वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
अकोला : स्वातंत्र्याचा अम्रुत महोत्सव अंतर्गत”चला जाणुया नदीला” अभियानात महाराष्ट्र शासनाने, पहील्या टप्प्यात खारपाण पट्ट्यातील अमरावती जिल्ह्यातील चंद्रभागा , खोलाड, व नेर पिंगळाई या ३ व अकोला जिल्ह्यातील एक पिंजर्दा या ४ नद्यांचा समावेश केला आहे. या नद्या पुनर्जिवीत करण्याचा दृढ संकल्प समन्वयक या नात्याने शेतकरी नेते अरविंद ऊर्फ बाबुजी नळकांडे, ऍडव्हाकेट- राजीव अंबापुरे ,गजाननन काळे व प्रमोद सरदार यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केला आहे.
राज्यातील सर्व नद्यांसह या ४ ही नद्यांवर १५ आक्टोबर २०२२ रोजी “नदीप्रेमीं”ची संमेलने संपन्न झाली. अमरावती व अकोला जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली शासन यंत्रणेतील २७ विभागाचे अधिकारी व नदी समन्वयक यांचे सहभागातुन हे अभियान राबविले जाईल. प्रामुख्याने अमरावती व अकोला जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे अभियानाच्या जिल्हा समितीचे सहअध्यक्ष असतील. दोन्ही जिल्ह्याचे वनरक्षक या अभियानाचे जिल्हा सदस्य सचिव असतील अशी माहीती या पत्रकात नमुद आहे.
दरम्यानचे काळात, अमरावती व अकोला जिल्ह्याच्या सर्व समन्वयकांनी या अभियानास सहाय्यक ठरणारे विविध विभागाचे शासकीय अधिकारी, विविध संस्थाचे प्रमुख यांच्या शुभेच्छा भेटी घेऊन या उपक्रमासाठी त्यांच्या सदिच्छा मिळविल्या. यात सह सदस्य सचिव कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग रश्मीताई देशमुख, विभागीय कृषि सह संचालक किसनराव मुळे, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षाताई भाकरे, अमरावती जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक अमित चेडे, कृषि विज्ञान केन्द्र दुर्गापुरचे प्रमुख के-पी-सिंग, जलसंपदाचे अभियंता राहुल लोखंडे, अमरावती जिल्हा कृषी अधिक्षक अनिल खर्चान, डॉ. पंजाबराव क्रुषि विद्यापिठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, भुजल सर्वेक्षणचे वरीष्ठ शास्त्रध्न्य संजय कराड, आर्ट आफ लिव्हींगचे मनिष कट्यारमल, अकोला जिल्हा वनरक्षक अर्जुन कुमार, सुधीरभाऊ मुनगट्टीवार यांचे ओएसडी व मुळ खारपाणपट्ट्याचे असलेले सुधीर राठोड, अकोला जिल्हाधिकारी नीमा अरोरा, त्यांचे स्वीय सहाय्यक गवई, ऊपविभागीय अधिकारी दर्यापुर मनोज लोणारकर यांचा समावेश असल्याची माहीती समन्वयकांनी दिली. या “शुभेच्छा भेटी” दरम्यान जलतज्ज्ञ नरेश वर्मा, तुषार हांडे, रविन्द्र ढोकने हे प्रामुख्याने सहभागी असल्याचे नमुद केले आहे.