रकारे भक्त आणि देवाचे नाते जिव्हाळ्याचे व प्रेमाचे असते. ईश्वर/पांडुरंग हा सगुण व निर्गुण ह्या दोन्ही स्वरुपात आढळतो. पांडुरंगाचे निर्गुण रुप हे हरिकीर्तन करणाÚया कीर्तनकाराच्या सोबत त्या ठिकाणी सदैव उपस्थित असते.
संत सेना महाराज म्हणतात, असा असणारा पांडुरंग भक्तांचा लाडका असुन ज्याचे चित्त निर्मळ, शुध्द, पवित्र असते त्यांना तो सहज प्राप्त होतो.
47. नाम साधनाचें सार ।
नाम साधनाचें सार । भवसिंधु उतरी पार ।। 1।।
तिहीं लोकीं श्रेष्ठ । नाम वरिष्ठ सेवी हें ।। 2।।
शिवभवानीचा । गुप्त मंत्र आवडीचा ।। 3।।
सेना म्हणे इतरांचा । पाड कैचा मग येथें ।। 4।।
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातुन ईश्वराचे/पांडुरंगाचे नाम हे साधन सार असुन त्याद्वारे संसार सार पार केल्या जातो. तीनही लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ ते असुन त्याचा स्विकार करावा हा नाममंत्र भगवान शंकर व भवानी मातेच्या आवडीचा असल्याने त्याची थोरवी इतरांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन करतात.
ईश्वराचे/पांडुरंगाचे नाम हे सर्वश्रेष्ठ व सामर्थ्यशाली असुन बीजमंत्र आहे. या ईश्वराच्या नामसाधनेद्वारे आपण या संसार सागरातून सहज तरुन जावु शकतो. आनंदाने व सुखाने हा संसार पार केल्या जाऊ शकतो. स्वर्ग, मृत्यु व पाताळ या तीनही लोकात ईश्वराचे नाम हे सर्वश्रेष्ठ असल्याने सर्व भाविकभक्त या नामाचा स्विकार मोठया आनंदाने व प्रेमाने करतांना दिसतात. भगवान शंकर व पार्वतीमाता यांचेकडून हा मूल बीजमंत्र आपणांपर्यत आलेला आहे. तो बीजमंत्र अत्यंत आवडीचा सुध्दा आहे. म्हणून आदिनाथापासून निवृत्तीनाथापर्यंत या मंत्रांची गृप्तता आढळते परंतु ज्ञानेश्वरापासून हा पांडुरंगाचा मंत्र सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचला आहे. त्याला सार्वजनिक स्वरुप प्राप्त करुन दिले आहे.
संत सेना महाराज म्हणतात, भगवान शंकर व पार्वती मातेकडून आलेला हा सर्वश्रेष्ठ बीजमंत्र असुन इतर साधनांपेक्षा सर्वश्रेष्ठ, सामर्थ्यशाली आहे. याबाबतची थोरवी अधिक काय सांगावी.
48. नाम हें अमृत भक्तासी दिधलें ।
नाम हें अमृत भक्तासी दिधलें । ठेवणें ठेविलें होतें गुप्त ।। 1।।
प्रत्यक्ष अवतार धरिला अलंकापुरी । मार्ग तो निर्धारी दाखविला ।। 2।।
कृतयुगामाजी वशिष्ठ जागता । नाम तो घेतां नारद मुनि ।। 3।।
कलियुगामाजी न घडे साधन । जातील बुडोन महा डोहीं ।। 4।।
रामकृष्ण हरी गोविंद गोपाळ । स्मरा वेळोवेळां सेना म्हणे ।। 5।।
संत सेना महाराजांच्या पाच चरणाच्या अभंगातून ईश्वरी नामाचा प्रसार सांगतांना भक्तांना दिलेले अमृतमय असणारे नाम हे सुरवातीला गुप्त होते. कृष्णयुगात देवर्षी नारदांनी याचा प्रसार केला. कलीयुगाचे प्रत्यक्ष भगवान विष्णुंनी ज्ञानेश्वरांच्या रुपात अवतार घेवून रामकृष्णहरि हा मंत्र सर्व समाजाला समर्पित केला. ज्याद्वारे संसार सागर पार केल्या जाईल अशा ईश्वराच्या नामाचे वेळोवेळी स्मरण करावे. असे प्रतिपादन करतात.
ईश्वराचे नाम हे सर्वश्रेष्ठ व सामर्थ्यशाली असुन तो बीजमंत्र आहे. या ईश्वराच्या नामाचा जे अमृतमय आहे ते भाविकभक्तांना प्राप्त झाला आहे. सर्वप्रथम या नाममंत्राची गुप्तता पाळल्या गेली होती. भगवान शंकराकडून म्हणजेच आदिनाथाकडून हा मंत्र आलेला आहे. कृता युगामध्ये देवर्षि नारदाने या मंत्राचा प्रसार व प्रचार केला आहे. कलीयुगामध्ये भगवान विष्णु परमात्माने संत ज्ञानेश्वराच्या रुपाने अवतार घेवुन जनसामान्याचा उध्दार करण्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी हा बीजमंत्र सार्वजनिक करुन सर्वांना सांगितला आहे. ज्याद्वारे आपला संसार आनंदाने, सुखाने, पार करता येईल. अन्यथा सर्वजण या संसारसागरात बुडुन गेले असते. ते जाऊ नये त्यांचा उध्दार व्हावा म्हणुनच या ईश्वराच्या मंत्राची कास धरावी. असा संतांचा आग्रह असतो.
संत सेना महाराज म्हणतात, ईश्वराच्या नामाचा रामकृष्णहरी गोविंद, गोपाळ हा बीजमंत्र मानवाला तारक असल्याने त्याचा स्विकार करावा व वेळोवेळी त्या ईश्वरीय नामाचे स्मरण करावे. ज्याद्वारे आपला उध्दार होईल.
49. नामाचें चिंतन श्रेश्ठ पैं साधन ।
नामाचें चिंतन श्रेष्ठ पैं साधन । जातील जाळोनि महापापें ।। 1।।
न लगे धूम्रपान पंचाग्निसाधन । करितां चिंतन हरी भेटे ।। 2।।
बैसुनि निवांत करा एकचित्ती । आवडी गायें गीत विठोबाचें ।। 3।।
सकळाहुनि सोपें हेंची पै साधन । सेना म्हणे आण विठोबाची ।। 4।।
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातुन ईश्वराच्या/ पांडुरंगाच्या नामाचे चिंतन सर्वश्रेष्ठ असुन त्यामुळे असंख्य पापाचा नाश होतो. असा नामाचा महिमा थोर आहे. धुम्रपान, पंचाग्नी साधनांची आवश्यकता नसते. हरिची भेट चिंतनाने होते. एका ठिकाणी स्थिर बसुन एकचित्ताने विठोबाचे नाम जे सोपे आहे ते घ्यावे., असे प्रतिपादन केले आहे.
