वेणीत तुझ्या गजरा——
वेणीत तुझ्या गजरा,
शोभून दिसतो साजरा.
पडती त्यावर नजरा,
कित्येकांच्या.
रुपाची तु खानं,
असा तुझा वानं.
हरपे मगं भानं,
पहाणाऱ्यांचे.
ठसठशीत तुझे तनं,
तळपती जनं.
घायाळ होती मनं,
बघणाऱ्यांचे.
बघणाऱ्यांचे हालं,
असे तुझे गालं.
शेवटी तो मालं,
परक्यांचा.
डौलदार तुझा बांधा,
न जुळे सांधा.
मग येई वांदा,
जळणाऱ्यांचा.
000
मामाची रंभा
पोट्टे म्हणत मले,
काय राज्या संभा.?
गमावली कानी त्या,
मामाची रंभा.
म्या म्हणलं त्याईले,
जाऊ देणं बे तिले.
तिच्या परीस चांगल्या काय?
भेटत नाहीत मले.
म्या कानीं तिच्या कडं,
लक्षचं नाही देल्लं.
अन् त्याच वरीस तिचं राज्या,
लगीन होऊन गेल्लं.
मंग म्या माह्यासाठी,
लय पाह्यल्या पोट्ट्या.
जिथं जानं तिथं भाऊ,
दिसत काया कुट्ट्या.
एक नाही दोन नाही,
अशा लय पाह्यल्या.
पण कुठं दिसत म्हशी,
त् कुठं दिसत वायल्या.
ते कानी मंग मले,
कवा कवा भेटे.
तिले पाहून मावं राज्या,
कायीजचं फाटे.
मंग कानी मी राज्या,
पस्तावनी पळ्ळो.
एकटाच गेलो कोन्ट्यात,
अन् मोठ्यानं लळ्ळो.
माह्या बाप म्हणे बाबू ,
हे बरं नाही झालं.
अन् त्याच वरीस मंग मले,
दावं लावून देलं.
कसा तरी उभा केला,
हा संसाराचा खंबा.
अन् पोट्टे म्हणत मले,
काय रा…
00
लोडशेडिंग
म्या राज्या तीच्यावर ,
लाईन टाकली पक्की.
तरी नाही सुरू होये ,
माह्यावाली चक्की.
म्या म्हणलं इचिबिन ,
अशी काहुन करते.
लाईन नाही क्लिअर ,
हिचं पाणी कुठं मुरते.
शेजारच्या पिंट्यान ,
आणली नवी न्युज.
कशी होईल सुरू म्हणे ?
तिचा उडुन गेला फ्युज.
म्या म्हणलं पिंट्या ,
फ्युज टाकील नवा.
सोळणार नाही तिच्यावाला ,
लावल्या बिगर दिवा.
मंग म्या तिच्यावाले ,
दाबून पाह्यले खटके.
हात देल्ला फेकून तिनं
मलेच बसले झ्यटके.
त्याच दिवशी मुहूर्ताची ,
होती मायी ईच्छा.
पण जमलं नाही गेसिंग ,
सोळुन देल्ला पिच्छा.
कायले म्हणलं ईनाकारण ,
तिच्या साठी मरु.
आज नाही सुरू झाली ,
उद्या चालू करू.
तिच्या विषयी मस्तकात ,
भलतीच सनकली.
काय आलं मनात तिच्या ,
अचानक चमकली.
तिले पाहून मले मंग ,
आला जरा ढिवसा.
राती नाही आली म्हणल…
000
बायना
कमाल झाली बावा तुही,
तुले कला साधली पुरी.
उभाच कापतं बोकळ्या,
ठेवतं गयावरती सुरी.
उरफाटा टांगून ठेवत,
करत त्याचा पायना.
बस्स झाली तुही आता,
लय झाला बायना.
येता जाता देत राह्यत,
हातावरती तुरी.
तुही तिकडे भन्नाट,
चालते हेरा फेरी.
चित्र पाहून तुह्यावालं,
फुटला माया आयना.
बस्स झाली तुही आता,
लय झाला बायना.
तुह्या मांग फिरणारे,
सारे झाले थंडे.
धाऊ धाऊ थकले,
गायले त्याईन अंडे.
तुह्या मांग फिरू फिरू,
घासल्या माह्या वायना.
बस्स झाली तुही आता,
लय झाला बायना.
मी ईकडे बोटं मोजतो,
करतो बाव्वन बाव्वन.
तु तिकडे म्हशीवानी,
खात राह्यत मेवन.
वाट तुही पाहू पाहू ,
झाली माही दयना.
बस्स झाली तुही आता,
लय झाला बायना.
आता येशील मंग येशील,
मोजत बसतो बाशे.
हाती लागतात डुकरं तुह्या,
टाकत राह्यत फाशे.
जायात नाही…
00
मुलगी आलीयं लग्नाला
आमची मुलगी आलीयं लग्नाला,
एखादा मुलगा तुम्ही पायजा.
पण,अटी काय असतील ?
त्या आधी लक्षात ठेवजा.
सांग-काम्या आम्हाला चालणार नाही,
तो आई-वडिलांच ऐकणारा नसावा.
पण,आमची मुलगी म्हणेलं,
बसं तिथचं.
तर, तिथेचं तो बसावा.
मुलगी आमची पहायला,
कशीही असो.
पण, तो दिसायला सुंदर असावा.
अवगुण्या असला तरी हरकत नाही.
पण, तो हिरो सारखाच दिसावा.
आमच्या मुलीचे शिक्षण काहीही असो.
कोणी तिला विचारणाराच नसावा.
पण, तिच्या आईच्या इच्छेखातर,
मुलगा नोकरीवरच असावा.
शेती तर त्याच्याजवळ असावीच.
पण, तो शेतीत राबणारा नसावा.
दिवसभर आमच्या मुलीला घेऊन,
बाहेर फिरतांनाच तो दिसावा.
मुलगी आमची फारच लाडाची,
तिला कामधंदा अजीबात नसावा.
पण, दिवसभर तिच्या हातात,
फक्त मोबाईलच दिसावा.
खेड्यात मुलगी आमची राहणार नाही.
तो शहरात राहणाराच असावा.
पण, कमाईत जर त्याच्या भागत नसेल,
तर त्याच्या माय-बापानेच तो पोसावा.
दिर-ननंद चालणार नाहीत.
ती नसती झ्यंझ्यट नसावी.
पण, साळा-साळी विषयी त्याच्या,
मनात आस्था असावी.
सासू-सासरे तर नकोच नको.
तो, नसता गोंधळ नसावा.
पण,आम्हाला तो सोडणार नाही.
घेऊन चालणारा असावा.
असेल मुलगा तर कळवा आम्हा,
येऊ आम्ही त्याला पहायला.
जर,नसेल हरकत त्याची तर,
तिथेच जाऊ आम्ही राहायला.
-गणेश उत्तमराव साखरे
माहुली (धांडे) ता. दर्यापूर, जि. अमरावती, मो.न.-९९२१५४९०५५