केंद्र सरकार मध्यमवर्गीय नागरिकांना स्वतःचं घर विकत घेता यावं किंवा बांधता यावं यासाठी विशेष योजना सुरू करणार आहे, अर्थमंत्र्यांनी हंगामी अर्थसंकल्पात जाहीर केलं. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेंतर्गत तीन कोटी घर लवकरच बांधली जाणार असून येत्या पाच वर्षात सरकार आणखी दोन कोटी घरांची पूर्तता करेल, असंही त्यांनी सांगितलं.
सौर ऊर्जा निर्मितीसाठी घराच्या छतावर संयंत्र बसवणाऱ्या एक कोटी कुटुंबांना ‘३०० युनिट’ वीज मोफत दिली जाईल. पर्यावरण स्नेही आणि पर्यावरण पूरक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी सरकार जैव उत्पादनासारख्या विविध योजना राबवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच जैव विघटन होणारं पॉलिमर, प्लॅस्टिक, औषधं, कृषी निगडीत उत्पादनांना सरकार प्रोत्साहन देणारं धोरण सरकार आणणार आहे.
About The Author
Post Views: 89