ईश्वराचे पांडुरंगाचे नाम हे सर्वश्रेष्ठ असल्याने मनोभावे त्या नामाचे चिंतन करावे. त्या नामाच्या चिंतनाच्या सामर्थ्याने असंख्य पापांचा नायनाट होत असतो एवढे सामर्थ्य त्यामध्ये दिसुन येते. ईश्वर प्राप्तीकरीता इतर जे काही कठीण साधने जसे योग, याग, जप, तप, धुम्रपान, अशा पंचाग्नी साधनाची याची कास धरण्याची आवश्यकता पडणार नाही. ईश्वराला मनापासून शरण गेल्यास त्याच्या चिंतनाने सहज हरिची भेट होते. याकरीता समर्पित भाव महत्वाचा असुन आपण आपल्या मनाला स्थिर करुन निवांतपणे बसुन त्या ईश्वराचे/पांडुरंगाचे एकाग्रचित्ताने आवडीने चिंतन, मनन, स्मरण व गायन करावे. कारण विठोबा हा अत्यंत दयाळु व कृपाळु आहे. आपल्या भाविकभक्तांच्या हाकेला तो सहज धावुन येतो. व सहकार्य करीत असतो.
संत सेना महाराज म्हणतात, विठोबाचे नाम सर्व साधनांपेक्षा सर्वात सोपे साधन व सर्वश्रेष्ठ, आणि सामर्थ्यशाली आहे असे प्रतिज्ञापुर्वक सांगत आहे.
50. नाहीं सुख त्रिभुवनीं ।
नाहीं सुख त्रिभुवनीं । म्हणुनि मनीं धरिलें ।। 1।।
पायीं ठेवियला भाळ । कंठीं माळ नामाची ।। 2।।
पावलीं विश्रांती । सेना म्हणे कमळापती ।। 3।।
संत सेना महाराजांच्या तीन चरणाच्या अभंगातुन ईश्वराचे/पांडुरंगाचे नाम मुखाने घ्यावे या त्रिभुवनी सुख नसुन ते ईश्वराचे नाम मनात घेण्यात आहे. अशा पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होत आहे. ज्याद्वारे मनाला विश्रांती लाभल्याचे प्रतिपादन करतात.
ईश्वराचे/पांडुरंगाचे आम्ही निष्ठावंत भाविकभक्त असुन काया, वाचा व मनाने पांडुरंगाला शरण गेलेलो आहे. स्वर्ग, मृत्यु व पाताळ या तीनही भुवनात मनाला सुख प्राप्त होत नसुन ते सुख ईश्वराच्या नामाने सहज प्राप्त होते. ईश्वराच्या नामाने प्राप्त होणाÚया सुखामुळेच त्या पांडुरंगाच्या चरणाशी नतमस्तक झालेले आहोत. आम्ही मुखाने सतत अहोरात्र त्या विठोबाचे नाम घेणार आहो. नामाच्या सामर्थ्याने विठोबा भक्तांच्या सहकार्यास धावत येत असतो व सहकार्य करीत असतो. संत सेना महाराज म्हणतात, ईश्वराच्या/पांडुरंगाच्या नामाच्या सामर्थ्याने मनाला विश्रांती लाभली आहे. व सुखप्राप्त झाले आहे. अशा त्या विठोबाचे नाम सर्वश्रेष्ठ आहे.
51. निवृत्ती निवृत्ति ।
निवृत्ती निवृत्ति । म्हणतां पाप नुरेची ।। 1।।
जप करितां त्रिअक्षरीं । मुक्ति लोळे चरणावरी ।। 2।।
ध्यान धरितां निवृत्ती। आनंदमय राहे वृत्ती।। 3।।
सेना म्हणे चित्तीं धरा । स्मरता चुके येरझार ।। 4।।
संत सेना महाराजांनी चार चरणाच्या अभंगातुन संत निवृत्तीनाथ महाराजांची थोरवी कथन करतात. संत निवृत्तीनाथांच्या निवृत्ती, निवृत्ती म्हणताक्षणी पाप शिल्लक राहत नाही. तीन अक्षरी या मंत्राच्या जपाने मुक्ती आपल्या चरणावरती लोटांगण घालते. ध्यानामुळे आनंदवृत्ती व चित्ती धरण्यास जन्ममरणाचा फेरा चुकल्या जात असल्याचे प्रतिपादन करतात.
संत निवृत्तीनाथ महाराज हे भगवान शंकराचे अवतार असुन संत ज्ञानेश्वर महाराजांचे थोरवे बंधु व सद्गुरु आहेत. निवृत्ती, निवृत्ती असे आपण जरी प्रेमभावे व मनोभावे म्हटल्यास जे काही पाप आपले असेल त्या पापाचा क्षय होतो. त्याचा नाश होतो, ते पाप काहीही शिल्लक राहत नाही. निवृत्ती या तीन अक्षराचा जप केल्यास सरुपता, सलोकता, समीपता, आणि सायुज्जता अशा चार मुक्ती प्राप्त होतात. ह्या मुक्ती आपल्या चरणी लोटांगण घालतात. संत निवृत्तीनाथ महाराजांचे मनापासून ध्यान केल्यास आपल्या मनाला आनंद प्राप्त होवुन आपली आनंदवृŸा निर्माण होते. यावरुन या संतांच्या चिंतनाने मननाने व स्मरणाने आपल्या पापाचा नाश, चार प्रकारची मुक्ती व आनंदींवृत्ती निर्माण होते.
संत सेना महाराज म्हणतात, संत निवृत्तीनाथ महाराजांचे निवृत्ती नाम हे मनोभावे आपल्या चित्तात धरल्यास त्याचे नित्य स्मरण केल्यास जन्म मरणाचा फेरा मधुन आपली मुक्ती होते. जन्माला येण्याची गरज पडत नाही.
52. पांडुरंग दास ।
पांडुरंग दास । म्हणती सांभाळी ब्रीदास ।। 1।।
नाहीं भाव आंगीं । भूषण मिरवितो जगीं ।। 2।।
व्रत आचरण । नाहीं केलें तुझें ध्यान ।। 3।।
स्थिर नाहीं मन । सदा विषयाचें ध्यान ।। 4।।
सेना आहे अपराधी । सांभाळावें कृपानिधी ।। 5।।
संत सेना महाराजांच्या पाच चरणाच्या अभंगातून पांडुरंगाचे दास हे पांडुरंगास म्हणतात की, आपण आपले ब्रीद सांभाळावे. आमच्यात भाव नसुन व्रत, ध्यान, अस्थिर मन, सदा विषयासक्त, अपराधी आहोत. आपण कृपाळू असल्याने आम्हां भक्तांस सांभाळावे. असे प्रतिपादन करतात.
