इंटरनेट ही काळाची द गरज आहे. इंटरनेटच्या वाढत्या वापराने करिअरचे अनेक पर्याय खुले केले आहेत. ऑनलाईन खरेदीचं प्रस्थ वाढत चाललं आहे. सोशल मीडिया प्रभावी ठरत आहे. त्यामुळे डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रात नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा नव्याने कामाला सुरूवात करायची असेल तर डिजिटल मार्केटिंगमधले हे पर्याय तुम्ही निवडू शकता.
* ‘सर्च इंजिन ऑप्टिमायजेशन’ म्हणजे एसईओचं काम तुम्ही करू शकता. या अंतर्गत गुगल, याहूसारख्या सर्च इंजिनवर सर्च होणाऱ्या साईट्सची माहिती घ्यायची असते. लोक कोणत्या वेबसाईट्स सर्वाधिक सर्च करतात, कोणत्या विषयाची माहिती त्यांना हवी असते, ही सगळी माहिती उपलब्ध करून द्यायची असते. एसईओचे अभ्यासक्रमही आहेत. या अभ्यासक्रमात कीवर्ड रिसर्च, साईट डिझाइन्स, इंटर लिंकिंग, नेटिव्ह लिंकिंग ही कौशल्यं शिकवली जातात. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही एसईओ प्रोफेशनल, वेबसाईट ऑडिटर म्हणून काम करू शकता. यासोबतच इतरही बऱ्याच संधी आहेत.
* ‘इनबाउंड मार्केटिंग’ही सध्या बरंच लोकप्रिय होत आहे. या अंतर्गत एखादी वस्तू खरेदी
करण्याआधीच ग्राहकांना त्याबाबत माहिती दिली जाते. एखादी वस्तू विकत घेण्याआधी ग्राहक त्याबाबत ऑनलाईन सर्च करतात. उत्पादनांबद्दल योग्य ती माहिती मिळाली तर लोक ती खरेदीही करतात. ही माहिती पुरवण्याचं काम इनबाउंड मार्केटिंगमध्ये केलं जातं.
* ‘वेब अॅनालिटिक्स’ हा सुद्धा चांगला पर्याय आहे. ग्राहकांना कोणती माहिती हवी आहे. त्यांना काय वाचायला आवडतं. एखाद्या वेबसाईटला किती वेळा भेट दिली जाते. कोणत्या भागातले लोक कोणती साईट किती वेळ बघतात ही सगळी माहिती वेब अॅनालिटिक्सच्या माध्यमातून मिळते.