कारंजा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचं आज सकाळी मुंबई इथं निधन झालं. ते ६० वर्षांचे होते. त्याच्या पार्थिवावर आज संध्याकाळी ५ वाजता वाशिम पद्मतीर्थ मोक्षधाम इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. १९९७ ते २००३ या कालावधीत ते विधानपरिषदेचे सदस्य होते तसचं त्यांनी कारंजा मतदार संघाचं २००४, २०१४ आणि २०१९ मधे प्रतिनिधित्व केलं होतं. ते अनेक सामुदायिक सेवा उपक्रमांमध्ये आघाडीवर होते आणि पक्ष मजबूत करण्यात त्यांनी प्रशंसनीय भूमिका बजावली असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
About The Author
Post Views: 92