पांडुरंगा, आम्ही भाविकभक्त असुन आपले दास आहोत. आपण आपल्या भक्तांच्या संरक्षण व सहकार्यास धावत आले आहात यामुळे आपल्या वचनास आपण सांभाळावे. आम्ही आपले भक्त असलो तरी आमच्या मनात आपल्याविषयी भावभक्ती म्हणावी तेवढी नाही. आपले प्रति व्रत व आचरण व्यवस्थित नाही भाविक भक्त आपले सदा सर्वदा
ध्यान करीत असतात, चिंतन करीत असतात. आम्ही आपले ध्यान सुध्दा करीत नाही. आमचे मन या संसारात अस्थिर झालेले आहे. ते काही स्थिर होत नाही. संसारामध्ये विषयासक्त होवुन जीवन जगत आहोत. म्हणून संसारातील विषय आमच्या ध्यानी राहतात, मनात राहतात. असे असले तरी पांडुरंगा आम्ही आपले दास्यत्व पत्करले आहे. मनोभावे शरण गेलो आहे.
संत सेना महाराज म्हणतात, पांडुरंगा, आपण तर कृपाळू व दयाळू आहात आपल्या भक्तावर आपण सदैव दया व कृपादृष्टी दाखवित आला आहात. अशीच कृपादृष्टी माझ्यावर दाखवून माझा सांभाळ करावा.
53. प्रेमसुखें कीर्तन ।
प्रेमसुखें कीर्तन । आनंदें गाऊं हरीचे गुण ।। 1।।
धरिला वैष्णवांचा संग । नाहीं लाग कळीकाळा ।। 2।।
स्वल्प मंत्र हाचि जाण । राम कृष्ण नारायण ।। 3।।
वाचे न उच्चारी कांहीं । याविण आणिक नाहीं ।। 4।।
सेना म्हणे रंगलें ठायीं । माझे चित्त तुझें पायीं ।। 5।।
संत सेना महाराजांच्या पाच चरणाच्या अभंगातून प्रेमसुख कीर्तनी राहुन आनंदाने हरिचे गुण गाणार आहे. वैष्णवांची सोबत धरल्याने मृत्युची भिती वाटत नाही. इतर काही न करता रामकृष्ण नारायण हा मंत्र आपल्या मुखाने घ्यावा व ईश्वराचे चरणी चित्त रंगुन जावे असे प्रतिपादन करतात.
ईश्वराचे/पांडुरंगाचे आम्ही भाविकभक्त असुन काया, वाचा व मनाने त्यास समर्पित झालेलो आहोत. पांडुरंगाचे हरिकिर्तन अत्यंत प्रेमाने व सुखाने करणार आहोत. तसेच आनंदाने हरिचे गुणगान करणार आहोत. वैष्णव भाविकभक्तांचा संतसंग धरला असल्याने आम्हां भाविकभक्तांना मृत्युची अजिबात भिती वाटत नाही. ईश्वराचा/विठोबाचा सर्वात सोपा मंत्र म्हणजे, ‘रामकृष्णहरि’ हा होय. हा बीजमंत्र आहे. संपूर्ण सृष्टी या बीजमंत्रातून निर्माण झाली आहे. म्हणूनच माझ्या मुखाने या मंत्राचा उच्चार सदा सर्वकाळ करीत आहे. याशिवाय दुसरा कोणता मंत्र असु शकत नाही. वैष्णव जनांनी सुध्दा हाच मंत्र स्विकारलेला आहे.
संत सेना महाराज म्हणतात, पांडुरंगा आम्ही आपले भाविकभक्त आहोत आपल्या चरणी माझे चित्त समर्पित केलेले असल्याने माझे अंतरंग हे पांडुरंगमय झालेले आहे.
54. बुडतो भवसागरीं ।
बुडतो भवसागरीं । मज काढीं बा मुरारी ।। 1।।
आतां न मानी भार कांहीं । माझी पाही माऊली ।। 2।।
करीं जतन ब्रीदावळी । वागविशी ते सांभाळी ।। 3।।
मी महादोषी चांडाळ । सेना म्हणे तूं दयाळ ।। 4।।
संत सेना महाराजांचया चार चरणाच्या अभंगातून ईश्वरा/पांडुरंगा, या संसारसागरातुन मला सुखरुप काढावे. माझा भार मानु नये. मी महादोषी असलो तरी आपण कृपाळू आहात. आपण मला सांभाळावे. असे प्रतिपादन करतात.
ईश्वरा/पांडुरंगा, मानवी जीवनात संसारसागरात आल्यानंतर येथील ताप व वासनेमुळे मी पार यामध्ये बुडुन जात आहे. आम्ही आपले भाविकभक्त असल्याने यामधुन बाहेर काढावे. तुझ्याशिवाय माझा कोणीही पाठीराखा नाही. आपण माझी मायमाऊली असल्याने आपणच पालनपोषण करणारे व सांभाळणारे आहात. म्हणून मला या संसारसागरातून बाहेर काढण्याचा भार मानु नये. पांडुरंगा, आपण कृपाळु व दयाळु आहात. भाविक भक्तांच्या संकटात आपण धावुन जात आले आहात. त्यामुळे आम्हास सुध्दा या संकटातून सुखरुप बाहेर काढावे व हा संसारसागर आनंदाने पार करण्यास मदत करावी. आपण आपल्या भक्तांस सहकार्य करण्याचे वचन दिलेले आहे. ते वचन आपण पूर्ण करावे. व आमचा सांभाळ करावा. आपण पतीतांचा सुध्दा उध्दार केलेला आहे.
संत सेना महाराज म्हणतात, पांडुरंगा, आपण दयाळू असल्याने आपणांत दयावृत्ती आहे. मी आपला भाविकभक्त असलो तरी माझ्याकडून जे काही महापाप घडले असतील त्याचा मी दोषी आहे. म्हणूनच माझ्यावर दया दाखवावी व माझा उध्दार करावा.
55. बैसोनि कीर्तनांत ।
बैसोनि कीर्तनांत । गोष्टी सांगतो निश्चित ।। 1।।
दुष्ट अधम तो खरा । येथुनियां दूर करा ।। 2।।
तमाखु ओढूनि सोडी धूर । दुष्टबुध्दि दुराचार ।। 3।।
पान खाय कीर्तनांत । रुधिर विटाळशीचें पीत ।। 4।।
त्याची संगती जयास । सेना म्हणे नर्कवास ।। 5।।
संत सेना महाराजांचया पाच चरणाच्या अभंगातून हरिकिर्तनात माणसाने वाईट गोष्टींचा शिरकाव करु नये. अधर्मी, पान, तंबाखु खाणारे, दुराचारी, अशा या लोकांनी हरिकीर्तनाच्या दूर राहावे. वाईट गोष्टींचा त्याग करावा. अन्यथा नरकवास निश्चित असल्याचे प्रतिपादन करतात.
