बरे झाले देवा हे काव्य संग्रहाचे नाव व जगतगुरू संत तुकारामचे छायाचित्र ह्या दोन बाबी एकरूप आहेत. कारण बरे झाले देवा हे उदगार तुकोबांनी अनेक वेळा काढले. तसेच एक वेळ वैराग्यमूर्ती गाडगेबाबा कीर्तन करत असताना त्यांना निरोप आला की त्यांचे सुपुत्राचे देहावसान झाले आहे तेव्हा गाडगेबाबा म्हणाले असे मेले कोट्यानू कोटी रडू कोना कोना साठी सुख व दुःख ही बाब कर्म व भाग्या आधीन आहे प्राप्त परिस्तिथीत समाधान मानणे हे मानवाचे कर्तव्य आहे. असं संत मानतात.
ठेविले अंनते तैसेचि राहावे चित्ती असू द्यावे समाधान असे तुकाराम महाराज सांगतात
तर असा भक्ती व संत संदेश देणारा हा बरे झाले देवा हा कवी डॉ नारायण अंधारे यांचा पाचवा काव्यसंग्रह
उन्यापुऱ्या पाच वर्षाच्या साहित्यिक प्रवासात पाच काव्यसन्गऱ्हाद्वारे पाचशे कविताचे धनी होणे ही बाब सामान्य नाही ‘या आधी त्यांचे कैवल्याचे लेणे, 2)गुण गातो आवडीने 3)कांचन छाया 4)ज्येष्टांचा मी सांगाती हे चार काव्य संग्रह प्रकाशित झाले असून हा पाचवा काव्यसंग्रह व या पाच ही पुस्तकावर समीक्षा लिहिण्याचा मला योग लाभला व यासाठी कविचा आग्रह मी अव्हेरू शकत नाहीं कारण त्यांचा असणारा स्नेह व स्वभाव. तसे नारायण अंधारे हे अजात शत्रू आहेत, शांतप्रिय व प्रेमळ आहेत.
काव्य संग्रहात एकूण ११८कविता आहेत सर्व कवितावर भाष्य करणे सहज शक्य नाही व मर्यादा आहेत शितावरून भाताची परीक्षा या न्यायाने पुढे चालतो. काव्य संग्रहात व्यक्ती, संत, महापुरुष, ज्येष्ठ,, प्रसंग, दिन विशेष,, संशोधक,, कवी, गायक,. नेते,, कृषक, सरकार, योजना, राजकारण, सण संस्कृती, आदी विषय हाताळले आहेत. त्या त अंदाजे ५५व्यक्ती, 3बोध, ५भक्ती, ३संत, ५संस्था, ५शेतीमाती, २विज्ञान, २भाषा, ५राजकारण, ५पर्यावरण, व कही इतर असं वर्गिकरण करता येईल.
नुक्कत्याच महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केलेली *लाडकी बहीण **योजने वर भाष्य करताना कवी ने आपल्या कवितेत हे अधोरेखित केले की एक वर्ग खुश करताना दुसऱ्या वर्गकडे आपसूक दुर्लक्ष होते कविता लाडकी बहीण (2)
समतेच्या युगात असं होऊ नये पण आपोआप होते.
तीर्थक्षेत्र ., राजकीय सभा आदी ठिकाणी लोकं जमतात व मग गर्दी होऊन गोंधळ होतो व कित्येक जखमी व काही प्राणास मुकतात. अश्याच हाथरस येथील घटनेवर कवी नारायण अंधारे यांनी पायाखालची माती *(३)या कवितेत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. म्हणून कवी म्हणतो
*एकांती बसूनी
हरिशी स्मरा
हाची सापडे
बोध खरा
विठुराया या कवितेत कवी देवाला वर मागतात ते म्हणतात बळी राजाला बळ दे, इपि यस ला साथ दे, संत संग, परस्त्री माता, स्नेहभाव, रसाळ वाचा, ज्येष्ठांचा सन्मान, आदी मागणे मागतात
ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध दिनाचे औचित्य साधून त्यांनी अशी कविता साकारली
(८), ज्येष्ठ समाजाचं धन
ज्येष्ठ राष्टाचं धन
ज्येष्ठ दिशा दर्शन
ज्येष्ठ स्नेहबंधन.
