खरंतर अनेक लोकांना कळत नसेल की, अखेर सरकार जवळ देश चालवण्यासाठी एवढा पैसा कुठून येतो. तर हा पैसा कुठे आणि कसा खर्च होतो. चला तर मग आज आपण यंदाच्या आर्थिक वर्षात सरकारकडून कोणत्या माध्यमातून पैसा येणार आहे. तसंच तो कुठे खर्च होईल याचा हिशोब जाणून घेऊया…
सरकारजवळ कुठून येणार पैसे : बजेटचा २८ भाग भारत सरकार कर्ज आणि इतर दायित्वातून घेणार आहे. इन्कम टॅक्समधून सरकारला १९ टक्के पैसे येतील. यूनियन एक्साइज ड्यूटीजमधून ५ टक्के पैसा येईल. कॉर्पोरेशन टॅक्समधून सरकारला १७ टक्के पैसा येईल. जीएसटी आणि इतर करांच्या माध्यमातून सरकारला १८ टक्के पैसे येतील. कस्टमचं योगदान ४ टक्के असेल. कर्ज नसलेल्या भांडवली पावत्याच्या माध्यमातून १ टक्के, नॉन टॅक्स रिसिप्टच्या माध्यमातून ७ टक्के पैसे सरकारकडे येईल.
पाहा कुठे खर्च होणार हे पैसे : अर्थमंत्रालयानुसार सरकारच्या एकूण कमाईच्या किती टक्के पैसे कुठे खर्च होतात हे पाहूया. यामधील २० टक्के पैसा कर्ज फेडण्यात जाईल. ८ टक्के केंद्र स्पॉन्सर्ड योजनांवर, इतर ६ टक्के सब्सिडीमध्ये, ८ टक्के संरक्षण क्षेत्रात, १६ टक्के केंद्रीय योजनांवर, फायनान्स कमिशन आणि इतर ट्रान्सफरवर ८ टक्के पैसा खर्च होतो. तर २० टक्के राज्यांना टॅक्स म्हणून दिले जातात. ४ टक्के पैसा पेन्शनमध्ये खर्च होतो. तसंच इतर खर्चावर सरकारचा ९ टक्के पैसा खर्च होतो.