पांडुरंगाच्या/हरिकीर्तनाला जे वाईट वृत्तीचे असणाÚयांनी बसु नये. हरिकिर्तनात भगवंताचे अस्तित्व असते. आपल्यामधील वाईट सवयींचे प्रदर्शन त्या ठिकाणी करणे हे अयोग्य ठरते. म्हणून ज्यांची वाईट वृत्ती असते. त्यांनी कीर्तनाच्या दूर राहावे. समाजातील काही व्यक्तिंना पान, तंबाखु खाण्याची वाईट सवयी असतात. तसेच काही जणांना बिडी ओढून धूर सोडण्याची सवय असते. त्याचा आपल्या रक्ताभिसरणावर प्रक्रियेवर वाईट परिणाम होतो. व त्यामुळे आपलाच घात होतो. या सर्व वाईट प्रवृत्ती आपल्या चांगल्या जीवनाचा घात करीत असतात. या वाईट सवयीं दूर करण्याचा निश्चित प्रयत्न करावा. ही वाईट वृत्ती असुन दुराचारी समजल्या जाते.
संत सेना महाराज म्हणतात, माणसाच्या वाईट वृत्तीचे कोणीही समर्थन करीत नाही. आणि हरिकीर्तनात तर नाहीच नाही. म्हणून वाईट
कृतींचा परिणाम वाईट वृत्तीच्या माणसास भोगावा लागतो. म्हणजेच त्याचा नरकवास कधीही सुटत नाही.
56. ब्रह्मादिक पडती पायां ।
ब्रह्मादिक पडती पायां । जे शरण पंढरीराया ।। 1।।
मोक्ष मुक्ति लोटांगणीं । उभ्या तिष्ठती आंगणीं ।। 2।।
सूर्णसुत शरणागत । येउनी चरणीं लागत ।। 3।।
काया मनें वाचा । सेना शरण विठोबाचा ।। 4।।
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून ब्रह्मादिक ज्यांचे दर्शन घेतात तसेच मोक्ष आणि जीव लोटांगण घालतात. अशा विठोबास काया, वाचा व मनाने शरण जात असल्याचे प्रतिपादन करतात.
पंढरीच्या पांडुरंगाचा अधिकार व श्रेष्ठत्व एवढे मोठे आहे की, ब्रह्मदेवाधिक देव त्यांचे दर्शन घेतांना दिसतात. ज्यांच्या चरणाशी मोक्ष व सरुपता, समीपता, सलोकता व सायुज्जता अशा चारही मुक्ती लोटांगण घालीत असतात. व त्या सर्व अंगणात तिष्ठत उभ्या असतात. अनेक देवता हे याच विठोबास शरण आलेले आहेत व चरणी नतमस्तक होतात. एवढे सामर्थ्य त्या पंढरीनाथामध्ये दिसुन येते संपूर्ण सृष्टीची निर्मिती, पालनपोषण करण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये दिसुन येते. तसेच भाविकभक्तांसाठी जो सदैव तत्पर धावत येत असतो व सहकार्य करणारा पांडुरंगच आहे.
संत सेना महाराज म्हणतात, अशा त्या विठोबास काया, वाचा व मनाने समर्पित होवून शरण जात आहे.
57. ब्रह्मियाचा अवतार ।
ब्रह्मियाचा अवतार । तो हा सोपान निर्धार ।। 1।।
याचें घेतां मुखीं नाम । हरे सकळही श्रम ।। 2।।
समाधीपासुनी भागीरथी । स्नानालागी नित्य येती ।। 3।।
अष्टोत्तत तीर्थांचा मेळा । नाम कऱ्हाबाई वेल्हाळा ।। 4।।
वैष्णवांमाजी डिंगर । सेना तयाचा किंकर ।। 5।।
संत सेना महाराजांच्या पाच चरणाच्या अभंगातून संत सेना महाराज म्हणतात, संत सोपान महाराज हे ब्रह्मदेवाचे अवतार आहेत आपल्या मुखाने नाम घेतल्यास आपल्या संसारातील कष्टाचा नाश होतो. समाधि लागुन असलेल्या तीर्थाच्या ठिकाणी वैष्णवभक्त येत असतात. याचा प्रसार व प्रचार करीत असल्याचे प्रतिपादन करतात.
संत ज्ञानेश्वर महाराजांचे कुटुंब म्हणजे थोरले बंधु संत निवृत्तीनाथ महाराज मधले संत सोपान महाराज आणि बहिण मुक्ताबाई व स्वतः संत ज्ञानेश्वर महाराज हे सर्व कलियुगातील ईश्वराचे अवतार आहे. असे संत सेना महाराज सांगतात. संत सोपान महाराज ज्यांची संजीवन समाधी पुण्याजवळील सासवड येथे आहे. संत सोपान महाराज हे ब्रह्मदेवाचे अवतार आहेत असे मानले जाते. आपल्या मुखाने त्यांचे नामस्मरण केल्यास या संसारामधील आदिभौतिक, आदिदैविक व आध्यात्मिक अशा तीनही तापाद्वारे प्राप्त होणारे दुःख निवारण्यास लागणाÚया श्रमाचा नाश होतो. समाधी लागुन असणाÚया ठिकाणी भाविकभक्त नित्यनेमाने येत असतात. तेथे स्नान करीत असतात, तसेच अष्टोपहर म्हणजे दिवसभर त्यांचा मेळा या ठिकाणी दिसुन येतो.
संत सेना महाराज म्हणतात, संत सोपान महाराज सर्व वैष्णव भक्तांचे आदरार्थ असुन मी याचा प्रचार व प्रसार मनोभावे करीत आहे.
58. माझा केला अंगीकार ।
माझा केला अंगीकार । काय जाणे मी पामर ।। 1।।
देव दीनाचा दयाळ । शरणागता पाळी लळा ।। 2।।
प्रल्हादा कारण । प्रगटला नारायण ।। 3।।
मीराबाईसाठीं । केवढी केली आटाआटी ।। 4।।
शरण रिघा पंढरीराया । सेना न्हावी लागे पाया ।। 5।।
संत सेना महाराजांच्या पाच चरणाच्या अभंगातून पांडुरंगाने माझा स्विकार मी पामर असुन सुध्दा केला आहे. तो गरीबांवर दया दाखवतो. शरण आलेल्यांना अभय देतो. व आवड दाखवितो. भक्त प्रल्हादासाठी प्रकटला व संत मीराबाईस सहकार्य केले. अशा पांडुरंगाच्या चरणी शरण जात असल्याचे प्रतिपादन करतात.
