वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गेल्या बारा वर्षापासून जिल्हास्तरीय खुल्या काव्य स्पर्धेचे आयोजन केल्या जाते. याही वर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्यातील कवी कवयित्रींनी कोणत्याही विषयावरील आपल्या दोन कविता मंडळाच्या कार्यालयात ३० ऑक्टोबर २०२२ पर्यंत पाठवाव्यात. कविता खालील पत्त्यावर पाठवा. श्री डी. डी. पाटील संस्थापक अध्यक्ष जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळ जामनेर ५५/१ शारदा सदन लक्ष्मी कॉलनी वाकी रोड जामनेर तालुका जामनेर जिल्हा जळगाव ४२४ २06. मोबाईल नंबर ८७ ८८ २६०५६०. विजेत्यांना जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येईल व सत्कार करण्यात येईल. संमेलनाचे तारीख वेळ ठिकाण नंतर वृत्तपत्रातून जाहीर करण्यात येईल कविता पाठविताना स्वतः चा बायोडाटा मोबाईल नंबर व दोन पासपोर्ट साईज फोटो पाठवावे असे आवाहन जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री डी. डी. पाटील यांनी केले आहे