
पातूर (12 मे) येथे संपन्न झालेल्या ६२ व्या अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठांचा विशेष सहभाग राहिला. संमेलनाध्यक्ष मा. तुळशीरामजी बोबडे हे महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे (फेस्काॅम) विदर्भ पश्चिम प्रादेशिक विभागाचे सदस्य आहेत तर ज्यांनी संमेलनात उपस्थित राहून उद्घाटन सत्रात शंखनाद केला ते अभि.विनायकराव पांडे हे ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अंतर्गत तपासणी अधिकारी आहेत तसेच स्वागताध्यक्ष नारायण अंधारे हे अकोला जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत तर श्री ना.मा. मोहोड हे विदर्भ पश्चिम प्रादेशिक विभागाचे उपाध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे प्राचार्य डॉ सत्यनारायण बाहेती हे अकोला ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव तथा अकोला जिल्हा पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष आहेत तर श्री रामभाऊ बिरकड हे जिल्हा परिषद ज्येष्ठ नागरिक संघ खडकीचे अध्यक्ष असून अकोला जिल्हा पेंन्शनर संघटनेचे उपाध्यक्ष आहेत तसेच श्री कृष्णराव घाडगे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्येष्ठ नागरिक संघ तांदळीचे अध्यक्ष आहेत तर श्री राजूभाऊ कोकाटे, श्री गुलाबराव कोकाटे व श्री रामकृष्ण खंडारे हे श्री सोमपुरी महाराज ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी आहेत त्याचप्रमाणे श्री रामदास मोकळकर व प्रा . विलास राऊत हे श्री सिदाजी महाराज ज्येष्ठ नागरिक संघ पातुर चे अध्यक्ष व सचिव आहेत तर श्री सुधाकर उगले हे कृषी विज्ञान ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आहेत वअशाप्रकारे अंकुर साहित्य संमेलनास ज्येष्ठांचा विशेष सहभाग लाभला त्यामुळे अंकुरचे ज्येष्ठांचा सन्मान हे ब्रीद सार्थ झाल्याचे दिसून आले.