पांडुरंग हा कृपाळु व दयाळु आहे. आपल्या भाविकभक्तांविषयी त्याच्या मनात सदैव दयाभाव राहतो. मी पामर असलो तरी सुध्दा माझ्या सारख्या भक्तांचा स्विकार करतो. हा पांडुरंग दीनाचा कळवळा करणारा व शरण आलेल्या भाविकभक्तास अभय देवून त्यांच्या विषयी आवड दाखविणारा आहे. भक्त प्रल्हाद हा सुध्दा निष्ठावंत भाविकभक्त होता आपल्या मुखातून सदैव त्या विष्णु परमात्माचे नाम अहोरात्र घेणारा होता. तो ईश्वर अशा भक्ताच्या रक्षणार्थ खांबातून प्रकटला आहे. तसे संत मीराबाई ह्या कृष्णाच्या भाविकभक्त होत्या. त्यांच्यासाठी कितीतरी कष्ट उपसले आहे. अशा अनेक भाविकभक्तांच्या रक्षणार्थ धावत येवून सहकार्य केलेले आहे. अशा पांडुरंगाने माझ्यासारख्या सामान्य भक्तांचा स्विकार केला आहे.
संत सेना महाराज म्हणतात, पांडुरंग हा भाविकभक्तांच्या सहकार्यास त्यांच्या कामकाजास सतत धावत येतो. कारण तो कृपाळु आहे. अशा पांडुरंगाच्या चरणी मी नतमस्तक होत आहे..
59. माझें अंतरींचें ।
माझें अंतरींचें । जाणें पांडुरंग साचें ।। 1।।
जीवभाव त्याचे पायी । ठेउनी कांहीं न मागों ।। 2।।
सुख संत समागम । घेऊं नाम आवडी ।। 3।।
सेना म्हणे झाला । धन्य दिवस आजि भला ।। 4।।
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून माझा पांडुरंग माझे अंतकरण जाणतो. जीवेभावे त्यास अर्पण केल्यानंतर काहीही मागत नाही. संतांची संगत व ईश्वराचे नाम आवडीने घेणार आहे. जे काही खरे असेल ते चुकलो तरी मुखाने पांडुरंगाचे नाम घेत असल्याचे प्रतिपादन करतात.
पांडुरंगाचा मी निष्ठावंत भाविकभक्त असुन त्याच्या चरणी काया, वाचा व मनाने समर्पित झालेलो आहे. माझ्या अंतरीचे म्हणजेच माझ्या मनातील बोल, माझे मन जे खरे आहे ते फक्त पांडुरंगच ओळखतो. माझा जीव त्या पांडुरंगाच्या पायाशी अर्पण केलेला आहे. त्या पांडुरंगास या संसारामधील काहीही मागत नाही. माणसाला प्राप्त होणारे सुख व आनंद हे फक्त संत संगतीमध्ये मिळत असल्यामुळे मला संत संगती लाभावी आणि पांडुरंगाचे नाम सर्वश्रेष्ठ व सामर्थ्यशाली असल्याने ते नाम मी आवडीने घेणार आहे. माझी एवढीच साधी अपेक्षा आहे. इतर कोणतीही काहीही इच्छा नाही.
संत सेना महाराज म्हणतात, पांडुरंगा, मी माझ्या अंतरीचे बोलत असुन मी फक्त आपले नाम घेणार आहे. हीच सेवा करावी अशी माझी अपेक्षा आहे. जे काही खरे ते सांगत आहे. कदाचित माझे चुकीचे असु शकते.
60. माझे झालें स्वहित ।
माझे झालें स्वहित । तुम्हां सांगतो निश्चित ।। 1।।
करा हरीचें चिंतन । गावें उत्तम हे गुण ।। 2।।
श्रावण वद्य द्वादशी । सेना समाप्त त्या दिवशीं ।। 3।।
संत सेना महाराजांच्या तीन चरणाच्या अभंगातून श्रीहरिचे चिंतनाने माझे स्वहित साध्य झाले आहे. ईश्वराच्या चांगल्या गुणांचे गायन करावे. माझा कार्यकाळ हा श्रावण वद्य द्वादशीला पुर्ण होत असल्याचे प्रतिपादन करतात.
संत सेना महाराज पांडुरंगाचे निष्ठावंत भाविकभक्त असुन काया, वाचा व मनाने विठोबाच्या चरणी समर्पित झालेले आहे. ईश्वराचे/पांडुरंगाचे नाम हे सर्वश्रेष्ठ व सामर्थ्यशाली असुन तेच मानवास हा संसारसागरातून पार करण्यास उपयुक्त ठरते म्हणून त्यांनी शेवटपर्यंत ईश्वराच्या नामाची कास सोडली नाही. म्हणून ते म्हणतात, या जीवनात माणुस म्हणून मी जन्माला आल्यानंतर माझे स्वहित मी जाणले व ते पुर्ण केले आहे. म्हणून आपणां सर्वांना मी हे सांगत आहे. मी खात्रीने सांगत आहे की, पांडुरंगाचे चिंतन, मनन व स्मरण सदा सर्वकाळ करीत राहावे. त्या पांडुरंगाच्या उत्तम गुणांचे गायन करीत राहावे. हाच उपदेश ते मानव जातीला सांगतात.
संत सेना महाराज म्हणतात, माझा अंतकाळ हा जवळ असुन श्रावण वद्य द्वादशीला या शुभ पर्वावर या भूतलावरुन मी जात असून येथील माझी सेवा पूर्ण झालेली आहे.
61. मान करावा खंडण ।
मान करावा खंडण । दुर्जनाचा सुखें करुन ।। 1।।
लाभा हाणुनि घाला दुरी । निंदकासी झडकरी ।। 2।।
त्याचा जाणावा विटाळ । लोकां पिडीतो चांडाळ ।। 3।।
त्याची संगती जयास । सेना म्हणे नर्कवास ।। 4।।
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून दुर्जनांमधील अभिमान दुर करुन त्यांना सुखी करावे. निंदकास दूर ठेवावे. कारण ते चांडाळ असतात. त्यांचा विटाळ मानावा. या वाईटांच्या संगतीने नाश निश्चित होत असल्याचे प्रतिपादन करतात.
पांडुरंगाचे भाविकभक्त म्हणून संत सेना महाराजांनी समाज
प्रबोधनाच्या दृष्टीने समाजाला जागृत करण्याचे कार्य केलेले आहे.
समाजामध्ये जे दुर्जन म्हणजे वाईट माणसे असतात. त्यांच्यामधील वाईटवृत्तींचा नाश होणे आवश्यक असते. अभिमानाने वागणारे दुर्जन यांचे वाईट गुण समाजास घातक असतात. म्हणून त्यांच्यामधला वाईट गुणांचा नाश करणे समाजहिताचे ठरते. तसेच समाजात निंदा करणारे
सुध्दा अनेकजण दिसुन येतात. अशांच्या पासून आपण दूर राहणे शहाणपणाचे ठरते. त्यांच्या जवळ सुध्दा जावू नये, दुर्गुण असणारे हे लोक समाजास त्रास देत असतात, घातक असतात.
संत सेना महाराज म्हणतात, दृष्ट प्रवृतिंच्या लोकांमुळे समाजाला हानी पोहचते म्हणून ह्या दृष्ट प्रवृत्तींचा नाश होणे गरजेचे असते. त्यांची संगत करणारे सुध्दा त्याच वृत्तीचे होत असल्याने त्यांना नरकवास भोगावा लागतो.
