लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वार्षिक मेळाव्यात प्रकाश पोहरे व संजय देशमुखांसह मान्यवर सन्मानित

वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
अकोला : प्रत्येक क्षेत्रात शासन प्रशासनाच्या विसंगत आणि चुकीच्या धोरणांनी शेतकरी आणि सर्वसामान्न्यांची क्रूर चेष्टा सुरू आहे.पत्रकारांच्या जाहिराती वितरणामध्ये प्रचंड तफावत असून कल्याण योजनांमधून पत्रकारांना विविध अटी घालून डावलण्यात येत आहे.शेतकऱ्यांनाही योजनांचे निश्चित लाभ मिळत नाहीत.कोरोना ही सुध्दा फार मोठी फसवणूक होती. संघर्ष किती करायचा हा मोठा प्रश्न असून याविरूध्द आवाज उठविणारे पत्रकार छोटे असोत की मोठे त्यांच्या आवाजाची दखल या लोकशाहीत शासनाने घेतलीच पाहिजे असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार दै.देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांनी केले.
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर स्नेहमिलन मेळावा प्रकाश पोहरेंसह , संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख व ईतर मान्यवरांचे उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान करण्यात आले.या सन्मान सोहळ्यात ते कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख सत्कार मुर्ती म्हणून बोलत होते.
अकोला येथे जठारपेठ चौकातील जैन रेस्ट्रोमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक विनायकजी कहाळेकर,निर्माण ग्रूपचे संस्थापक- अध्यक्ष गणेशराव देशमुख, बाळासाहेब आंबेकर ( सातारा)यांची प्रमुख अतिथी म्हणून तर संजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी इंडीयन लॅंग्वेज न्यूजपेपर्स असोसिएशन (ईलना) मध्ये उपाध्यक्ष निवडीबद्दल प्रकाशभाऊ पोहरे व पदाधिकारी म्हणून संजय देशमुख यांचा तर विविध क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल विनायकजी कहाळेकर,गणेशराव देशमुख,बाळासाहेब आंबेकर ( सातारा)विशेष न्यायाधिश अॅड नितीनजी अग्रवाल, डॉ.अनुपकुमार राठी किशोर मुटे (वर्धा) यांना सन्मानपत्र,शाल व गुलाबवृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले.
सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व समाजोध्दारक गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला हारार्पण व वंदन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वार्षिक दिनदर्शिकेला जाहिराती आणि आर्थिक सहयोग देणाऱ्या हितचिंतकांचेही गुलाबपुष्प देऊन यावेळी स्वागत करण्यात आले.
प्रसंगी उपस्थित प्रमुख अतिथींनीही पत्रकारांना मार्गदर्शन करून विविध विषयांवर प्रकाश टाकला.व संघटनेच्या पत्रकार कल्याण आणि सेवाभावी उपक्रमांना शुभेच्छा व्यक्त केल्या.संघटनेच्या शिस्तबध्द, पारदर्शक आणि विश्वासपात्र वाटचालीची आणि महाराष्ट्रभर सुरू असलेल्या संघटनकार्याची,त्याचप्रमाणे संघटनेकडून ईलनासाठी होत असलेल्या मदतीची माहिती,उपक्रम,पत्रकार हल्ला प्रकरणे आणि झालेल्या कार्यवाहीतील पोलिसांकडून प्राप्त झालेल्या अहवालाची माहिती प्रास्ताविक मनोगतातून संजय देशमुख यांनी यावेळी दिली. प्रकाश पोहरे यांनी पुढे बोलतांना इंग्रजांच्या काळात आणि त्यानंतरच्या राज्यकर्त्यांकडून अविचारी नियोजनशुण्य वाटचालीने इतिहासात सुवर्णांकीत वैभवशाली असलेल्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या झालेल्या कंगाल परिस्थितीवर प्रकाशझोत टाकला.यापूर्वी झालेल्या वार्षिक आमसभेमध्ये पत्रकार कल्याणाचे महत्वाचे ठराव पारित करण्यात आले.कार्यक्रमाचे बहारदार संचलन मुख्याध्यापक मनोज देशमुख यांनी केले.
या कार्यक्रमाला लो.स्वा.पत्रकार महासंघाचे केंद्रीय उपाध्यक्ष प्रदिपजी खाडे, किशोर मानकर, सचिव राजेन्द्र देशमुख, अंबादास तल्हार,संदिप देशमुख प्रा.डॉ.संतोषजी हूशे, पुष्पराज गावंडे, अॅड.राजेश जाधव, डॉ.शंकरराव सांगळे, अरूण भटकर,(शेगांव), जिल्हाध्यक्ष मोहन शेळके, सागर लोडम, दिपक देशपांडे, सौ.दिपाली बाहेकर, सौ.कल्याणी मुटे, मनोज देशमुख, रविन्द्र देशमुख, राहूल राऊत, व्यंगचित्रकार शुभम् बांगडे (चांदुर बाजार), अॅड. राजेश कराळे, अॅड.कृष्णा देशमुख, श्याम कुळकर्णी, डॉ.रणजीत देशमुख, के.व्ही.देशमुख, विठ्ठलराव देशमुख, धारेराव देशमुख, वसंतराव देशमुख, सुरेश भारती, पंकज देशमुख व बहूसंख्य पत्रकार सभासद उपस्थित होते. शेवटी राष्ट्रगीत आणि स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. आभारप्रदर्शन सचिव राजेन्द्र देशमुख यांनी केले.