वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
मूर्तिजापूर – दीपोत्सव,दिवाळी हा भारतीय संस्कृतीतला एक आनंदोत्सव आहे .आणि या आनंदोत्सवाच्या अनुषंगाने विशेष पर्वणी मिळते ती लेखक ,वाचक आणि जाहिरातदार यांना नाविन्यपूर्ण दिवाळी अंकातून प्रसिद्ध होणार्या वाचनिय अशा फराळाची ! संपूर्ण महाराष्ट्रातून प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांसाठी सृजन साहित्य संघ, मूर्तिजापूर यावर्षीपासून घेऊन येत आहे, खाली प्रमाणे एक दिवाळी अंक स्पर्धा .
” सृजनदीप दिवाळी अंक पुरस्कार – २०२२” यासाठी खालील प्रमाणे प्रथम तीन अंकांना पुरस्कृत करण्यात येईल .
▪प्रथम पुरस्कार -१५०१ रूपये .
▪द्वितीय पुरस्कार – ११०१रुपये .
▪️तृतीय पुरस्कार – ७०१ रूपये .
महाराष्ट्रामध्ये दिवाळी अंकांची एक उज्ज्वल परंपरा राहिलेली आहे .या परंपरेचा यथोचित सन्मान व्हावा , मराठी भाषा समृद्ध व्हावी व नव्या पिढीला दिवाळी अंकांचा परिचय व्हावा म्हणून ही स्पर्धा,सृजन साहित्य संघाद्वारा आयोजीत करण्यात आली आहे . आगामी सृजन साहित्य संमेलनात विजेत्या दिवाळी अंकाचे प्रतिनिधी , संपादक यांना सन्मानपूर्वक रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येईल. सदर स्पर्धेसाठी परीक्षकांचा निणर्य अंतिम राहिल .
सदर स्पर्धेकरिता कुठलेही प्रवेश शुल्क नसून वृत्तपत्र ,मासिक, वार्षिक अंकाच्या संपादक यांनी आपल्या अंकाची एक प्रत दिनांक १०/११/2022 पर्यंत संस्थेचे विश्वस्त यांच्याकडे खालील पत्यावर पाठवावी . प्रमोद पंत, “सुधाश्री” १६,गोयनकानगर, मूर्तिजापूर,जिल्हा अकोला-४४४१०७, मोबा – ९७६३०१५६०० या पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन सृजन साहित्य संघाचे रवींद्र जवादे ,प्रमोद पंत, प्रसिद्धी प्रमुख विनोद महल्ले यांनी केले आहे .