62. मानिसी देहाचा भरंवसा ।
मानिसी देहाचा भरंवसा । केला जाईल नकळे कैसा ।। 1।।
सार्थक करा हो कांहीं । जेणें हरी जोडे पाया ।। 2।।
धनसंपिŸा पाही । ही तो राहील ठायीं ।। 3।।
शरण रिघा पंढरिराया । सेना न्हावी लागे पायां ।। 4।।
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून मानवी देहाचा काही भरवसा नसतो कारण तो केव्हा जाईल हे सांगता येत नसते. म्हणून जीवनाचे श्रीहरिला शरण जावून सार्थक करावे. धन संपत्ती येथेच राहणार आहे. तोच पंढरीनाथ आपणांस मार्ग दाखवत असल्याचे प्रतिपादन करतात.
माणुस जन्माला आल्यानंतर तो या भूतलावरुन केव्हा व कधी जाईल हे सांगता येत नाही. तो मात्र येथून एक दिवस निश्चित जाणार आहे. म्हणजेच मृत्यु आपल्या हाती नाही. कशा पध्दतीने येईल याची शाश्वती नसते म्हणून मानवी जीवन सार्थक करावे. पांडुरंगाशी काया, वाचा व मनाने शरण जावून त्याच्या नामाची कास धरावी. म्हणजेच भगवंत जोडावा. जेणेकरुन आपल्या जीवनातील संसारात आनंद व सुख प्राप्त होईल. संसारसागर आनंदात पार केल्या जाईल. जीवनामधील धन व संपत्ती कितीही गोळा केली तरी ती येथेच राहणार आहे. ती काही आपल्यासोबत नेता येत नाही. केलेला परमार्थ व सत्कर्म हेच शिल्लक राहतात.
संत सेना महाराज म्हणतात, पंढरीच्या विठोबास मनोभावे शरण गेल्यानंतर तो भाविक भक्तांचा कैवारी होतो. मी अशा पांडुरंगाच्या चरणी वंदन करीत आहे. तोच पंढरीनाथ मला सुकरमार्ग दाखविणार आहे.
63. मायबाप कृपावंत ।
मायबाप कृपावंत । तुम्ही दयाळू संत ।। 1।।
घातला भार तुमच्या माथा । आवडे तें करा आतां ।। 2।।
चिंतुनि आलों पायांपाशीं । न धरीं वेगळें मशी ।। 3।।
सेना म्हणे पायीं मिठी । घातली न करा हिंपुटी ।। 4।।
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातुन संत हे कृपावंत, दयावंत असुन मायबाप असतात. संताला शरण जावुन त्यांचेवर भार टाकला आहे आपणांस जे योग्य ते करावे. मला वेगळे करु नका. आपल्या चरणाशी मिठी घातली असुन मला नाराज करु नये, असे प्रतिपादन करतात.
संत हे समाजाचे उध्दारक असतात समाजाला जागृत करणे, त्यांना दिशा दाखविण्याचे महान कार्य करीत असतात. समाजातील माणसांचे कल्याण व्हावे हाच प्रामाणिक हेतु त्यांच्या मनात असतो. तसेच संत हे कृपाळु व दयाळु असतात. म्हणुनच या संतावर आम्ही भक्तांनी भार घातला असल्याचे संत सेना महाराज म्हणतात. मी संतांस मनोभावे शरण आलो असल्याने आपणांस जे योग्य वाटेल ते करावे. आपण आमचे निश्चितच चांगले करणार आहांत याचा विश्वास आहे. आपणांस शरण आल्यामुळे दूर करु नये. वेगळे दूर ठेवु नये. संतांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही आपला संसारसागर यशस्वीपणे, आनंदाने पार करणार आहोत. म्हणुन त्यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरते.
संत सेना महाराज म्हणतात, संताच्या चरणाशी मनोभावे शरण आल्यामुळे आपण मला दूर न करता नाराज करु नये. आपले मार्गदर्शन व शिकवणीनुसार माझे जीवन मी जगणार आहे.
64. मुखीं नाम नाहीं ।
मुखीं नाम नाहीं । त्याची संगती नको पाही ।। 1।।
ऐसियाचे मुखीं माउली । वार घालितां विसरली ।। 2।।
जया नावडे संतसंगती । अधम जाणावा निश्चिती ।। 3।।
नाम घेतां लाज वाटे । रंभे निर्लज्ज भेटें ।। 4।।
जाता हरिकीर्तना नावडे । त्याच्या मना ।। 5।।
सेना म्हणे त्यास । कुलांसुध्दां नर्कवास ।। 6।।
संत सेना महाराजांचया सहा चरणाच्या अभंगातुन ईश्वराचे/पांडुरंगाचे मुखाने नाम न घेणाÚयांची संगत करु नये. ज्यास संतसंगती आवड नाही ते अधम समजावे. ईश्वराचे नाम घेतांना लाज वाटते व वेशाकडे मात्र निर्लज्ज जातात. ज्यांना हरिकीर्तन मनानी आवडत नाही, अशांच्या कुळाचा उध्दार न होता त्यांना नरकवास प्राप्त होतो असे प्रतिपादन करतात.
ईश्वराचे/पांडुरंगाचे नाम हे सर्वश्रेष्ठ असुन सामर्थ्यशाली आहे. या नामतत्वाद्वारे हा संसार सहज पार केला जातो. आपल्या मुखाने जे पांडुरंगाचे नाम घेत नाहीत. अशांची संगती धरु नये. अशांच्या सेबत पांडुरंग राहत नसतो. संत संगतीद्वारे माणसाचे कल्याण होत असते. ज्यांना तो आवडत नाही ते अधर्मी आहेत असे समजावे. पांडुरंगाचे नाम मुखाने घेण्यास ज्या माणसाला लाज वाटते परंतु वेशाकडे निर्लज्जपणे जाणे, भेटणे, भेटण्यात ज्यांना शरम वाटत नाही तो व्यभिचारी समजावा. अशा माणसाचे नेहमी वाईट होवून घात होत असतो. पांडुरंगाचे हरिकीर्तनात गेल्यानंतर ज्याच्या मनाला आनंद होत नसुन ज्यांना हरिकीर्तन मनापासून आवडत नाही. त्यांच्या हातुन परमार्थ होत नसतो.
संत सेना महाराज म्हणतात, जीवनात संतसंगती व हरिकीर्तनाची आवड असावी. ज्यांना हरिकीर्तनाची आवड नसते, व्यभिचार करतात अशांच्या कुळाचा कधीही उध्दार न होता त्याचा नाश होतो.