प्रेमात भाकरीत, विरहात सदा कविना दिसणारा चंद्र पृथीपासून दूर जात असलेला चंद्र प्रसंगावर कवीने कविता साकारली
चंद्रही दूर चालला(९l) एक तरी झाडं एकाने लावावे अशी वास्तव अपेक्षा कवी वैशाख वनवा (२०)कवितेतून व्यक्त करतात. देवर्षी (२२)या .कवितेत नारदमुनी यांचा नामजप, विष्णुप्रियता, ब्राह्मपुत्र, भक्तीसूत्र,, पत्रकारिता, प्रहाद गुरु, आदी बाबीनी गौरव केला
रंगाची महती सांगताना कवी आगळे वेगळे रंग अनुभवतो कविता एकची रंग *(२४)जसे प्रेमारंग, भक्ती रंग, श्रीरंग, अभंगरंग, शिवबा रंग, न्याय समतेचा रंग, आदी रंग अधोरेखित केले. पक्षी मित्र प्रेम कवीने चिऊताई
कवितेत व्यक्त केले
आई ही कविता कवीने अभंगप्रकारणे नेण्याचा प्रयत्न केला पण कुठे कुठे तो ढसाळला.
त्र्यंबक बापूजी ठोंबरे या बालकवीला कविनेवदंन केले आहे (३६). हसण्यासाठी (३७)या कवितेत कवीने हसण्याचे महत्व सांगितले आहे
*हास्य असते प्रसन्नतेचे लेणे
हास्य असते देवाघरचे देणे
हास्य असते टिपूर चांदणे
हास्य असते चैतन्याचे नटणे
ग्रामगिताकार राष्ट्र संतावरही कवीने एक काव्य साकारले आहे (३९),
महात्मा फुलेंना स्वतःचे घर देणाऱ्या फातिमा शेख या महान व्यक्तिमत्वा ला कवीने न्याय दिला फातिमा शेख *(४०).
पुस्तक आणि बाबासाहेब हा सुरेख संगम एका कवितेत
साकारला (४६)
प्रभू श्रीराम काव्य साकरतांना जानकीमाता, लक्ष्मण प्राण, शबरी भाव, अहिल्या उद्धार,, भारत स्नेह, शरयू पावित्र्य,, हनुमंत मर्म बंध असा गुणसागर रेखांकित केला.
खरं म्हणजे ११८कवितांवर भाष्य करणे मला शक्य नाही व तुम्हालाही या समीक्षेत गुंतवून ठेवणे योग्य नाहीं म्हणून इथे तूर्त थांबतो.
काव्य संग्रहात एक विशेषता जाणवते ती म्हणजे कवीने कविता करताना प्रसंग, जन्मदिन, स्मृती दिन, घटना, यांच्या तारखांचा ताळमेळ घातला म्हणून प्रत्येक कवितेखाली कवितेच्या निर्मितेची तारीख टाकली आहे जगापासून प्रेम न मिळाल्यामुळे निराश झालेले पण जगाला प्रेम अर्पा वे म्हणणारे साने गुरुजी यांची प्रार्थना तर जगाला कल्याण व्हावे म्हणून पसायदान मागणारे संत ज्ञानेश्वर यांनी सुरवात व शेवट केला आहे, ही कल्पकता, क्रांती प्रकाशन अकोला, सागर लोडम यांची अक्षर जुळवणी, ग्रेट गजानन धोंगळे यांचे बोलकेअसे अप्रतिम मुखपृष्ठ यामुळे कविता संग्रहाची ऊंची वाढली आहे
खरं म्हणजे कवीने आता थोडं थांबून साहित्याच्या कथा,समीक्षा,अनुवाद, लेख या प्रकराकडे वळावे त्यामुळे लेखनात विविधता येईल मोहोड गुरुजी यांनी मुद्रण शोधन केल्यामुळे चुका नगण्य आहेत
संग्रहाची बांधणी, छपाई, मुखपृष्ठ, कागद, आदी सुबकच ,नेहमीप्रमाणे मी प्रकाशनाला होतोच व याहिवेळी काव्य संग्रहावर प्रथम लिहिण्याचा सन्मान कवीने मलाच दिला..

कवी.. नारायण अंधारे (शिर्ला अंधारे )ता. पातूर, ज़ि. अकोला 9465601549
प्रकाशक , प्रकाश अंधारे क्रांतिरत्न प्रकाशन जठारपेठ अकोला
देणगी मूल्य… १५०/
समीक्षक… तुळशीराम बोबडे कौलखेड अकोला
9579242801