अलीकडे अनेकांना रक्तदाब अर्थात ब्लड प्रेशरचा त्रास जाणवतो. त्याला कारणेही तशीच आहेत. बैठे काम करणे, व्यायामाचा अभाव आणि बदलत चाललेला आहार यामुळे अनेकांना कमी वयातच आपल्या ब्लड प्रेशरचा त्रास सुरू होतो. त्यामुळे त्यावर नियंत्रण कसे ठेवता येईल आणि आरोग्याला कसे सांभाळता येईल, याकडे पाहुया.
● सकस आहार हायपरटेंशनपासून वाचण्यासाठी आपल्या आहाराची काळजी घ्यावी. चांगले आणि सकस आहार ठेवणे गरजेचे आहे. चुकीच्या खाण्याच्या सवयीनेदेखील हा आजार होतो. तसेच आहार नेहमी वेळेवरच घेणे आवश्यक आहे. उपाशी राहण्यानेही उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.
• कमी मीठाचा वापर आपण कमीत कमी मिठाचा आहारात वापर करावा. कमी मीठ खाल्याने तुमचे ब्लड प्रेशर नियंत्रणात राखण्यात मदत मिळते. मिठात सोडियमचे प्रमाण असते ते ब्लड प्रेशर वाढवते.
• वजनावर नियंत्रण : जर तुमचे वजन जास्त आहे तर वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवा. जास्त वजन झाल्यास देखील ब्लड प्रेशर वाढते.
• ताणतणावापासून दूर राहा : जास्त विचार केल्याने ताणतणावामुळे देखील ब्लड प्रेशर वाढते. तुम्ही जेवढा ट्रेस घ्याल तेवढा ब्लड प्रेशर हाय होतो.
• ध्यानधारणा आणि योगा : योग आणि मेडिटेशन देखील ताणतणाव कमी करण्यास मदत करते. योगासनाने रक्ताभिसरण चांगले होते, मन शांत होण्यास मदत होते.