65. मोक्ष आणि मुक्ति ।
मोक्ष आणि मुक्ति । हे तो तुम्हांसी आवडती ।। 1।।
एका नामावांचून कांहीं । नसे आवडी आम्हां पाही ।। 2।।
तुम्ही करावा जतन । तुमचा आहे ठेव राखून ।। 3।।
सेना म्हणे देई भेटी । कृपावंत जगजेठी ।। 4।।
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून आम्हां भक्तांस ईश्वराच्या नामा व्यतिरिक्त काहीही आवड नाही. मोक्ष आणि मुक्ती
सुध्दा आवडत नाही. या ईश्वराच्या नामाचे जतन करावे जेणे करुन आपला परमार्थाचा ठेवा सुध्दा वाढणार असल्याचे प्रतिपादन करतात.
पांडुरंगाचे आम्ही भाविकभक्त आहोत. पांडुरंगास काया, वाचा व मनाने समर्पित झालेलो आहोत. त्यामुळे ईश्वराचे श्रेष्ठ असणारे सामर्थ्यशाली नाम आम्हांस आवडत असुन त्याची सोबत या संसारात घडली आहे. या ईश्वराच्या नामाव्यतिरिक्त आम्हांस मोक्ष व सलोकता, समीपता, सरुपता व सायुज्जता अशा चार प्रकारची मुक्ती आवडत नाही. ईश्वराच्या/ पांडुरंगाच्या नामरुपी ठेवा आम्ही भक्तजन जतन करुन ठेवणार आहोत. पांडुरंग हा दयाळु व कृपाळू आहे तो भाविकभक्तांच्या संरक्षण व सहकार्यास धावत येत असतो व सदैव भाविकभक्तांच्या पाठीशी उभा राहतो. भक्तांनी प्रेमाने व आनंदाने घेतलेले ईश्वराचे नाम पांडुरंगास आवडते.
संत सेना महाराज म्हणतात, पांडुरंगा, जे आपले नाम घेणारे भाविकभक्त आहेत या भाविकभक्तांवर आपण कृपा करावी कारण आपण कृपाळु आहात व त्यांना आपण प्रत्यक्ष भेट द्यावी.
66. म्हणविलों विठोबाचा दास ।
म्हणविलों विठोबाचा दास । शरण जाईन संतांस ।। 1।।
सदा सुकाळ प्रेमाचा । नासे दुष्ट मळ बुध्दीचा ।। 2।।
ऐकतां हरीचें कीर्तन । अभक्त भक्ति लागे जाण ।। 3।।
उभा राहे कीर्तनांत । हर्षे डुले पंढरिनाथ ।। 4।।
सेना म्हणे हेंचिं सुख । नाहीं ब्रह्मयासि देख ।। 5।।
संत सेना महाराजांच्या पाच चरणाच्या अभंगातून आम्ही पांडुरंगाचे दास असुन संतांना मनोभावे शरण जात आहोत. त्यामुळे सदा सर्वकाळ, प्रेमात व आनंदात राहुन मनातील वाईट विचारांचा नाश होतो. पांडुरंगाचे हरिकीर्तन ऐकल्याने जे अभक्त असतात, ते सुध्दा भक्त बनतात. या हरिकीर्तनात प्रत्यक्ष पांडुरंग उभा राहुन डोलत राहतो. असे प्रतिपादन करतात.
आम्ही पांडुरंगाचे भाविकभक्त असुन त्यास मनोभावे शरण गेलो आहे. आम्ही त्या पांडुरंगाचे दास्यत्व पत्करले आहे. पांडुरंगाचे दास म्हणून घेण्यास आम्हास आनंद वाटतो. तसेच संतांस सुध्दा शरण जाणार आहोत. त्यामुळे सदा सर्वकाळ प्रेमाने व आनंदाने जीवन जगणार आहोत. ईश्वराचे चिंतन व संतांचा सहवास यामुळे मनातील, वाईट वृत्तीचा नाश होवुन मन शुध्द, पवित्र व सात्विक होणार आहे. पांडुरंगाचे हरिकीर्तन जो कोणी ऐकतो, तो अभक्त जरी असला तरी कीर्तनाचा त्याचा मनावर चांगला परिणाम होवुन तो विठोबाचा भाविक भक्त बनतो. हरिकीर्तनात प्रत्यक्ष पांडुरंग येवुन उभा राहुन डोलत असतो.
संत सेना महाराज म्हणतात, ईश्वराचे/पांडुरंगाचे भाविकभक्त होणे तसेच संतांचा सहवास व हरिकीर्तन यापासून मिळणारे सुख व आनंद हे भाविक भक्तालाच शक्य आहे. ते ब्रह्मदेवाच्या नशिबात नसते. त्यांना सुध्दा प्राप्त होत नाही.
67. म्हणा हरी हरी ।
म्हणा हरी हरी । अवघें सकल नरनारी ।। 1।।
येणें तुटेल बंधन । भाग निवारील शीण ।। 2।।
प्रेमें घ्यारे मुखीं नाम । हरे सकळही श्रम ।। 3।।
सेना म्हणे चिŸां धरा । बळकट रखुमाईच्या वरा ।। 4।।
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून आपल्या मुखाने पांडुरंगाचे नाम घेतल्यास संसारातील बंधने नाश पावतात. तसेच आपल्या श्रमांचा परिहार होतो. म्हणून आपण आपल्या चित्तात हरिचे नाम साठवावे असे प्रतिपादन करतात.
पांडुरंगाचे नाम हे बीजतत्व असल्याने संपूर्ण सृष्टी या बीजतत्वातून निर्माण झाली आहे. म्हणून सर्वश्रेष्ठ व सामर्थ्यशाली असणारे हरि हरि हे नाम सर्वांनी स्त्रीपुरुषांनी घ्यावे. मानवी जीवनात आल्यानंतर, या संसारात अनेक आदिभौतिक, आदिदैविक व आध्यात्मिक ताप सहन करावे लागतात. त्याद्वारे होणारे दुःख माणसाला भोगावे लागते. तसेच या संसाराच्या
बंधनातून सहज सुटण्याकरीता पांडुरंगाचे नाम घेणे आवश्यक ठरते. त्याद्वारे आलेला थकवा नाहीसा होतो व आपला संसार हा आनंदाने, सुखाने पार केल्या जातो. आपल्या मुखाने पंढरीनाथाचे नाम प्रेमाने आनंदाने घ्यावे, ज्याद्वारे आपणांस पडणारे कष्ट, श्रम नाहीसे होतील. म्हणूनच या ईश्वरीय नामाचा सर्वांनी स्विकार करावा. म्हणजे आपला
उध्दार होईल.
संत सेना महाराज म्हणतात, पांडुरंगाचे नाम हे तारक असल्याने आपल्या चित्तात सदैव असु द्यावे. ज्याद्वारे पांडुरंगाची कृपा आपल्यावर राहणार आहे. तोच आपल्या सोबतीला शेवटपर्यंत राहणार आहे.
