विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या आहेत. सुट्टीत गावाला किंवा फिरायला जाणाऱ्यांची संख्या आता वाढणार हे नक्की. तुम्हाला जर रेल्वेने प्रवास करायचा असेल तर या ठिकाणी काही गोष्टीची माहिती असणे आवश्यक आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक नवीन सुविधा दिली आहे. आता व्हॉट्सअॅपद्वारे तुम्ही पीएनआर स्टेट्स चेक करू शकता. या ठिकाणी तुम्ही रेल्वेचे स्टेट्ससह अनेक अन्य माहिती चेक करू शकता. व्हॉट्स अॅपवर पीएनआर आणि लाइव्ह ट्रेनची स्थिती चेक करण्यासाठी चॅटबॉटमध्ये १० अंकांचा पीएनआर नंबर टाकावा लागेल. हे कसे करायचे या संबंधी तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स.
■ स्टेप 1: आपल्या स्मार्टफोनच्या कॉण्टॅक्ट लिस्टमध्ये जा. या ठिकाणी Railofy चा ट्रेन चौकशी नंबर (+91-9881193322 )
■ सेव्ह करा. स्टेप 2 आता व्हॉट्सअॅप ओपन करा आणि Railofy च्या चैटबॉट नंबरच्या चॅट विंडोमध्ये जा.
■ स्टेप 3: पुन्हा तुम्हाला आपल्या ट्रेनचा १० अंकाचा पीएनआर नंबर वा ठिकाणी टाकावा लागेल. नंतर याला सेंड करावे लागेल.
■ स्टेप 4: Railofy चॅटबॉट पीएनआर स्थिती, ट्रेनची स्थिती आणि अलर्टसारख्या डिटेल्सची माहिती तुम्हाला पाठवली जाईल.
■ स्टेप 5: चॅटबॉट आता व्हॉट्सअॅपवर ऑटोमॅटिकली तुम्हाला व्हॉट्स अॅपवर ट्रेनची रिअल टाइम स्थिती पाठवेल. तुम्ही तुमच्या फोनवरून १३९ डायल करूनसुद्धा रेल्वेची स्थिती माहिती करून घेऊ शकता. हे खूपच झंझटचे काम आहे. कारण यात कॉल लावणे खूपच कठीण काम होते.
जर तुम्हाला आता ऑनलाइन जेवण कसे ऑर्डर करायचे आहे. यासंबंधी माहिती करायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी याचीही स्टेप बाय स्टेप प्रोसेस माहिती देत आहोत.
■ स्टेप 1: आता तुम्हाला एक नंबर सेव्ह करायचा आहे. हा Zoop चा आहे. व्हॉट्सअॅप चॅटबॉट नंबर +917042062070 आपल्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह करा.
■ स्टेप 2: व्हॉट्सअॅप मध्ये Zoop चॅटबॉट विंडो ओपन करा.
■ स्टेप 3: चॅट मध्ये १० अंकाचा पीएनआर नंबर टाका व आपल्या पुढील अपकमिंग स्टेशनची निवड करा. स्टेप 4: Zoop चॅटबॉट तुम्हाला निवडण्याची रेस्टॉरंटचा ऑप्शनची एक लिस्ट देईल. तुम्हाला तुमच्या मन पसंतीचे रेस्टॉरंटवरून जेवण ऑर्डर करणे आणि नंतर पेमेंट ऑनलाइन करावे लागेल.
■ स्टेप 5: चॅटबॉट तुम्हाला चॅटबॉटवरून आपल्या जेवणाला ट्रॅक करण्याची सुविधासुद्धा देते.