68. येउनी नरदेहासी वाचें उच्चारी ज्ञानेश्वर ।
येउनी नरदेहासी वाचें उच्चारी ज्ञानेश्वर । तयाचा संसार सुफळ झालागे माये ।। 1।।
प्रत्यक्ष परब्रह्म येऊनी अवतारासी । तारिलें जगासी नाममात्रें ।। 2।।
जयाचें आंगणीं पिंपळ सोनियाचा । सिध्द साधकाचा मेळा तेथें ।। 3।।
तयाचे स्मरणें जळती पातकें । सांगत पंढरीनाथ सेना म्हणे ।। 4।।
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून पांडुरंगाचे नाम मुखाने घेतल्यास संसार आनंदाचा होतो. संत ज्ञानेश्वर महाराज हे विष्णु परमात्म्याचे अवतार आहेत. जगातील मानवजातीचा उध्दार करण्यासाठी ते या भूतलावर आलेत. अंगणात सोन्याचा पिंपळ व सिध्द साधकांचा मेळा असल्याचे प्रतिपादन करतात.
संत ज्ञानेश्वर महाराज हे भगवान श्री विष्णु परमात्माचे अवतार आहेत. कलियुगामध्ये मानवाच्या उध्दार व कल्याणासाठी या भुतलावर ते अवतरले आहेत. म्हणून संत ज्ञानेश्वर हे नाम जरी आपण आपल्या मुखाने मनोभावे घेतल्यास आपल्या जमा होणाÚया पुण्यास पारावार राहणार नाही. अपार पुण्य संकलित होईल. व आपला संसार हा सुखाचा व आनंदाचा होणार आहे. संत ज्ञानेश्वरांनी संपूर्ण आयुष्य मानवजातीच्या उध्दाराकरीता खर्ची घालुन आपल्या ज्ञानेश्वरी, अमृताअनुभव, चांगदेव पासष्टी, हरिपाठ, अभंगवाणी इत्यादी रचना या सर्व साहित्याद्वारे समाज प्रबोधनाचे महान कार्य केले आहे. त्यांच्या अंगणात सोन्याचा पिंपळ असुन सिध्द साधकांचा मेळा तेथे म्हणजेच आळंदीला अस्तित्वात आहे.
संत सेना महाराज म्हणतात, पंढरीनाथांनी स्वतः सांगितले आहे की, ज्ञानेश्वरांच्या नामस्मरणाने, चिंतनाने सर्व पातकांचा नाश होतो. म्हणून त्या नामाची कास धरावी. व आपला उध्दार करावा.
69. योगियाचा राजा कैलासवासी गे माये ।
योगियाचा राजा कैलासवासी गे माये ।
गाती नारद तुंबर पुढें बसवा आहे ।। 1।।
गळां रुंडमाळा बासुकीचें भूषण ।
गजचर्म पांघुरला । अंगीं भस्माचें लेपन ।। 2।।
वाम अंगीं गिरिजा देवी जटा गंगा वाहे ।
भोवतें गणगंधर्व जोडोनि पाणि उभे राहे ।। 3।।
सेना म्हणे जेणें भाळीं चंद्र धरियेला ।
नमस्कार माझा तया आदिनाथाला ।। 4।।
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून भगवान शंकराच्या सगुण स्वरुपाचे वर्णन केले आहे. योगीयांचा राजा कैलासवासी त्याचे समोर नारद विणा गात आहेत. गळयाला रुद्रमाळा, अंगाला भस्म, जटेतून वाहणारी गंगा, भोवती गंधर्व उभे, कपाळावर चंद्र धरला असुन अशा आदिनाथाला नमस्कार केल्याचे प्रतिपादन करतात.
भगवान शंकर हे योगीयांचे राजा असुन जे कैलास पर्वतावर निवासी आहेत. भगवान महादेवाच्या समोर देवर्षि नारद गळयात वीणा घालुन गात आहेत. भगवान शंकराच्या गळयात रुद्राक्षाची माळ शोभुन दिसत आहे. तसेच अंगाला भस्म लावले आहे. डाव्या बाजुला पार्वती माता बसली असुन आपल्या डोक्यावरील जटातून गंगा वाहत आहे. महादेवाच्या सभोवताली हात जोडुन गंधर्व उभे आहे. अशा प्रकारे महादेवाच्या सगुण स्वरुपाचे संत सेना महाराजांनी विवेचन केले आहे.
संत सेना महाराज म्हणतात, अशा कैलास निवासी असणाÚया भगवान शंकरानी आपल्या कपाळी चंद्राची कोर धारण केलेली आहे. अशा आदिनाथास म्हणजेच महादेवास मी मनोभावे नमस्कार करीत आहे.
70. रामकृश्ण नामें ।
रामकृष्ण नामें । ऐसी उच्चारावीं प्रेमें ।। 1।।
तेणें काळ दुरी पळे । जाती दोष ते सकळे ।। 2।।
ऐसा नामाचा प्रताप । मागें निवारिला ताप ।। 3।।
मुखीं रामनाम उच्चारी । सेना म्हणे निरंतरी ।। 4।।
संत सेना महाराजांच्या चार चरणाच्या अभंगातून ईश्वराचे
रामकृष्ण हे नाम प्रेमाने उच्चारावे, ज्याद्वारे मृत्यु दूर पळणार आहे. दोष जाऊन तापांचा नाश होईल. म्हणून मुखाने ईश्वराचे नाम निरंतर घ्यावे असे प्रतिपादन करतात.
प्रभु परमात्मा विष्णु देवताने या पृथ्वीतलावर मानवाचा उध्दार करण्यासाठी त्रेता युगामध्ये राम आणि द्वापार युगामध्ये कृष्णाच्या रुपाने अवतार धारण केला. म्हणूनच ईश्वराची राम व कृष्ण ही दोन नावे मानवाचे कल्याण करणारे असल्याने त्या नावाचा प्रेमाने व मनोभावे उच्चार करावा. त्यामुळे मृत्यु आपल्या जवळ येवू शकत नाही ईश्वरी नामाच्या सामर्थ्यामुळे तो दूर पळून जातो. भगवतांचे नाम घेणाÚया व्यक्तिला मृत्युची भीती वाटत नाही. आपण केलेल्या संसारामधील दोषांचा नायनाट या नामतत्वाद्वारे होत असतो. तसेच ईश्वराच्या नामाचे सामर्थ्य एवढे आहे की, संसारामधील आदिभौतिक, आदिदैविक व आध्यात्मिक ताप व त्यापासून होणारे दुःख व कष्ट ह्या सर्वांचा नायनाट होतो, म्हणूनच त्या ईश्वराचा नामाचा स्विकार प्रेमाने, आनंदाने करावा.
संत सेना महाराज म्हणतात, ईश्वराचे पांडुरंगाचे नाम सर्वश्रेष्ठ व सामर्थ्यशाली असुन ते नाम आपल्या मुखाने सदैव घ्यावे.
